या तीन पायांच्या सरकारचा निषेध – माजी आमदार वैभव पिचड

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- तीन पायांच्या या राज्य सरकारचा कोरोना महामारीच्या संकटात नियोजनशून्य काम केल्यामुळे सर्वच पातळीवर ते अयशस्वी ठरले. राज्यातील आदिवासी खावटी वाटपात दुजाभाव केल्याने आज ग्रामीण आदिवासी, शेतकरी, शेतमजूर जनतेला उपासमारी सारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. भाजपच्यावतीने आम्ही काळे मास्क व काळे झेंडे दाखवून या तीन पायांच्या सरकारचा निषेध करत … Read more

कोरोना रुग्ण सापडल्याने श्रीगोंदा तालुक्यातील हा भाग सील

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील कोरोना संक्रमित भागातून श्रीगोंदे फॅक्टरी परिसरात परतलेल्या व्यक्तीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदे स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. २२ मे रोजी ही व्यक्ती गावी आल्यावर तिला श्वसनाचा त्रास जाणवत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कोरोनापाठोपाठ आता टोळधाडीचे संकट येऊ घातले आहे. अमरावती जिल्ह्यात मोसंबी पिकांवर टोळधाडीने आक्रमण केले असून खरीप हंगामात नगरसह राज्यात सर्वत्र टोळधाड येऊ शकते. टोळधाडीचे संकट थोपवण्याचे नवे आव्हान कृषी विभागापुढे आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये टोळधाडीने थैमान घातले होते. सध्या मध्यप्रदेश व अमरावतीत टोळधाड सक्रिय आहे. मध्यप्रदेशातून ही टोळधाड नगर … Read more

राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीतून कोविड-१९ साठी फक्त १७१ कोटी वितरित

चंद्रपूर, दि. 26 : केंद्र शासनाकडून राज्य शासनाला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही. राज्याच्या वाट्याच्या नियमित मिळणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीच्या प्राप्त 1611 कोटीपैकी फक्त 601 कोटी अर्थात 35 टक्के निधी कोविडसाठी खर्च करता येतो. त्यापैकी फक्त 171 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 3 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 19 व्यक्ती बाधीत आढळून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- बाहेरून येणार्या लोकांमुळे अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे, समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात हा तिसरा रूग्ण झाला आहे. तो 19 मे रोजी गावात आला होता. त्यानंतर त्याला काल जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ खात्याचा लिपिक लाच घेताना पकडला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला. राहुरी येथे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. अशिफ जैनुद्दिन शेख (वय 41 वर्षे, वर्ग 3 लिपिक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, राहुरी, रा:- सोनार गल्ली, राहुरी, ता राहुरी, जि अहमदनगर) हे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदारास … Read more

पारनेर मध्ये पुन्हा मुबंईहुन आलेल्या व्यक्तीचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जामगाव येथे मुबंईहुन आलेल्या वृद्ध व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा वृद्ध व्यक्ती संपूर्ण कुटुंबासह दि 12 रोजी मुंबई येथून आपल्या गावी आला होता. काल दि 25 रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात दाखल केले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- लॉकडाऊन शिथील झाल्यापासून पुणे-मुंबईहुन आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्याने नगरकर चिंतेत होते. या पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्यामध्ये भीतीचे वातावरण होते. आज संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये तपासणी केली असता जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अहवाल निगेटिव्ह आल्याने नगरकरांना दिलासा … Read more

पाहुण्यांमुळे अहमदनगर कोरोनामुक्त होऊ शकलेले नाही…

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. परंतु हा आजार शहरी भागात होता. ग्रामीण भागात याचा शिरकाव झालेला नव्हता ही समाधानकारक बाब होती. परंतु मजुरांच्या स्थलांतरानंतर मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनेक गावांनी तर शहरातून आलेल्यांना गावाबाहेरच विलगीकरणाची सोय केली आहे. नगर जिल्ह्य़ात कोरोनाग्रस्तांची संख्या ७५ झाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  कर्जत तालुक्यातील खांडवी येथे परवा झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या काकासाहेब मच्छद्रिं तापकीर वय ३० या तरूणाचा काल दुपारी नगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खांडवी येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी (९ एप्रिल) दोन गटात वाद झाला. त्यावेळी दोन्ही गटांनी कर्जत पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या वादात … Read more

या कारणामुळेच पाचपुते झाले पुन्हा आमदार, विरोधकांनी स्वतःचे सामाजिक योगदान तपासावे !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते गेली चार दशकापासून तालुक्याच्या विकासासाठी कष्ट घेत आहेत. त्याचेच फळ म्हणून त्यांना जनतेने वेळोवेळी आमदार म्हणून संधी दिली. राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीची सभागृहात ओळख या जनतेने निर्माण करून दिली.काम करणाऱ्या बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करण्यापूर्वी घनश्याम शेलार यांनी स्वतःचे सामाजिक योगदान काय, हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती कोरोना रुग्ण ? वाचा तुमच्या भागातील रुग्णांची माहिती

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 16 … Read more

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला…ही हत्या आहे की आत्महत्या तपास पोलिसांकडे

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मढी व रांजणीलगत डोंगरात सोमवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताचे वय अंदाजे ५५ वर्षे असून चार दिवसांपासून हा मृतदेह तेथे असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. जनावरे चारण्यासाठी गेलेल्या रांजणी येथील गुराख्याने हा मृतदेह पाहिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत लिंबाच्या झाडाखाली होता. … Read more

साई मंदिर ‘या’ दिवसापासून होणार सुरु ?

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- साईसंस्थान प्रशासन 1 जूनपासून साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत झाली आहे. याबाबत शासनाकडे कोणताही प्रस्ताव मांडला नाही. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंंगची व्युहरचना आखण्यात आल्याने दीर्घकाळ बंद असलेले साईमंदीर खुले होण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविक प्रतिक्षा करत आहे. शिर्डीत विमानसेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. साईबाबा संस्थानने … Read more

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले मंत्री अशोक चव्हाण अहमदनगर मध्ये आले आणि….

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेडहून ते रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना झाले. नगरमध्ये काँग्रेसचे नेते विनायक देशमुख यांच्या घरून आणलेला चहा त्यांनी घेतला. मुंबईला जाण्यासाठी विशेष विमान उपलब्ध न झाल्यामुळे चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून जावे लागले. दुपारी रस्त्यात असतानाच त्यांच्या स्वीय सहायकाचा देशमुख यांना फोन आला. आम्ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू!

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  संगमनेर शहरात एका मुंबईहून आलेली कोरोनाबाधित महिला मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळून आले होते. त्यामुळे रुग्णाला दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. कालच तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान काल दि. 25 रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 03 कोरोना पॉझिटिव्ह, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून … Read more