ट्रॅक्टरखाली चिरडून शेतमजूर महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरेजवळील जवाहरवाडी येथील शेतमजूर वृद्धा ट्रॅक्टरखाली चिरडली गेल्याने ठार झाली. बबनबाई किसन गढवे असे तिचे नाव आहे. टिळकनगरलगत शेतकऱ्याने दोन एकर कांदा लागवड केली होती. जवाहरवाडी परिसरातील बारा शेतमजूर महिलांची टोळी कांदा वाहतुकीचे काम करायला गेली होती. दुपारी तीनच्या सुमारास काही महिला ट्रॅक्टरच्या मागील बाजूने, तर काही … Read more

‘त्या’ महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-कोरोनामुळे निघोज येथील ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. तथापि, मृताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. इतर नऊ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने पिंपरी, निघोज, चिंचोली, पठारवाडी हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे. गुरुवारी … Read more

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत ३० मेनंतर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 15 : कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके,माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस … Read more

मोठी बातमी : अहमदनगर शहरातील दोघांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या आता 62 !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- अहमदनगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आज हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी … Read more

‘जीमेल’वरुन करता येणार 100 जणांना व्हिडिओ कॉल, ते ही फ्री !

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी आणि एकाच वेळी अनेकांशी व्हिडीओ मीटिंग करण्यासाठी गुगलने Google Meet हे अ‍ॅप लॉन्च केले. आता या अ‍ॅपचा वापर जीमेलद्वारेही करता येणार आहे. ते ही संपूर्ण मोफत. यावरून एकाच वेळी 100 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जीमेलद्वारेच Google … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये टळली पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड गैरसमजुतीतून झाले होते, पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती अहमदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली  आहे. नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी रात्री असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मिरजगाव नजीकच्या बावडकरपट्टी येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील सहादू बावडकर ( वय : ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेतातील बोअरवेल चालू होत नसल्यामुळे बावडकर हे केबल कुठे खराब झाली आहे का ? याची पाहणी करत होते. त्यावेळी विजेचा … Read more

Social Distancing चं उल्लंघन करणाऱ्यांस टॉयलेट साफ करण्याची शिक्षा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव मार्ग सध्या आहे. मात्र अनेक नागरिक या सुरक्षेच्या उपायांपासून दूर पळताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना इंडोनेशियामध्ये अजब शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल … Read more

अफवांवर विश्वास ठेवू नका : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :-  कोरोना तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क … Read more

माजीमंत्री राम शिंदेनी सांगितले उमेदवारी न मिळाल्याचे कारण !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पक्षांतर्गत कोणत्याच वादावर कधीही जाहीर भूमिका न घेणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील या विषयावर सोशल मिडीयातून आपली नाराजी व्यक्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत वेळी पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती तेव्हापासून पक्षांमध्ये अंतर्गत वाद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अवघ्या एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारातील उज्ज्वला चव्हाण हिच्या घरी बुधवारी रात्री ही घटना घडली. मागील भांडणातून आरोपींनी उज्ज्वला हिच्या एक महिन्याच्या अर्णवच्या डोक्‍यात दगड घालून त्यास ठार केले. अर्णव अभिषेक चव्हाण (वय 1 महिना) असे मृत बाळाचे नाव … Read more

धक्कादायक : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, वाचा जिल्हानिहाय तपशील

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

डॉ.नीलम गोऱ्हे यांचा संक्षिप्त जीवन परिचय

नाव : डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे शिक्षण : बी. एस. ए. एम. (मुंबई विद्यापीठ – पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय), १९९२ बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमा. ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी अपत्ये : एकूण १ (१ मुलगी) व्यवसाय :  वैद्यकीय / सामाजिक कार्य पक्ष : शिवसेना मतदारसंघ – महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित इतर माहिती : सध्याचे राजकीय पदे  – शिवसेना प्रतोद … Read more

अहमदनगर शहरात बुलेटने घेतला आजोबांचा जीव !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर शहरात दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बबन भानुदास तोडमल ( वय- ६० रा . बुन्हाणनगर नगर ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी ( दि १० ) सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर- बुन्हाणनगर रोडवरील बोचरी नाक्याजवळ घडली . याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात … Read more

कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत … Read more

अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स14 मे 2020, वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या ०७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा असून आज रात्री पुन्हा १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू … Read more