वीज काेसळल्याने झाडाच्या फांदीचे झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारातील पेपर मिलच्या पूर्वेस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतील बांधावर असलेल्सा शिसमच्या झाडावर सोमवारी दुपारी वीज कोसळली. झाडाच्या फांद्या पन्नास फुटांवर उडून पडल्या. कोळपेवाडी परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. सोमवार दुपारी कोळपेवाडी परिसरात आभाळ दाटून आले होते. … Read more

सोशल मिडीयावरील मराठा समाजातील मुलींची बदनामी थांबवा !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  समाजमाध्यमांवर होणारी मराठा मुलींची बदनामी थांबवा, या मागणीचे निवेदन जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील महिला व मुलींबद्दल गलिच्छ भाषा वापरून बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड खूनप्रकरणी आरोपींना शासन होण्यासाठी मराठा समाजातील कोणत्याही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात झाला ढगफुटीसदृश पाऊस !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : कोपरगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धोत्रे, भोजडे, गोधेगाव, खोपडी, तळेगाव मळे, दहेगाव बोलका आदी परिसरात सोमवारी ढगफुटीसारखा पाऊस झाला. साधरण अडीच ते तीन इंच पाऊस झाला. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. साठ ते सत्तर घरांत पाणी घुसून नुकसान झाले. काहींच्या शेतजमिनी वाहून गेल्या. कांदा चाळीत पाणी घुसले. अंदरसूल, नगरसूल, येवला तालुक्यातही … Read more

बिग ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील ‘हा’ भाग झाला कंटेनमेंट झोन !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : नगर शहराच्या केडगावमधील शाहूनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. दिनांक 15 ते 28 जूनपर्यंत या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने वस्तू विक्री सेवा बंद राहतील. तसेच नागरिकांच्या येण्या जाण्यावर निर्बंध लागू होणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाला हरवलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव आला होता, औषध उपचारादरम्यान ते त्यातून बरे झाले होते. दरम्यान … Read more

नामदार तनपुरेंचा अट्टाहास; शासनाचे 2 कोटी रुपये पाण्यात !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  आमदार होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे हे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिलेंची ‘फोटो सेशन’करणारा आमदार म्हणून खिल्ली उडवित होते. मात्र, वांबोरी चारीच्या आवर्तनाचा विचका करताना फोटो सेशन करून त्याचे श्रेय ना. तनपुरे यांनी पदरात पाडून घेत कर्डिलेंचाच कित्ता गिरविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी मुळा धरणाचा साठा खालावल्यानंतर क्षमता नसतानाही वांबोरी … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी ‘असा’ साजरा केला त्यांचा वाढदिवस !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळाला अभिवादन करुन आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमिवर कोणत्‍याही कार्यक्रम आणि सत्‍काराचे नियोजन न करण्‍याचे कार्य‍कर्त्‍यांना केलेल्‍या आवाहानाला कार्यकर्त्‍यांनीही तसाच प्रतिसाद देवून सामाजिक संदेश दिला. आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केले तरुणाचे अपहरण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, येथील कोहोकडी गावच्या सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची माहिती समोर आलीय. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, कोहोकडी येथील सतिष सुखदेव गायकवाड हा युवक रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता. मात्र  तो … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना रोहित पवारांचा पुन्हा एकदा झटका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना पराभूत केल्यापासून राम शिंदे यांचे वाईट दिवस सुरु आहेत. भाजपाची राज्यात सत्ता गेली, नंतर विधानपरिषदेवर शिंदे यांना घेण्यात आले नाही यामुळे माजीमंत्री शिंदे यांच्या राजकीय कारकीर्द वर प्रश्न उठत आहेत.दरम्यान हे सर्व सुरु असतानाच आमदार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेना जोरदार … Read more

ब्रेकिंग : अवैध वाळू वाहतूक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अकोले तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल रविवारी सकाळी जप्त करण्यात आला. जाचकवाडी फाट्याजवळ बोटा (तालुका संगमनेर) ते बेलापूर ररस्त्यावरून जाणारा डंपर (एमएच १७ बीडी ५५९४) पकडण्यात आला. त्यात साडेतीन ब्रास वाळू होती. चालक माउली गोपाळ आभाळे (वय ३२, अकलापूर, तालुका संगमनेर) हा … Read more

धक्कादायक : जेलमधील आरोपीला कोरोनाची लक्षणे !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पोलीस ठाण्यातील एका आरोपीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने संबंधित आरोपीला कोरोना चाचणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांनी दिली आहे.  पाथर्डी पोलीस ठाण्यातील जेलमध्ये पोलीस कोठडीतील एका 26 वर्षीय आरोपीला आज (14) रोजी ताप ,सर्दी ,खोकला याचा त्रास होऊ लागल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी तात्काळ आरोग्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील 8 कोरोनाग्रस्त परतले घरी, आता राहिले फक्त ‘इतके’रुग्ण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. … Read more

आमदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेच नव्हते…आ.जगताप समर्थकांचा दावा

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींनी नागरिक व प्रशासनातील दुवा बनून प्रतिबंधात्मक उपाय व मदतकार्य यावर भर देणे अपेक्षित असताना स्वतः आमदारानेच नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आमदार जगताप यांचे निवासस्थान असलेला परिसर कंटेन्मेंट झोन केला होता. आज अनेक लोकप्रतिनिधींनी आपले वाढदिवस … Read more

…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते. त्यामुळे पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. आपण रण सोडणारी माणसं नाहीत. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो, … Read more

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करुन …

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करुन जीवन संपवल्याचे वृत्त हे अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने अशा पद्धतीने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक तरुण प्रतिभाशाली अभिनेता गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ भागात कोरोनाचे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ७ रुग्णांची भर पडली. नगर शहर ४, राहाता १, तर संगमनेर येथे २ रुग्ण आढळले. यापैकी एक व्यक्ती मुंबईहून आलेली आहे. नगर शहरातील कल्याण रस्ता भागात ५५ वर्षांची महिला, केडगाव येथील २९ वर्षीय व्यक्ती, १६ वर्षांची मुलगी १२ वर्षांचा मुलगा बाधित आढळला. राहाता येथील खंडाेबा चौकातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळी ‘फसवणूक’ महिलेसह तिघांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अहमदनगर शहरात शिवभोजन केंद्रासाठी थेट अन्न-औषध प्रशासनाचा बोगस परवाना देऊन परवानगी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन शिवभोजन केंद्र चालकांसह त्यांना अन्न व औषध प्रशासनाचा बोगस परवाना देणारी व्यक्ती, अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद बाळासाहेब मरकड , स्वप्नील जयसिंग निंबाळकर व गायत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’खून प्रकरणाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :शिर्डी बस स्थानकाच्या समोरील सार्वजनिक शौचालयामध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना 13 रोजी घडली होती, या घटनेचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला आहे  या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अज्ञात … Read more