‘ती’ व्हिडीओ ‘त्या’ नेत्यासाठी ठरतीये डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकत असतांना अचानक आग लागून पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने पेट घेतल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची खातर जमा न करता कुकाणा येथील नामांकित नेत्याच्या नावासह ही घटना त्यांच्या पंपावर घडली असे शेअर करण्यात आले. त्यामुळे झाले असे की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा (वय.६७ वर्षे) कोरोनामुळे सोमवारी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मुत्यु झाला. कोरोनाचा पाथर्डी तालुक्यातील हा पहीला बळी असुन,यामुळे नागरीकामधे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील या वृद्ध महीलेला काही दिवसापुर्वी श्वसनाचा त्रास होवु लागल्याने त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल … Read more

पोस्टाच्या ‘ह्या’ योजनेचा ३१ जुलैपर्यंत घ्या लाभ आणि मिळवा खूप सारा फायदा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन केले.आवश्यक कामेही पूर्ण बंद केली गेली.  त्यामध्ये गुंतवणूकीशी संबंधित बाबींचा समावेशही आहे. याच पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धि योजना खाती उघडण्यासाठी सरकारने एक खास सुविधा सुरू केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट विभागाने असे सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान (25 मार्च ते 30 जून … Read more

दुधाविषयी निर्णय नाहीच; दूध ‘बंद’ आंदोलन करण्यावर संघटना ठाम

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन दुग्धविकासमंत्र्यांनी … Read more

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ एकवटल्या ‘एवढ्या’ संघटना ; दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- एका किर्तनात बोलताना इंदोरीकरांनी मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्या वक्तव्यानंतर विविध संघटना विरोधात तर काही समर्थनार्थ उभ्या ठाकल्या.  या वक्तव्यावर अंधश्रद्धा निमूर्लन समितीने तक्रार केली. आरोग्य विभागानेही याची चौकशी केली. परंतु या विरीधात खूप साऱ्या संघटना इंदोरीकर महारांच्या भेटी घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले. त्यांना अद्यापर्यंत … Read more

माजीमंत्री राधाकृष्ण विखेंनी ‘असे’ काही केले कि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राज्‍य सरकाचे स्‍टेअरींग कोणाच्‍या हातात याची चर्चा जोरदार सुरु असतानाच इकडे शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे आणि आश्‍वी जिल्‍हा परिषद गटामध्‍ये आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शास‍कीय योजनेतील लाभार्थ्‍यांना रिक्षांचे वितरण करुन लक्ष वेधून घेतले आहे.  जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्‍यांना मिळावा यासाठी शिर्डी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ९७ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे.  दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे दुःखद निधन,कर्जत तालुक्यावर शोककळा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कर्जत शहरातील नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. हजारो लोकांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉ. काकडे यांनी कित्येकांचे जीव वाचवले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३० जणांना कोरोनाची लागण, जाणून घ्या जिल्ह्यातील लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.  अहमदनगर शहरातील ४, भिंगारमध्ये १७, संगमनेर येथे ३, नगर तालुक्यात आणि श्रीगोंदा येथे प्रत्येकी २, पारनेर आणि शेवगावमध्ये प्रत्येकी १, असे एकूण ३० रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यात नगर शहरातील हातमपुरा भागात ४, भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३४० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे, आज सकाळी ३४० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.  यामध्ये मनपा २२२ संगमनेर ३१ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर११ कॅन्टोन्मेंट ७ नेवासा २ श्रीगोंदा ५ पारनेर:९ अकोले १ राहुरी ९ शेवगाव ४ कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाला आणि…

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात ८ मे रोजी सोन्याच्या दागिन्यांवरुन झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना शनिवारी उपचारांसाठी शिरसगाव येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात नेण्यात आले होते.  परत कारागृहात येत असताना हे आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले. एकास पोलिसांनी शनिवारी रात्रीच उसाच्या शेतात पकडले. दुसरा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. मूळचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ३७९ कोरोना रुग्ण,जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८१ इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले.  तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६७ रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५३ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या म्हाळादेवी येथील ६१ वर्षीय इसमाचा मृतदेह काल दि. २५ सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात आढळून आला. चंद्रभान परशुराम हासे (रा. म्हाळादेवी) असे मयत इसमाचे नाव आहे. म्हाळादेवी येथील गायदेवना ओढ्याजवळ निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सुरु आहे. ठेकेदाराचा रखवालदार संदीप हासे त्या परिसरात असताना त्याला दुर्गंध … Read more

कौतुकास्पद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ‘कोविड रुग्णालया’चे लोकार्पण !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या अर्थात सोमवारी दि. २७ जुलै रोजी ५० बेड्सच्या ‘कोविड रुग्णालया’चे पारनेरमध्ये लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देणार आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. साईबाबा संस्थान आणि राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोविड केअर सेंटर उत्तमपणे सुरु आहे. मात्र आता वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या सेंटरवरच न थांबता कोविड रूग्णालय सुरु … Read more

माजी पालकमंत्री प्रा. शिंदे यांची घेतली ‘या’ मंत्रिमहोदयांनी भेट!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली. माजीमंत्री प्रा. शिंदे यांचे वडील शंकरराव शिंदे यांचे गत पंधरवाड्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी दुपारी … Read more

प्रेमाच्या आणाभाका घेऊनही ‘त्याने’ ‘तिला’ फसविले! अखेर प्रेयसीने संपविली जीवनयात्रा!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत आपल्या आत्याकडे राहत ‘त्या’ तरुणीचं जामखेड तालुक्यातल्या जवळे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर असलेल्या विवाहित प्रियकरावर मोबाईलवर सूत जुळले. प्रेमात आंधळ्या झालेल्या ‘त्या’ तरुणीने त्याचे चारित्र्य असे काहीच न पाहता त्याच्या खोट्या प्रेमाचा तिने स्विकार केला. धनंजय विष्णुपंत कांबळे असे त्या खोटारड्या प्रियकराचे … Read more

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी … Read more