आमदार पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नास यश, श्रीगोंद्याला ८ कोटीं ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्याला ८ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पीकविमा मंजूर झाला असून त्याचा लाभ तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना होणार आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सन २०१८-१९ ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांसाठी एकूण २० हजार ७३८ शेतक-याना सुमारे … Read more

रेणुकामाता मल्टीस्टेटचे संचालक योगेश भालेराव यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे संचालक योगेश चंद्रकांत भालेराव यांचे शुक्रवारी पहाटे ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले. ते 37 वर्षांचे होते. श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या विस्तारात त्यांचा सिंहांचा वाटा असून देशातील नऊ राज्यात मल्टिस्टेटच्या १०७ शाखा आहेत. त्यांची आर्थिक क्षेत्रातील जाणकार अशी ओळख होती. व्यायामाचा छंद असल्याने त्याची प्रकृती सुदृढ होती. तसेच … Read more

पशुपालन व्यवसायासाठी ‘ही’ बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास राहिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राने सावरले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १८४ संगमनेर ३७ राहाता १७ पाथर्डी१७ नगर ग्रा.१३ श्रीरामपूर १७ कॅन्टोन्मेंट४ नेवासा २४ श्रीगोंदा११ पारनेर २० अकोले १६ राहुरी७ शेवगाव २१ कोपरगाव२४ जामखेड१३ कर्जत २० बरे झालेले एकूण रुग्ण:१३०५४ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

‘त्या’ आरोपींच्या शोधार्थ जळगावच्या दिशेने पथके रवाना

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ काल दि. २० रोजी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी आदिवासी समाजातील चार युवकांची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली असल्याची माहिती पुढे आली असून . काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याने हे हत्याकांड स्वस्तात सोन्याच्या आमिषातून करण्यात आले असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. … Read more

पुरेसे प्रवाशी नसल्याने ‘लालपरी’ची लाॅकडाऊन अवस्था कायम !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च पासुन एसटी बसेसचा प्रवास थांबला होता. दरम्यान लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत ठराविक तालुक्यासाठी एस.टी.महामंडळ प्रशासनाकडुन परवानगी देण्यात आली. तारकपूर (नगर) आगाराची नाशिकला जाणारी एक व मनमाडकडून नगरला जाणाऱ्या एक बसचा अपवाद वगळता गुरुवारी राहुरी बसस्थानकावर जिल्हा बाहेर जाणाऱ्या … Read more

राहुरी तालुक्यात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहर शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यात कोरोना बाधित २२ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील इमारतीत सुरू असलेल्या कोरोना रॅपीड टेस्ट केंद्रात शुक्रवारी झालेल्या तपासणीत बाधीत रुग्ण आढळून आले. कृषी विद्यापीठातील तपासणी केंद्रात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रॅपिड तपासणी किटचा तुटवडा असल्याने ठरावीक … Read more

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- गणेशोत्सव सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यात ‘ मिशन बिगीन अगेन ‘ करण्यात आले असले तरी यापुढील काळात काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करा. जागतिक कोरोना संकट टळू दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान … Read more

श्रीविशाल गणेशाचेदर्शन आता फेसबूक, यू-ट्यूबवर

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- नगरचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेशाचे दर्शन आता मोबाइलवर फेसबुक, यू-ट्यूबद्वारे घेता येणार आहे. कोरोना काळात येत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली.  या लाइव्हसाठी वेगळा व्हिडीओ कॅमेरा अथवा मोबाइल वापरलेले नाहीत. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने … Read more

मोटारसायकलची डंपरला धडक; दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :   कोपरगाव येथील झगडे फाट्याकडून पुणतांबा चौफुलीकडे जाणारी मोटरसायकल (क्रमांक एमएच-17 बी.एच. 8665 ) वरील भाऊसाहेब सखाराम केदार यांची मोटरसायकल डंपरवर आदळून अपघात झाला. यामध्ये ते जागीच मयत झाले आहेत. हा अपघात हॉटेल माइल स्टोन समोर, कोपरगाव हद्दीतील डाऊच खुर्द शिवारात रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला. या भीषण अपघातात … Read more

महाराष्‍ट्रात सर्वाधिक कमीदरामध्‍ये कोरोनाची होतेय ‘इथे’

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  शिर्डी शहरातील नागरीकांना अतिशय कमीदरात कोवीड टेस्‍ट करता यावी यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या माध्‍यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्‍यात आली. अतिशय कमी दरामध्‍ये कोरोना चाचणी करण्‍याचा राज्‍यातील शिर्डी मतदार संघात सुरु करण्‍यात आला आहे. तालुक्‍यात कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात … Read more

कांदा व्यापार्‍याचा शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा; भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  राज्यात कांदा उत्पादनासाठी राहुरी तालुका प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील वांबोरी येथील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्‍याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते. यामुळे आपले कांद्याचे पैसे बुडतात कि काय या कारणाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांदा उत्पादनासाठी वांबोरी (ता. … Read more

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभा, गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढीसाठी हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नगरमध्ये दूध दर वाढीसाठी माजी … Read more

सुजय विखे म्हणाले महाविकासआघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव अशी आमची इच्छा पण…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  जनमतच्या विरोधात जावून बनलेलं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असून तिन चाक आहेत, यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबईला , बारामतीला की संगमनेरला आहेत याच खरा प्रश्न आहे. आम्ही सरकार पाडू इच्छित नाही, ते त्यांच आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव … Read more

नेवासे पंचायत समिती कार्यालयात कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नेवासे तालुक्यात कोरोचा प्रभाव वाढला आहे. तालुक्यातील महत्वाच्या कार्यालयातील मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी बाधित झाले आहेत. यामुळे कार्यालयातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत समिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांना करोना विषाणूची लागण झाल्याने कर्मचारी संख्या 100 टक्के ऐवजी 33 टक्के करण्यात … Read more

श्रीगोंद्यात घडला हत्याकांडाचा थरार

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील विसापूरफाटा येथे खळबळ जनक घटना घडली आहे. नाशिक परिसरातील काही लोकांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. देण्याघेण्याच्या वादातून चौघांचा खून झाला असून या हत्याकांडाने काल नगर जिल्हा हादरून गेला होता. नाशिक जिल्ह्यातील काही लोक स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापुरफाटा येथे आले होते. यामध्ये जिल्ह्याबाहेरील दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका जेष्ठ नेत्याने निधन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस सोमनाथ काशिनाथ धूत यांचे रात्री हृदयविकाराने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. शरद पवार यांचे जुन्या सहकाऱ्यांपैकी ते एक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी पक्ष वाढवला; तसेच … Read more