महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार ‘तो’ पर्यंत राहणार बंदच !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक ०३ मेपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्‍त एकाच भाजीपाला विकेत्‍यास गर्दी … Read more

…तर अहमदनगर मधील कंपन्या बंद होतील !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- एमआयडीसी’तील काही कारखान्यांची गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली फाटकं उघडली गेली आहेत. प्रत्यक्ष उत्पादन नसले, तरी मेंटेनन्स व पेंडिंग कामे केली जात आहेत. कामकाज सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये इंडियन सिमलेस, लार्सन अ‍ॅड टुब्रो, कमिन्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे बंधन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका, … Read more

धक्कादायक : जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडले !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- शेवगाव तालुक्यातील ढोरसडे शेत शिवारात नवजात अर्भक सापडले आहे. अवघ्या काही तासांचे असणारे हे जिवंत अर्भक ऊसाच्या सरीत टाकलेले आढळून आले. अतिशय घृणास्पद हा प्रकार घडल्याने परीसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजता कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊनमध्‍ये दारु विक्री करणार्‍या ‘या’ नऊ दुकानांचे परवाने निलंबित

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये झाल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. या लॉकडाऊनच्या काळात काही अनुज्ञप्ती अवैध पद्धतीने दारु विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष … Read more

BIG BREAKING : प्रसिद्ध हिंदी अभिनेते इरफान खान यांचं निधन

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- प्रसिद्ध हिंदी अभिनेते इरफान खान यांचे आज मुंबईतील रूग्णालयात निधन झाले, 53 वर्षीय अभिनेता 2018 पासून कर्करोगाशी झुंज देत होता. Actor Irrfan Khan passes away at Kokilaben Hospital in Mumbai while battling a rare cancer. He was surrounded by his family as he breathed his last: Statement pic.twitter.com/Ca4BcmE9KR … Read more

दहावीचा निकाल ‘इतके’ दिवस लांबणार!

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :-  कोरोना विषाणूच्या संकटाने शैक्षणिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, त्यामुळे दहावीचा निकाल यंदा आठवडाभर उशिराने लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासणीला काहीसा विलंब झाल्याने दहावी परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेपेक्षा आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. संचारबंदीमुळे उत्तरपत्रिकांच्या संकलनावरदेखील … Read more

धक्कादायक : एका मृत व्यक्तीमुळे पाच कुटुंबांतील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांपैकी १४ जणांचे अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. मंगळवारीदेखील ३१ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याने आणखी दिलासा मिळाला. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जामखेड शहरात आढळले असून जामखेड हॉटस्पॉट म्हणून प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मार्च, एप्रिलच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- रविवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी  गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  स्थानिक नागरिकांच्या मदतीने ६३ तासानंतर मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी मृतदेह शोधण्यात यश आले. संगमनेर शहरानजीकच्या फादरवाडीजवळ असलेल्या वाटीच्या डोहामध्ये या युवकाचा मृत्यू झाला. अनिल गुलाब मेहेत्रे (वय ४०, रा. मेहेत्रे मळा, जोर्वे रोड) असे या युवकाचे नाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचाच्या मुलीवर धारधार हत्याराने वार !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात अवैध धंद्यांची माहिती देणार्‍या प्रिया मधे या महिलेस पतीने धारधार हत्याराने भोकसल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्या नवर्‍यानेच माझ्यावर वार केले आहेेत. म्हणून मी जखमी झाले आहे. गेल्या पाच दिवसानंतर प्रिया यांची प्रकृती स्थिर असून या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे कोरोना न्यूज अपडेट्स, वाचा काय आले ‘त्यांचे’ रिपोर्ट्स

अहमदनगर Live24 , 28 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी २ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. #CoronaUpdates#अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ०५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी ०२ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत.@_Rahuld @bb_thorat @mrhasanmushrif @GadakhShankarao @prajaktdada @NagarPolice @MahaDGIPR … Read more

रोहित पवार म्हणाले कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही …कारण

अहमदनगर Live24 :- आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबीयांचा सर्वे करुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे सर्वे होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जामखेड शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही आता १७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपण देशाला नक्की वाचवू – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24  :- कोरोनाच्या संकटावर मात करण्यात देशाने चांगले काम केले असून अशावेळी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि निर्णयामुळे आपण देशाला नक्की वाचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. येथील जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातुन काल तालुक्‍यातील मुंगी, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, आव्हाणे, अमरापुर येथील गरजूना जीवनावश्‍यक साहित्याचे … Read more

लॉकडाऊनच्या काळात आम्हाला हवी मदतीची साथ

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमुळे यात्रा-जत्रांमधील मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यंदा रद्द झाल्यामुळे लग्न सराईही पुर्णपणे बंद असल्याने लग्नसराईतील ऑक्रेस्ट्रा गाणी व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंदी आल्याने कलावंतांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना आता मदतीचा राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी ही पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे असल्याची भावना प्रवरासंगम येथील ऑक्रेस्ट्रा गायिका मुमताज शेख … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेलला लागलेल्या आगीत सात लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24  :- शिर्डीत नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल वत्सलास भर दुपारी अचानक आग लागल्याने सात लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असल्याने यात कोणी जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मार्चपासून साईमंदिर बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल बंद आहेत. हॉटेल वत्सला … Read more

‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त … Read more

लॉकडाऊनमध्ये पोलीस उपनिरीक्षक मुलीचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा !

अहमदनगर Live24  :- लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे किरण वसंत निंभोरे आणि पोलीस उपनिरीक्षक राणी वाल्मिक डफळ या दोघांचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा नुकताच घोटवी गावी घरामध्ये पार पडला. सुमारे वर्षभरापूर्वी ठरलेल्या या विवाहासाठी अपेक्षित असणारा खर्च पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सुमारे दोन … Read more

खबरदार सोशल डिस्टन्स मोडाल तर ! पोलीस ठेवणार ड्रोनद्वारे नजर

श्रीरामपूर : सोशल डिस्टन्सच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या सबबी सांगून काही व्यक्ती, संस्था नियम मोडत आहेत. त्यांच्यावर लवकरच दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली. शिवाजी चौकात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. देशांमध्ये कोरोना बाधिताची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मामा भाच्याच्या वाद; मामाने पिले किटकनाशक तर भाच्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

अहमदनगर Live24 / श्रीरामपूर :- तालूक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्याच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी किटकनाशक पिल्याने घाबरलेल्या भाच्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या विषयी माहिती अशी की, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय ३० वर्ष) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय २२ वर्ष) हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. … Read more