मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- राहुरी येथील महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली. १६ ऑगष्टला मध्यरात्री जंगमगल्लीतील मंदिरात ही घटना घडली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत या मंदिराचे बांधकाम झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून दर्शन व्यवस्था बाहेरून करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री दानपेटीची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने पुजाऱ्याने पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक … Read more

डॅाक्टरच आढळला कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून तालुक्यात व ग्रामीण भागांतही हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. अकोले शहरात डॅाक्टरच कोरोना बाधित आढळले. मंगळवारी तालुक्यात ११ कोरोना रूग्ण वाढले. त्यात हिवरगाव आंबरे गावचेच ८ रुग्ण आहेत. त्यामुळे ते हॅाटस्पॅाट बनले आहे. अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या ३१२ झाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कामावर गैरहजर राहणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात आंतर रुग्ण होऊन दाखल होणाऱ्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या नेमणूक करण्यात आल्या होत्या. मात्र, आदेश मिळूनही कामावर गैरहजर राहिल्याने फिजीशिअन डॉ. पियुष मराठे यांच्यावर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल … Read more

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. आज सह्याद्री येथे परिवहन मंत्री श्री.परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य … Read more

जाणून घ्या काय आहे श्रीगणेश चतुर्थीचे महत्व !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती अशी गणेशाची ओळख आहे. महाराष्ट्रातील घराघरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली जाते. चला तर यावर्षीच्या श्रीगणेश चतुर्थीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. थोडं पुराणातही डोकावून पाहू… चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य … Read more

गणपतीचे विविध अवतार जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप, दिती यांच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७७.९८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८१ ने वाढ झाली. … Read more

…अशा आहेत विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- देवीपुराण – शिवपुराणात आख्यायिकानुसार , पार्वतीने एकदिवस नंदीला द्बारपाल म्हणून नियुक्त केले आणि अंघोळ करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीला झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वतीला अपमानित वाटले. चिखलापासून एका मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकले. त्यानंतर एकेदिवशी या मुलाला द्वारपाल नेमून पार्वती अंघोळीस गेली. त्यानंतर शंकर … Read more

जाणून घ्या काय आहे श्रीगणेश चतुर्थीचे महत्व !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पुणे आणि कोकणात या उत्सवाचे विशेष महत्व आहे. या काळात गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपती ही संघटनेची देवता आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. गणेशोत्सव काळात केले जाणार धार्मिक … Read more

पार्थ पवारांविषयी खा. डॉ. सुजय विखे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. यानंतर अनेक राजकीय रंग दिसू लागले. भाजपच्या काही नेंत्यानी यावरून पार्थ यांची बाजू उचलून धरली. … Read more

गणपती बाप्पासंदर्भात ‘हे’ उपाय करा; किस्मत चमकेल आणि पैसेही येतील

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात आपल्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व प्रयत्न करूनही आपणास कोणतेही काम मिळत नाही आणि आजूबाजूला निराशा येत आहे, यश मिळत नाही अशी परिस्थिती असेल तर तुमच्यासाठी, दु: ख विनाशक श्री गणपती बाप्पांची साधना खूप फलदायी सिद्ध होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी … Read more

गणेश चतुर्थीला ‘असे’ करा गणपती बाप्पाचे पूजन; पूर्ण होतील सर्व मनोकामना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पौराणिक मान्यतांनुसार देवतांमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी सनातन परंपरेत गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचा सुरु होण्याचा मुहूर्त 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11:02 पासून 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 07:57 पर्यंत … Read more

प्रदीपशेठ गांधी यांच्या निधनाने नगरच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून नगरचे नाव राज्यभरात नेणारे येथील प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीपशेठ गांधी (वय 65) यांचे करोनाने निधन झाले. चार दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या कोहिनूर वस्त्रदालनासह विविध उद्योग-धंद्यांच्या माध्यमातून प्रदीपशेठ गांधी यांनी नगरच्या नावलौकिकात … Read more

अहमदनगरचा ‘कोहिनूर’ही कोरोनाने हिरावला !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदिप वसंतलाल गांधी (वय ६५) यांचे आज मंगळवार १८ ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती,   गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा … Read more

कोहिनूर चे प्रदीप गांधी यांचे कोरोनाने निधन, परिवाराने केले ‘हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कापडबाजार येथील कोहिनूर चे मालक श्री प्रदिपशेठ गांधी यांचे आज कोरोना मुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या वर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराकडून एक संदेश देण्यात आला आहे – तो खालीलप्रमाणे –   दुःखद निधन श्री प्रदीपजी गांधी, उम्र ६५ वर्ष इनका मंगळवार … Read more

कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारे कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन झाले आहे.  त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार चालू होते.दरम्यान उपचार चालू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर सह राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या कोहिनूर ह्या वस्त्रदालनाचे ते मालक होते.या दालनाच्या माध्यमातून नगरच्या सामाजिक व … Read more

खा.सुजय विखे म्हणाले नगर जिल्‍ह्यास वेठीस धरण्‍याचा प्रकार …मृत्‍युसंख्‍येबाबत सविस्‍तर अहवाल तयार करुन यावर भाष्‍य करणार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- आपला जिव धोक्‍यात घालून कोरोना संकटात सेवा देणा-या डॉक्‍टरांच्‍या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह असुन, याबद्दल त्‍यांनी देशातील डॉक्‍टरांची माफीच मागितली पाहीजे अशी मागणी भा.ज.पा चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.  इतरांना काही कळत नाही आणि यांनाच सर्व कळत असेल तर राज्‍यातील कोरोना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८१.३८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे … Read more