धक्कादायक : पळालेला तो रुग्ण निघाला कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- कल्याणहून आलेल्या पॉझिटिव्ह आजीच्या संपर्कातील तिच्या मनोरुग्ण नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. तालुक्यातील तो सहावा रुग्ण ठरला. तो जिल्हा रुग्णालयातून पळून गेला होता. घोडेगावात त्याला ताब्यात घेतले. नेवासे बुद्रूक येथील मुलीला भेटण्यासाठी कल्याण येथून २० मे रोजी ही महिला आल्यानंतर तिला स्थानिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावासमोर बहिणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या आंब्याला दोरीने गळफास घेऊन 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आपल्या 9 वर्षांच्या भावासमोरच तिने हे कृत्य केले. ती आत्महत्या करीत असताना भावाने वाचण्याचा प्रयत्न केला होता. का अन्य तिसरेच कारण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. पूजा झारदास भोसले हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत. यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य … Read more

ब्रेकिंग – अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक पार, आणखी 4 जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने  शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे दोन आणखी रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आता आणखी दोन रुग्ण मिळून आले आहेत. ही दोघे मुंबई हून आलेले असून त्यांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पिंपळगाव खांड येथील एक हजार लोकसंखेच्या गावात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथील शेतकर्‍यानं आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दादासाहेब भाऊ शिंदे वय (५५)असे या शेतकर्‍याचं नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुन, पत्नी असा परिवार आहे. शिंदे यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले, शिंदे यांच्यावर बँन्केचे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना बाधीत महिलेने दिला जुळ्याना जन्म

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. मुंबईहून निंबलक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज … Read more

‘ती’ कोरोना पॉझिटिव्ह भाजीविक्रेती ! नागरिकांमध्ये मोठी खळबळ

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 : शिर्डी लगतच असणाऱ्या निमगाव येथे पन्नास वर्षे भाजी विक्री करणा्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी व परिसर आत्तापर्यंत कोरोना मुक्त होता. मात्र निमगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासन व कोरोणा … Read more

पोलीस मागे लागले, त्याने तळ्यात उडी टाकली आणि जीव गेला…

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील बोटा-केळेवाडी येथे पाण्यावरून दोन गटांत वाद सुरू आहेत. हा वाद रविवारी चांगलाच उफाळला. एका गटाने कुऱ्हाड व दगडाने पाइपलाइन फोडल्या, तर दुसऱ्याने महिंद्रा गाडीची तोडफोड केली. परस्पर विरोधी फिर्यादीवरून ७० जणांवर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी या भागात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :डोक्यात पाटा घातल्याने पत्नीचा मृत्यू; पतीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- कौटुंबिक वादातून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घातला. जखमी झालेल्या या महिलेचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. पतीने रात्री रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे घडली. राजन याने मंगळवारी दुपारी तीन वाजता पत्नी शिल्पाच्या डोक्यात दगडी पाटा टाकला. घरात असलेल्या लहान मुलीने वडिलांचे कृत्य पाहिले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरावर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाया एका घरावर छापा टाकत ३ महिला, ३ पुरुष तसेच व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदे शहरातील श्रीगोंदे नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या मागिल बाजूस चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर श्रीगोंदे पोलिसांनी बुधवारी  छापा टाकला व आरोपीवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

क्वारंटाईन केलेले रात्री घरी झोपायला जातात,अहमदनगरच्या ‘या’ नेत्याने केले विधान

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- क्वारंटाईन केलेले लोक फक्त म्हणण्यापुरतेच क्वारंटाईन झालेले आहेत. प्रत्यक्षात रात्री ते झोपायला आपापल्या घरी जातात, असे विधान खासदार सुजय विखे यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ. विखे बोलत होतो. त्यांनी डॉक्टर म्हणून सल्ला देत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासकीय गोष्टींवरही भाष्य केले. कोल्हापूरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 5 व्यक्तींना कोरोनाची लागण ! वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी 5 कोरोना बाधित व्यक्तींची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 99 झाली आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे तसेच सार्वजनिक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत त्यांनी सर्दी, … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात डॉक्टरच कोरोना बाधित

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात एका डॉक्टरच कोरोना बाधित झाल्याचे लक्षात आला आहे. या डॉक्टरांना नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट संगमनेर प्रशासनाला आज दि. 27 रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे, शहरात पुन्हा प्रशासनाने सावध भुमिका घेतली असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता शोध सुरु केला आहे. या … Read more

श्रीगोंद्यात नात्याला काळीमा…नराधम भावाने बहिणीचेच अपहरण करून केला बसस्थानकात बलात्कार !

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. नराधम भावाने चुलत बहिणीचेच अपहरण करून बलात्कार केल्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ माजली आहे. भाऊ-बहिणीचे नाते सगळ्यात श्रेष्ठ, पवित्र मानले जाते. मात्र, श्रीगोंदा तालुक्यात चुलत भावाने बहिणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाच्या … Read more

सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची अवस्‍था डबल ढोलकी सारखीच – विखे पाटील

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-  सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची आवस्‍था ‘डबल ढोलकी सारखीच’ झाली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील तर सत्‍तेत राहाता कशाला? बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. राज्‍यातील निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्‍यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी केलेल्‍या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पुणे – नगर रोडवरील सुपा टोलनाका चौकात एका कारची दुभाजकास धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) (वय २५, रा.पुणे, मूळ रा.उत्तरप्रदेश), अक्षय सुनील मकासरे (वय २५, रा.औंध, कस्तुरबावस्ती पुणे), … Read more

दिलासादायक! प्लाझ्मा थेरपीने ६५ वर्षांची वृद्धा कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- लखनऊ कोरोनाच्या उद्रेकानंतर जगभरात लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतर काही वेगळे प्रयोगही केले जात आहेत, भारतात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रभावी ठरताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्यात प्रथमच, ६५ वर्षांच्या महिलेवर प्लाझ्मा थेरपीद्वारे यशस्वीरित्या उपचार केले गेले. त्यामुळे ती ठणठणीत बरीही झाली. विशेष म्हणजे या महिलेला आधीच … Read more