के. के. रेंजमधील ‘त्या’ २३ गावांत खळबळ; ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.  परंतु काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींनी या जमिनींचे अधिग्रहण होणार नसल्याचे सांगितले होते. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून … Read more

नामदार बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना भल्याभल्यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यात नामदार महोदयांच्या काकाश्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला आहे.  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. तर या काकाश्रींच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील … Read more

सुजय विखे झाले आक्रमक म्हणाले माझी ६ कोटी रखडलेली उधारी आधी द्या !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे … Read more

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची विनंती बदल्या करण्यास सांगितले असले तरी आदिवासी भागातील (पेसा) शिक्षकांच्या बदल्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पेसाच्या बदल्या होणार नसल्याने बदलीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. यामुळे यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर गंडांतर येणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानूसार … Read more

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट; लाभ घ्यायचाय ? मग हे वाचाच…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा ७ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वे सेवेचा फायदा अनेक राज्यांमधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या ट्रेनच्या सहाय्याने देशात भाजीपाला, फळे, फुले आणि मासे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत वाहतूक करण्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६४६ कोरोना रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला ९२४० वर !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४  इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

तो’ एकाला सोडवायला गेला आणि परतलाच नाही…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील एक तरुण एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला. परंतु त्यानंतर तो माघारी परतलाच नाही.  शोध घेतल्यानंतर एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. रोहन बबन ओहळ (वय १९ ) असे  या तरुणाने नाव असून त्याने विहिरीत … Read more

मुलीच्या वाढदिवसाला येण्याची त्यांची इच्छा शेवटी अधुरीच राहिली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहेत. कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी … Read more

मोठी बातमी ! इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत कोर्टाचे ‘हे’ महत्वपूर्ण वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते. त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्यावर कोर्टात केस दाखल होती. परंतु आता कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कीर्तनकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनाने घेतला आणखी एका मुख्याध्यापकाचा बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले आहेत. नुकतेच जामखेडमधून एक धक्कादायक वृत्त आले आहे. जामखेड तालुक्यातील पाडळी येथील साहेबराव … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३३ कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मनपा १७७,  संगमनेर ३५,  राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२ , श्रीरामपूर १३ , कॅन्टोन्मेंट १३ , नेवासा २०, श्रीगोंदा ६० , पारनेर ३२ , अकोले ११ , राहुरी ७ , शेवगाव ४४ , कोपरगाव १३  जामखेड २६ , कर्जत … Read more

‘ह्या’ धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संततधार सुरुच

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. काल दिवसभरात दारणा, भावलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत होत्या. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचे आगमन नगण्य होते. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 … Read more

श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाने घेतले ‘इतके’ बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 384 वर जाऊन पोहोचली आहे.काल मोरगे वस्तीवरील एकाचा उपचारादरम्यान नगर येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची तालुक्यातही संख्या … Read more

दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- प्रेमाला वय नसत, विचार नसतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एका घटनेने दिला. याठिकाणी 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांनी त्यांच्या या अनोख्या प्रेमासाठी कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून स्वतःचा ‘करुण’ अंत करून घेतला. या घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली … Read more

७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह ठणठणीत होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- नेवासे शहरात रोज दहा ते बारा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी सायंकाळी तालुका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात एकूण कोरोना बाधित ३२४ पैकी २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील … Read more

कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more

कोरोना बाबत अहमदनगरसह या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ५५९ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१६५  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज … Read more