अहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- क्वारंटाईन करण्यासाठी नावे देत असल्याच्या संशयावरुन सात जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे मंगळवारी (दि.26) रोजी ही घटना घडली. यामध्ये तीघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवार (दि.29) रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

फायनान्सच्या कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील तरुणाने श्रीरामपूर-वाकडी रस्त्यालगत धनगरवाडीफाटा येथील बसथांब्याशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेतला. खासगी फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली. श्रीरामपूर तालुका ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे व कॉन्स्टेबल कराळे यांनी पंचनामा केला. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या शर्टच्या खिशात आधारकार्ड व चिठ्ठी सापडली. एका खासगी फायनान्स कंपनीच्या सततच्या … Read more

माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाला धक्का

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  पिंपळगाव पिसाच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे दिनकर पंदरकर यांच्या पॅनेलच्या सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. माजी आमदार राहुल जगताप यांच्या पॅनेलच्या अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव जागेवर असलेल्या सुमन मोरे यांनी पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे पद रद्द केले. त्यामुळे जगताप गटाला मोठा धक्का … Read more

पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  ठाण्याहून टाकळी ढोकेश्वर येथे आलेल्या ३६ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे. सर्व पाच रुग्ण मुंबई, ठाण्याहून आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून टाकळी ढोकेश्वर येथील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. हिवरे कोरडा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी ६ नवीन रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- जिल्ह्यात आणखी ०६ नवीन रुग्ण तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित. घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित मुंबईहून निमोन(संगमनेर) येथे आलेले 40 वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे … Read more

महत्वाची बातमी : उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचे एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य … Read more

अंतिम वर्षाच्या विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी : परीक्षा न होता असे मिळणार मार्क्स…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- राज्यात अनलॉक १ ची नियमावली जाहीर करण्यात आली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी आहे, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण दिले जाणार आहेत, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यापीठांची मते जाणून … Read more

साई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डीचे साई मंदिर या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं. मात्र ‘साई समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्‍याचा कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही’, असा खुलासा साई संस्थानतर्फे करण्यात आला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका व्हिडीओद्वारे ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारूने केला घात! मित्रानेच केली मित्राची हत्या…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- सावेडी उपनगरातील गजराज फॅक्टरीच्यासमोर अमोल थोरात याचा दगड व धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आज सायंकाळी ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, थोरात व त्याचे मित्र हे आज सायंकाळी दारू पिण्यासाठी बसले होते. दारूची झिंग पडल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पर्यावसन भांडणात झाले. त्यातूनच मित्रानेच आपल्या मित्राचा खून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज पुन्हा कोरोनाचे दहा रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, आज नवीन दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 141 पर्यंत पोहोचली आहे. तीन दिवसांपासून दररोज दहापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान आज आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय मुलगी कोरोनाचा लढा … Read more

लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवार यांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले….

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. राज्यात करोना चाचण्यांमध्ये आणखी वाढ करावी लागेल,’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. काही विकसित … Read more

शिर्डी : कुटुंबातील पाच लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डी शहरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या ‘निमगाव ‘ या गावात एकाच घरातील पाच जण कोरोनाग्रस्त निघाले असून परिसरात भीती पसरली आहे. प्रशासनाने यावर कार्यवाही करत चौदा दिवस शंभर टक्के लॉकडाऊन घोषित करून संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. या गावातील ५० वर्षीय महिलेचा भाजी विक्री व्यवसाय आहे. … Read more

दिलासादायक बातमी : ‘त्या’ चिमुरडीची कोरोनावर यशस्वी मात

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली आहे. आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेसइतर स्टाफही गहिवरला. कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला पुष्पगुच्छ देत तिचे … Read more

ब्रेकिंग : तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ‘या’ दोन पोलिस ठाण्याचे इन्चार्ज बदलले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत भोये यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह … Read more

मोठी बातमी : खासदार सुजय विखेंचा अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण्यांवर निशाना, म्हणाले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  ‘निवडणुकीच्या काळात लग्न, अंत्यविधी आणि दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी आता कुठं गेले? या काळात त्यांची लोकांना खरी गरज आहे. करोनाला घाबरून ते घरात बसले आहेत. अश्या स्पष्ट शब्दात सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच राजकारण्यांवर निशाना साधला. दरम्यान मलाही प्रशासनाकडून जास्त न फिरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, मात्र लोकांच्या … Read more

अर्बन बँकेला झालेल्या ‘त्या’ दंडाला अधिकारीही जबाबदार, माजी सरकारी अधिकाऱ्यांचे मत

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अर्बन बँकेला झालेल्या 40 लाख रुपयांच्या दंडाला बँकेचे व्यवस्थापक व इतर अधिकारीही जबाबदार आहेत, असे मत माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी व अर्बन बँकेचे सभासद रफिक मुन्शी यांनी व्यक्त केले. कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे म्हणजेच प्रशासनाचे आहे. ‘आरबीआय’च्या नियमांचे … Read more

NASA ने रचला इतिहास, आपल्या भूमीतून पाठवले अंतराळवीर

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने ९ वर्षांनंतर अखेर इतिहास रचला. आपल्या भूमीतून खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळात दोन अंतराळवीरांना पाठवण्यात यश आलं. पहिल्यांदाच खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अशापद्धतीनं अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या केप कनव्हरल येथील जॉन एफ केनेडी अंतराळ संशोधन केंद्रातून NASA-SpaceX Demo-2 mission यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. अमेरिकेने … Read more

एकाच कुटुंबातील तिघाजणांना झाली कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोना ची बाधा झाली आहे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथील पुणे येथून पत्नीस भेटून आलेल्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य विभागाने तात्काळ त्याच्या कुटुंबातील चार जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयांमध्ये … Read more