अहमदनगर ब्रेकिंग : कापड व्यावसायिक बंधुंचे कोरोनाने निधन!

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधित पेशंटच्या मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. काल (गुरुवारी) सावेडी भागातील कापड व्यावसायिक असलेल्या दोन भावांचे निधन झाले. कोरोनाची लागण झाली होती. भीस्तबाग परिसरात दोन भावांचे दोन कापड दुकाने आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले नवे ४५९ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे.   दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११४ इतकी झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

कोरोना पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा, वाचा काय म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्यातील ….

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या काळात भर द्यावा, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. तालुकापातळीवरील आरोग्य यंत्रणेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले असून ज्या बाधित रुग्णांना लक्षणे … Read more

किरण काळे यांची काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- नगर शहर काँग्रेसमध्ये आज अचानक मोठे फेरबदल करण्यात आले. किरण काळे यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करीत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी नंदनवन लॉन्स येथील आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नियुक्ती … Read more

खासदार सुजय विखे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने खासदार सुजय विखे यांच्या नगर शहरातील निवासस्थानाचा समोर पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेज बाबत कहा गये वो बिस लाख करोड ?असे विचारत निदर्शने केली. प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करून … Read more

LIC ने आणली ‘ही’ योजना; म्हातारपणातही मिळेल खूप मोठी पेंशन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  एलआयसी ही देशातील प्रमुख सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, ज्यात पॉलिसीधारक मोठ्या संख्येने शेकडो कोटींची गुंतवणूक करतात. सरकारमान्य असल्याने एलआयसीवरील विश्वास जास्त आहे. एलआयसीने निवृत्तीवेतनाच्या विविध योजना आणल्या आहेत. जीवन शांती नावाच्या या योजनेंतर्गत तुम्हाला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते. नागरिकांना रिटायरमेंट नंतर येणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्हा सध्या कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील परिस्थिती सर्वात जास्त घातक बनली आहे. अशातच या संकटाला तोंड देतानाच या तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. शुक्रवारी पहाटे व सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी परिसरात धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे तीन … Read more

कर चुकवताय ? सावधान, मोदी सरकारने आणली नवी योजना; तुमच्यावर असेल लक्ष

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  मोदी सरकारने आता कर चुकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारने निश्चित योजना आखली आहे. आता आयकर विभाग आपला फॉर्म 26 एएस बदलणार आहे. त्याअंतर्गत प्राप्तिकर विभाग त्यात अशा काही गोष्टींची भर घालणार आहे, त्यानंतर तुमच्या इन्कमसह खर्चाचे अपडेटसही सरकारसमोर येईल. अशा परिस्थितीत आपण इनकम टैक्स … Read more

प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या मामाने केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी अकलापूर परिसरात एका तरुणाने प्रेमविवाह केला म्हणून त्याच्या घराचा दरवाजा तोडून मुलीच्या मामाने प्रियकराच्या घरातील महिलेस मारहाण केली. ही घटना बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दत्तात्रय भिकाजी निमसे व भागाजी निमसे (रा. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७५.९९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

के के रेंज :शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-के के रेंज प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल. आज आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची मुंबईत भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची पवार शिष्टमंडळासह घेणार भेट … Read more

के.के. रेंज क्षेत्र अधिग्रहणाबाबत खा. सुजय विखे यांची महत्वाची माहिती; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.  राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दूध उत्पादक ठार

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील वडगाव आली येथील दूध उत्पादक कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर भाळवणी येथील दहावा मैल परिसरात झालेल्या अपघातात मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली. संदीप आप्पासाहेब डेरे (वय ४५) असे अपघातात मृत झाल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने (एम.एच. 46 बी.ए. 7637) … Read more

अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी गेला. दरम्यान, गुरूवारी अँटिजेन टेस्टमध्ये १७ रूग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २४५ झाली. अकोले शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहत (सीडफार्म), कारखाना रोड (शेटे मळा) शिवाजीनगरसह तालुक्यातील धुमाळवाडी, समशेरपुर, हिवरगाव आंबरे व कोतूळ येथील व्यक्ती पॅाझिटिव्ह आढळल्या. अगस्ति कारखाना रोड भागातील वृद्धाचा संगमनेर येथील … Read more

समाधानकारक पाऊस सुरू असल्याने मुळा धरण ५९ टक्के भरले !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस सुरू असल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याच्या आवकेमध्ये समाधानकारक वाढ झाली. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कोतूळकडून मुळा धरणात तब्बल १६ हजार ७५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी धरणाचा पाणीसाठा १५ हजार ३७२ दशलक्ष घनफूट झाल्याने मुळाधरण ५९ टक्के भरले. कोतूळकडून मुळा धरणाच्या … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘भारतरत्न’ द्या !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्र सरकारने भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी वडनेर येथील स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गणेश शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेली साठ वर्षे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देशातील जनतेसाठी मोठे योगदान … Read more

चिंताजनक : एका दिवसात आठ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात २४ तासांत आणखी आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला. बळींची एकूण संख्या १३२ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात नवे ५२८ रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७६, अँटीजेन चाचणीत २०२ आणि खासगी प्रयोगशाळेत २५० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयातील चाचणीत आढळलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात विवाहितेला धमकावून दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. सय्यद दाऊद मोमीन (सारोळे पठार) असे त्याचे नाव आहे.  महिलेवर संगमनेरमध्ये उपचार सुरू होते. नंतर तिने डॉ. मोमीनकडे उपचार सुरू केले. सलाईनमधून गुंगीचे औषध देत त्याने या महिलेवर अत्याचार केले. मोबाइलवर चित्रफीत … Read more