महिलेचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्यांनी केले असे काही कि झाली जेलमध्ये रवानगी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  संगमनेर मध्ये एका महिलेच्या नावाने  इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग वेबसाईट वर फेक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना नगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. संकेत नानासाहेब गाडेकर (रा. राजापूर ता. संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी जानेवारीमध्ये बदनामी … Read more

विखे – कर्डिले यांचे पुन्हा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस … Read more

पुढील दोन वर्षात एकही मुलगा जन्माला घालणार नाही ‘या’ गावातील जोडप्यांचा निर्धार !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कोरोनाने सर्व देशभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम केला. परंतु आता नवविवाहित जोडप्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. याचाच एक परिणाम म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. गोधेगावची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती अकोले तालुका ०६ रुग्ण –  *जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. *वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या ५३ वर्षीय कोरोना बाधितावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला. तसेच ही व्यक्ती राशीन येथील कोरोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला. त्यामुळे … Read more

भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासह बाजारतळ येथील दुकान उघडण्यास आमदार जगतापांचा पुढाकार

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भिंगार छावणी परिषद येथील बाजारतळ मधील दुकाने दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत. सदरील बाजारतळ उघडण्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवार यांनी शुक्रवार दि.5 जून पासून आठवडे बाजार न भरवता … Read more

राष्ट्रवादीच्या या नेत्याला आमदार करा माजीमंत्री राम शिंदेंची मागणी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कुकडीच्या पाण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी कोरोना महामारीतही उपोषण केले, आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.  स्थानिक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेवर घेतल्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे स्वागत करू. कारण या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार स्थानिक नाही. त्यांच्यापुढे राज्याचे, देशाचे … Read more

कागदावरच्या परीक्षा होताच राहतात! ठाकरे सरकाराच्या निर्णयावर मंत्री तनपुरे म्हणतात…

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन संबोधित करताना म्हटले की,   तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण  या कागदावरच्या परीक्षा होत … Read more

मध्यरात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत …पिके झाली भुईसपाट !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-विजांच्या कडकडाटासह रविवारी रात्री झालेल्या पावसाने राहुरी तालुक्याला अक्षरश झोडपून काढले. उभी पिके भुईसपाट झाली. अनेक झाडे उन्मळून पडली. रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. मानोरी, वळण, मांजरी या भागात पावसाबरोबर गाराही पडल्या. पावसामुळे काही भागातील उभी पिके भुईसपाट झाली. झाडे उन्मळून पडली. सडे-वांबोरी … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून जनतेची दिशाभूल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-  कुकडी आवर्तन पाणी वाटप नियोजनात असमन्वय आणि आभाव असल्याचे परिणाम तालुक्यातील शेतकरी भोगत असून उन्हाळी आवर्तन हे पावसाळ्यात सोडत आहेत. पाणी सोडण्याबाबत लोकप्रतिनिधी ६ तारीख सांगत आहे आणि अधिकारी १० तारीख सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचांने केला महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्तीचा राग मनात धरुन तो घरी नसतांना त्याच्या घरी जात घराची कडी वाजवून चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब धोडींराम सावंत व त्याच्या सात साथीदारांनी गावातील महिलेचा विनयभंग केला.  या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिलेखनवाडी येथील … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे दीडशतक !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे, यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दीडशतक पूर्ण झाले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५२  झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी ०५ नवीन रुग्ण. अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली … Read more

आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदेबाबत आमदार रोहित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, … Read more

त्या निर्णयाविरोधात नाभिक समाज संघर्षाच्या तयारीत

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  31 मे रोजी शासनाने महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सलून व्यवसाय सुरु ठेवण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचया कालावधीमध्ये शासनाचया सर्व नियम अटींचे पालन करत असतांना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सलून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले. या ०३ रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले … Read more

माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे उपोषण अल्पावधीतच स्थगित;’हे’आहे कारण

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे सोमवारी सकाळी ११ वाजता कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. काही वेळातच तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदींनी येवून त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर प्रा.शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले. प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले, … Read more

कुकडीच्या पाण्यासाठी प्रा. राम शिंदे बसले उपोषणाला !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सोशल डिस्टन्स ठेवून उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने प्रा.राम … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सलूनची दुकाने पुन्हा बंद !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगरचे जिल्हाधीकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीराहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. २२ मे पासून सुरू … Read more