शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची छेडछाड ; चौघांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्­या चौघांना भिंगार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बाकी पसार आरोपींचा भिंगार पोलिसांकडून शोध सुरू आहे. शनिवारी (दि.२२) रात्री भिंगारमधील वडारवाडी भागात काही महिला शौचालयासाठी जात असताना रस्त्यावर उभा असलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. … Read more

भोंदू बाबाकडून एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पिंपरी : पुत्रप्राप्ती आणि घरात असलेलं गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्यानं एका भोंदू बाबानं एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमनाथ … Read more

उड्डाणपुलाचे काम एका महिन्यात मार्गी लावणार

अहमदनगर : सर्वसामान्य जनतेशी आपली बांधिलकी आहे. कुरघोडीच्या बाबतीत आपणास तिळमात्र रस नाही. जनतेने सोपवलेली जबाबदारी नैतिकतेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, आपण महत्त्वाचे मानतो. उड्डाणपुलाचा विषय येत्या एक महिन्यात मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करीत के. के. रेंजसंदर्भात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ, असा निर्वाळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला … Read more

महाविकास आघाडी नसून महाभकास सरकार – पाचपुते

श्रीगोंदा:  सध्याचे महाविकासआघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे महाविकास करण्या ऐवजी शेतकरी भकास करणारे सरकार आहे अशी टीका  जिल्हा परिषद सदस्य व भाजप चे नेते सदाशिव पाचपुते यांनी तहसील कार्यालयासमोर केलेल्या निष्क्रिय सरकार च्या विरोधात भाजप च्या एल्गार आंदोलनात बोलताना केले. सध्याचे महाविकास सरकार च्या काळात सर्वात जास्त शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या दोन गावातील शेतकर्‍यांनी केली दिवाळी साजरी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी व नगर तालुक्यातील जखणगाव या दोन गावांतील 973 कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, पहिल्या दिवशी 50 टक्के कर्जदार शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले. येत्या दोन दिवसांत कर्जखात्यावर रक्‍कम जमा होणार असल्याने, या दोन्ही … Read more

विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने नगरसेवकाचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- दरोडा व विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपण व्यथित झाल्याचे सांगत पारनेर नगरपंचायतीच्या प्रभाग १५ चे नगरसेवक डॉ. मुदस्सिर सय्यद यांनी सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा नगपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द केला. आपल्या राजिनाम्यामध्ये डॉ. सय्यद म्हणतात, २१ रोजी आपण आपल्या घरी असताना फोन करून आपणास आंनद हॉस्पिटलसमोर बोलावण्यात … Read more

अहमदनगरमध्ये गुटख्याबरोबर माव्याची विक्रीदेखील बंद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरमध्ये सर्रासपणे विक्री होणारी गुटखा विक्री अखेर तात्पुरती बंद झाली आहे. गुटख्याबरोबर माव्याची विक्रीदेखील बंद करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत श्रीगोंदे मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी नगरमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले दुसर्‍या पक्षात जाण्याची गरज नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी भाजपमध्ये नाराज नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडीचे अधिकार संघटनेला होते. भविष्यातही आपण पक्षात प्रामाणिकपणे काम करू. मी सर्वसामान्य लोकांतून निवडून आलो आहे. पक्षाचे काम करणे ही माझी नैतिकता आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. वडिलांना राज्याचे मंत्रिपद दिले. आजमितीस पक्षात मानसन्मान देखील … Read more

तृप्ती देसाई यांच्या तोंडात शेण घालणार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासायच्या आधी आम्ही तृप्ती देसाईच्या तोंडात शेण घालू, असा इशारा कळसच्या इंदूबाई वाकचौरे यांनी दिला. कळस बुद्रुक ग्रामपंचायतीने निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या ग्रामसभेत त्या बोलत होत्या. ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून विष्णू महाराज वाकचौरे होते. यावेळी सरपंच योगिता वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, ग्रामपंचायत सदस्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील रमेश पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तीला दवाखान्यात दाखल केले. … Read more

कारच्या अपघातात दोन ठार; पाच जखमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :– शिर्डीतून साईदर्शन घेवून येत असलेल्या कारवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर जावून धडकली.यात अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाचही जखमी गंभीर असल्याने त्यांना साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा अपघात शिर्डी-मनमाड रस्त्यावर जंगली महाराज आश्रमाजवळ शुक्रवारी सकाळी 8.30 सुमारास … Read more

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जनादेशाचा अपमान करुन सत्तेवर आलेल्या शिवसेना-कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने दि. 25 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी … Read more

मला विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास सोने करील: राम शिंदे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेले दहा वर्षांत केलेले काम व विशेषतः पाच वर्षे जलसंधारणाच्या खात्यामार्फत केलेले काम व माझ्या कामाचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाने आगामी राज्यसभा अगर विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास त्याचा फायदा जिल्हा व राज्यासाठी करून दिलेल्या संधीचे सोने करील, अशी भावना माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्‍त केली. प्रा. शिंदे तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले … Read more

“ताई, आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर”! 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन इंदोरीकरांच्या चांगल्याच अडचणी वाढल्या. आता इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ तरुणाई पुढे सरसावली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक क्रेझ असणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर एक नवीन गाणं काढण्यात आलं आहे. “ताई, … Read more

अहमदनगरकरांचे दुर्दैव: ‘तो’ कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाणार!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील तारकपूर ते सर्जेपुरा एसटी वर्कशॉप व उपनगरातील टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महल पर्यंत मंजूर असलेली कोट्यवधी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे कार्यारंभ आदेश देऊनही ठप्प आहेत. नगरोत्थान योजनेच्या व्याजाच्या रकमेतून ही कामे मंजूर असून, लवकरात लवकर कामे न झाल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची दाट शक्‍यता आहे. कंपाऊंड वॉल, झोपडपट्टीची … Read more

मुलीचा पाठलाग केल्याने दहा तरुणांनी केला एकाचा खून 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-   सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथे किरकोळ वाद आणि मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणातून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलिसांनी यांनी ही कारवाई केली. जखमी कुल्लोळी याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या मारहाणीत आकाशचा मित्र महेश कल्लोळी (१०) गंभीर जखमी झाला. … Read more

टोमॅटोला मिळाला दीड रुपया भाव !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  खरेदीसाठी गिऱ्हाईक नसल्याने तब्बल १ टन टोमॅटोसाठी पदरमोड करून माघारी नेण्याची दुर्दैवी वेळ सोनई येथील शेतकऱ्यांवर आली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मोंढ्यावर रविवारी सकाळी सोनई येथील शेतकरी वसंतराव गडाख यांनी आपल्या शेतीत दीड टन टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. गडाख यांना सोनई ते राहुरी या वाहतुकीसाठी २० किलो टोमॅटो … Read more

धरणात बुडालेल्या त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी: मुळा धरणाच्या पाण्यात बुडालेल्या स्थानिक तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यासाठी अहमदनगर महापालिकेच्या विशेष पथकाला यश आले. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी दुपारी १ वाजता नानासाहेब जाधव या तरुणाचा मृतदेह मुळा धरणाच्या ठाकरवाडी परिसरातील पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शनिवारी सायंकाळी ५ वाजता मुळा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या नानासाहेब जाधव (वय ३५) चक्कर आल्याने … Read more