अहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.  दरम्यान अनिल  राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली … Read more

चितळेरोडवरच्या ‘शिवालया’त यापुढे अनिलभैय्या कधीच भेटणार नाहीत…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहमदनगर शिवसेनेचा ‘आव्वाज’ आज पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. माजीमंत्री आणि अहमदनगर शहरावर गेली २५ वर्षै ज्यांनी आमदारकीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं, अशा माजी मंत्री अनिल राठोड … Read more

दुखःद बातमी : माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.  त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी,  एक मुलगा व मुली असा परिवार आहे. राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून … Read more

पारनेर तालुक्यात 32 कोरोना बाधीत रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यात मंगळवारी ३२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ.ग्रामीण भागातील छोट्या गावातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. पारनेर शहराचीही कोरोना पाठ सोडेना, आज ३ रुग्ण वाढले  चौधरी वस्तीवर दोन तर पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागातील महिला कर्मचारी कोरोना बाधीत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पारनेर शहर कोरोना समितीचा दोन दिवस शहर बंद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये टॉपर !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- केंद्रीय लोकसेवा आय़ोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात याची लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर आता युपीएससीने मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली आहे. त्याच्या घरात शिकलेले कोणीच नाही,आई वडील दोन्हीही शेती करणारे,मुलानेही शेतीची पदवी घेतली पण शेतीत न अडकता … Read more

राज ठाकरे म्हणाले आपल्या रामाचा वनवास संपला…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिरा व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. #राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya pic.twitter.com/cyIJgn3WfT — Raj Thackeray (@RajThackeray) August 4, … Read more

महाविकास आघाडी सरकारला प्रभु श्रीराम मंदीर भूमिपुजनाचा आनंदोत्सव मान्य नाही ?

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या (दि.५) मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इच्छेनुसार फटाके वाजवून धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केलेले असतांना  पोलिस प्रशासनाकडुन मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांना नोटिस बजावण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४६३ रुग्ण वाढले , वाचा गेल्या चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. … Read more

नशिबी मुलगा नसल्याने आठ लेकीनेच पित्याला दिला अग्नीमुख !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-मुळचे तालुका अकोले, कळस येथिल रहिवासी असलेले तीस ते पस्तीस वर्षेपासून सध्या वास्तव्यास राहणार्‍या श्रीरामपूर तालूका बेलापूर (सुभाषवाडी,ऐनतपूर) येथिल रहिवाशी गणपत धोंडीबा वाघमारे (वय६८) यांचे नुकतेच अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची रूग्णालयात उपचार सुरू असतानाच दु:खद निधन झाले.यांच्या पश्चात … Read more

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी,१० ऑगस्टपर्यंत करून घ्या हे काम…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत  करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती … Read more

पारनेरचे जावई झाले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा,) व पारनेर तालुक्याचे जावई आणि सध्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले सुनील गव्हाणे यांची निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील गव्हाणे यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले. या कामाची … Read more

कोरोना पॉझिटिव्हकडून लपवालपवी; प्रशासन हतबल 

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील संपर्कातील व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे प्रशासनाला अशा व्यक्तींना क्वाॅरंटाइन करण्यात अडचण निर्माण होत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. काेरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जामखेड तालुक्यातही काही … Read more

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘ कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प … Read more

कोरोनाग्रस्त गावात प्रशासनाचे दुर्लक्ष, आणि देशभक्त जवान मदतीसाठी ग्राउंडवर !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  सध्या महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यावर अनेक उपाययोजना प्रशासन राबवत आहे. परंतु तरीही संक्रमणाचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे.मुंबई , पुणे या ग्लोबल सिटी मध्ये तर रुग्णसंख्या खूपच वाढली आहे.  त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. या … Read more

‘नगर’ शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय; विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीची तयारी करा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तसे मोठे आहे. राज्यातील निवडक जिल्हे असे आहेत कि जेथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाची इच्छा असते. यापैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्यातील नगर शहरावर अनेक पक्षांचा राजकीय डोळा असतो. आता भाजपनेही असाच एक आशावाद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ पोलिसांना झाला कोरोना, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील तीन हजार पोलीस जिल्हाभरात बंदोबस्तावर आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क आल्याने जिल्हा पोलीस दलात कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतल्यामुळे मार्च, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले नवे २२ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली.  काल सायंकाळपासून … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६  हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे.  दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन … Read more