…मग ते कार्यक्रम करतात, मंत्री तनपुरेंचा ‘त्या’ नेत्यास इशारा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पवार कुटुंबीय सभ्य, सुसंस्कृत आहे. मात्र टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रमही करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना इशारा दिला आहे. तनपुरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही … Read more

अहमनगर करांसाठी आंनदाची बातमी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील ६ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते. त्यापैकी सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २ अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान आज जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

आज कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ,कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 33 हजारवर !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

मोदी सरकारकडून सामान्य जनतेला दिलासा नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे. पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्याकरिता कोणतीही ठोस योजना नसल्याने आता जनतेला तहान लागली असताना … Read more

चारित्र्याचा संशय घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  चारित्र्याचा संशय घेवून एका महिलेस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील भातोडी येथील किरण किसन काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. साक्षी किरण काळे असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे. साक्षी काळे यांनी कापूरवाडी येथील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी भाऊसाहेब राजाराम धामणे … Read more

साखर कारखान्यामध्ये लागली अचानक आग, बगॅसचा डेपो भस्मसात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या भुस्सा डेपोला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत बगॅसचा एक डेपो भस्मसात झाल्याने कारखान्याचे अठरा लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. शनिवारी रात्री साडेआठ वाजता कारखान्याच्या बगॅस (भुस्सा) डेपो … Read more

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात;दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील माहुली घाटानजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने विवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला. एकनाथ नामदेव मोहिते (वय ५०, रा. जांबुत बुद्रुक, ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा दुचाकीस्वार नाशिक-पुणे महामार्गाने संगमनेरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने … Read more

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात असणार 5 झोन, असे असतील नियम आणि अटी

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- आजपासून 31 मे पर्यंत देशात लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. दरम्यान गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. With a view to ensuring safety in offices and workplaces, employers on best effort basis should ensure that Arogya Setu is installed by all employees having … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे अनिल खंडू गोर्डे( वय ४५) व कार्तिक गोर्डे (वय १९) या चुलत्या पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कार्तिक सुनील गोर्डे पिंपळगाव निपाणी येथील शेततळ्यातील लिकेज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डिझेलचा टँकर उलटला ; मास्क घालत नागरिकांनी लुटले डिझेल !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- करंजी घाटात अवघड वळणावर परभणीकडे जाणारा डिझेलचा टॅंकर उलटला. त्यामुळे हजारो लिटर डिझेल रस्त्यावर वाहिले. डिझेल भरण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती. डिझेल घेवून जाणारा टँकर नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टँकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटात डिझेलचा पूर चालला होता. आज सकाळी करंजी घाटातील अवघड वळणावर चालकांचा … Read more

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव जवळ तुकाई शिंगवे शिवारात स्कार्पिओ व ईनोव्हा या दोन गाड्याच्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. हि घटना आज दुपारी तीन वाजता घडली. नगर-औरंगाबाद महामार्गावर अहमदनगरहून येणारी स्कार्पिओ गाडी एम एच १६ बी.झेड ७७ तुकाईशिंगवे फाट्यावर असताना औरंगाबादहुन भरधाव वेगात येणाऱ्या ईनव्हा गाडी एम एच १४ … Read more

धक्कादायक : दारु पिऊ न दिल्याने चाकुने भोकसले!

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 : संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे दारुच्या वादातून एका तरुणास चक्क चाकुने भोकसल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.14) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. समाजमंदीराच्या जवळ दारु पिण्यास मनाई केल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्रथमदर्शनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे. यात काशिनाथ पुंजाजी जगताप (वय 36) यांच्या छातीवर तसेच पोटावर वार करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन चालकांकडे मागितली खंडणी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन येथील दत्त हॉटेल येथे सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राचे छायाचित्र काढून सामाजिक कार्यकर्त्याने शिवभोजनची तक्रारी थांबविण्यासाठी 5 लाख रुपयाची खंडणीची मागणी केल्याची तक्रार अजित गायकवाड यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला केली आहे. शहरात शिवभोजनच्या तक्रारी वाढल्या असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. दि.15 मे रोजी शिवभोजन थाळीचे … Read more

हिवरे बाजारच्या नावलौकिकास बाधा !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही अवैध व्यावसायिक हिवरे बाजार व परिसरात अवैध जड वाहतूक केली जात आहे. यापूर्वी अशी वाहतूक कधीही होत नव्हती. येथील रस्त्यांचे नुकसान होत आहे, तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याने रात्री अपरात्री शेती अथवा इतर काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील लॉकडाऊन ‘या’तारखेपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारी खाजगी बस उलटली

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पुणे येथून इलाहाबादकडे मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून चार मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा फाटा येथे आज पहाटेच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथून ही बस उत्तरप्रदेश राज्यातील इलाहाबादकडे २६ मजुरांना घेऊन निघाली होती. सदर खासगी बस ( क्र … Read more

अहमदनगरच्या ‘या’ उद्योजकाला 5 कोटी 86 लाखांचा ‘चुना’

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नवी मुंबई येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा . लि ( खारघर ) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा चुना लावला. अहमदनगर एमआयडीसीतील जे.एम. इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक निखिलेंद्र मोतीलाल लोढा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 38 गुन्हे करणारा ‘हा’ वॉन्टेड आरोपी टोळीसह पोलिसांच्या जाळ्यात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पूर्वीचे 35 व आता लागोपाठ तीन गुन्हे असे एकूण 38 गुन्हा केलेला वॉन्टेड नाशिकच्या किरण उर्फ अॅन्थोनी छगन सोनवणे (वय ३२) याच्यासह त्याची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. दोन गावठी कट्ट्यांंसह सात जिवंत काडतुसे, दोन मोटारसायकली, 7 मोबाइल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. किरण उर्फ अॅन्थोनी … Read more