भंडारदरा परिसरातील सौंदर्य बहरले,पण….

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यास वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरु असल्याने दोन दिवसांत हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे. सर्वत्र अधूनमधून वाहणारे धबधबे, खळखळणारे ओढे नाले यामुळे भंडारदरा परिसरातील सौंदर्य बहरले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन असल्याने पर्यटकांविना हा परिसर सुनासुना आहे. याठिकाणी लाखो पर्यटक भेटी देत असतात. … Read more

बिग ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह चौघांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबातही करोनाचा शिरकाव झाला आहे. श्री. राठोड यांच्यासह कुटुंबातील चौघांना करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उपद्रव वाढत चालला आहे. शहराचा मध्य भाग असलेल्या चितळे रोड, नेता सुभाष चौक परिसरातही करोना रुग्ण … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच..

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.  काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका  कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील 3 दिवसात 20 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ५४ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज बंद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज १३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४१८ झाली आहे. आज मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२, अकोले ८, राहुरी ५ ,शेवगाव १, कर्जत १ यथील रुग्णांचा यात समावेश … Read more

गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय?

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अशा बर्‍याच योजना आहेत ज्यांची तुम्हाला कल्पनाही नसते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अनेक योजनांपासून दूर राहावे लागते . गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय? सिलिंडरवर 6 लाख रुपयांचा विमा संरक्षण उपलब्ध आहे, जो अपघात झाल्यास दिला जातो. आज बहुतेक घरांमध्ये गॅस … Read more

भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील हताश… म्हणाले मी एकटा पडलोय !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय,’ असे हताश वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी … Read more

सुजित झावरे पाटील म्हणाले माझ्या सोबत स्पर्धा करा…

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या सन 2020 च्या आर्थिक नियोजनात सदर रस्त्याचा समावेश करून या रस्ता कामासाठी निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एनएच-222 ते नागबेंदवाडी रस्त्याच्या कामाचा … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन हा पर्याय असणार नाही, मात्र ….

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉ. कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी नगरला भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक घेण्यापूर्वी या पथकाने जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल, तसेच श्रमिकनगरची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा पोलिसप्रमुख अखिलेशकुमार … Read more

कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाच्या शरीरातील अवयवाची मोठ्या प्रमाणावर तस्करी !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोना महामारी ही गरिबांना उद््ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे राज्य, देश व जगावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन उपचारानंतर मृत्यू पावलेल्या कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाच्या शरीरातील अवयवाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. यातून कोट्यवधींचा गोरखधंदा केला जात आहे, असा गौप्यस्फोट पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र … Read more

महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळ्या चारत असलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी प्रकाश सुखदेव सांगळेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित महिला शेळ्या चारत असताना सांगळेने विनयभंग केला. माझ्याकडे आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकीही दिली. महिलेने … Read more

कौतुकास्पद : शिवसैनिकांनी स्वताच्या पैश्यातून उभारले कोरोना रुग्णालय !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची जाहिरात बाजी न करता कोरोना काळात रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान केले होते. या आवाहनाला पारनेर तालुका शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे टाकुन शिवसेना पदाअधिका-यांनी स्वतः ता पैसे जमा करून उद्यावत कोव्हिड सेंटर चालु … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज सकाळी विळद गावात फुटली. त्यामुळे नगर शहर व उपनगराचा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस विस्कळीत राहणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागास आज पाणी सोडण्यात येणार होते. परंतु दुरुस्तीमुळे या भागात आज पाणी सोडले जाणार नाही. मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला!

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राहता तालुक्‍यातल्या प्रवरानगर परिसरात घोरगे वस्ती भागात राहणारी तरुणी रामेश्वरी शिवाजी गायकवाड, {वय १९} ही दि. २२ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिची आई मीना यांच्याशी घरगुती किरकोळ कारणावरुन शाब्दिक भांडण झाल्याने घरात कोणाला काहीही न सांगता निघून निघून गेली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. … Read more

कोरोना ब्रेकिंग : २४ तासात जिल्ह्यात नव्या ३१६ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३१६ नवे रूग्ण नोंदले गेले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगरचे पोलीस खातेही कोरोनाच्या विळख्यात; आज झाली ‘इतक्या’ पोलिसांना बाधा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस हवालदार यांचा कोरोना चाचणी अहवाल … Read more

वारंवार सांगूनही अधिकारी ऐकेनात मग नगराध्यक्षांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-राहात्यामधील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली. नागराध्यक्षांनीही खड्डे बुजविण्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वत: हातात फावडे व घमेले घेऊन वाळू, … Read more