वारिस पठाण यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी

संगमनेर:  आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केल्याने भाजपच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक अभय परमार याना निवेदन देण्यात आले .“हम १५ करोड है मगर १०० करोड को भारी है, असे चिथावणिखोर वक्तव्य जाहीर सभेत केले. हिंसेस प्रवृत्त करणारे वक्तव्य लोक प्रतिनिधीना अशोभनीय आहे. पठाण विरुद्ध कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले. भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, ज्येष्ठ … Read more

शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा: आमदार जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत गाडगेबाबा यांनी अनेक वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्त्व देशाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले आहे. गावोगावी स्वच्छतेतून आरोग्याचे महत्त्व समाजाला कळावे, यासाठी ते अनेक ठिकाणी जाऊन सांगत असत. दगडात नव्हे तर माणसांत देव पाहण्याचे त्यांनी शिकवले. गाडगेबाबांचे विचाराने स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी हागणदारीमुक्ती योजनेतून गावांना दिशा दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

अहमदनगर – पुणे महामार्गावर रुग्णवाहिका उलटली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यातील रुईछत्तीशी येथून अतितातडीने एका महिलेला प्रसूतीसाठी पुणे येथे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात होऊन उलटली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली असून चालक व सदर रुग्णवाहिकेमधील डॉक्‍टरांना किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात कोरेगाव भीमा नजीक वाडागाव फाटा येथे येथे झाला.   याबाबत लक्ष्मण दादू ओव्हाळ (रा. लोहगाव, पुणे) यांनी शिक्रापूर … Read more

इंदोरीकर महाराजांच्या विरोधात बोलल्यास खपवून घेणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे कीर्तनसेवेतून जे म्हणाले ते आमच्या अभ्यासक्रमात आहे. तृप्ती देसाईंना हे कधीही कळणार नाही. प्रसिद्धीसाठी चुुुकीचे करण्याचा प्रयत्न करू नकोस. याही उपर काही बोलायचेच असेल तर भारत सोडून पाकिस्तान किंवा इतर राष्ट्रांत जावेे लागेेेल, असा इशारा अकोल्याचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी भूमाता ब्रिगेेडच्या अध्यक्ष तृृप्ती … Read more

रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांची छेड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांनाची छेड काढणार्‍या टोळक्यावरून भिंगारमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे सुमारे दोनशे ते अडीशे लोकांचा जमाव भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.  याप्रकरणी महिलांना त्रास देणार्‍या हयाब्रेड उर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा, तन्नु ऊर्फ तन्वीर, सलमान … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्य मंत्रिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अधिवेशन असून विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार येणार आहे. दुसरी यादी … Read more

श्रीगोंद्यात दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीने २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान शेतातील आंब्याच्या झाडाला अंगातील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नगिना हारुण सय्यद असे मृत मुलीचे नाव आहे. श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील हारुण सय्यद यांची इय्यता दहावीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी नगिना हिने आत्महत्या केली आहे. २२ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातात राहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा मृतु झाला. नंदकिशोर संपत निर्मळ (वय २८) गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय ६३, दोघेही रा.पिंपरी निर्मळ ता.राहाता), प्रवीण सारंगधर … Read more

गोदावरी नदीत उसाचा ट्रॅक्टर कोसळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव तालुक्यातील वारी गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही,ट्रॉलीचे व शेतक-याच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा मात्र ऊस वाहतूक करणा-या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून मृतदेह जाळल्यानंतर आरोपी पोलिसात हजर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकुरखे गावात घडली आहे.चारीत्र्याच्या संशयावरून पतीने त्याच्या पत्नीचा निर्घृणपणे हत्या करत तिचा मृतदेह जाळला. याबाबत सविस्तर माहीती अशी की सुनील जनार्दन लेंडे हा एकुरखा शिवारात राहायचा त्याचे 2008 साली छाया हिच्यासोबत लग्न झाले होते त्यांना तीन मुले आहेत. सुनील हा … Read more

दम असेल तर अकोल्यात येऊन दाखवा मुंडन करुन परत पाठवू

अहमदनगर : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. या सभेत बोलताना शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांच्यावर हमाला चढवला. तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं, त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, असा इशारा  आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना दिला. “तृप्ती देसाई नगर जिल्ह्यात जेव्हा आल्या तेव्हा इतका मोठा … Read more

सत्तेत सहभागी होताना दिलेल्या आश्वासनांचा विसर खुद्द मुख्यमंत्र्यांना पडला !

शिर्डी :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आणि सरकारला  महीला अत्याचाराच्या घटना रोखण्यात येत असलेले अपयश स्पष्टपणे समोर आले आहे. सुरु असलेल्या योजनां बंद करुन स्वतःचे अपयश झाकणाऱ्या या नाकर्त्या स्थगिती  सरकारला जाब विचारण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी सर्वच तहसिल कार्यालयांवर आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे  आवाहन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

‘चलो एक पहल की जाये नये रास्ते की ओर’ म्हणजे नक्की काय ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी शहरात स्वत:च्या नावे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्यात भाजप अथवा जनसेवा मंडळाला त्यात कुठलेही स्थान दिले नाही. मात्र, भाजप कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वीसहून अधिक नगरसेवकांची मोट बांधत विखे यांनी श्रीरामपुरात तयार केलेला ‘चलो एक पहल की जाये नये रास्ते की ओर’ हा … Read more

कोरोनामुळे चिकन झाले इतके स्वस्त …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोरोनामुळेे कुक्कुटपालनाला लागलेले अफवांचे ग्रहण अधिकच गडद झाले आहे. मांसाहाराने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्यानंतर चिकनचे कोसळणारे दर सावरलेले नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. करोनाचा प्रभावामुळे राज्यात चिकनची मागणी घटली. नगर जिल्ह्यातील चिकन विक्रीचा दर 50 रुपयांनी कमी झाला आहे. करोनाच्या अफेवेमुळे राज्यात … Read more

आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची राज्याला वेगळी ओळख होती. शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून मोठया कष्टाने त्यांनी नगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर नेले, त्यामुळे बाजार समितीचे नामांतर कुठल्याही राजकीय हेतूने केले नसल्याचा टोला माजी मंत्री … Read more

१ कोटी ३३ लाखांची फसवणूक

संगमनेर: संगमनेर येथील सुकेवाडी भागातील व्यापारी मनोहर दगडू सातपुते यांच्याकडून उत्तर प्रदेश येथील आरोपी अमन राजपूत , मनोहर राजपूत रा . ललई , पोस्टे खेरगड , फिरोजाबाद या दोघांनी वेळोवेळी कांदा माल खरेदी केला. हा कांदा ट्रकने पाठविण्यात आला . या सर्व कांद्याची रक्कम १ कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपये झाली. हे पैसे … Read more

विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोळ्यात फेकली मिरची

संगमनेर- संगमनेर शहरात शिवाजीनगर परिसर विद्यानगर भागात राहणारी एक २६ वर्षाची विवाहित तरुणी महाशिवरात्रीला दर्शनासाठी जाण्यासाठी गाडीत बसत असताना  आरोपी सागर बाळासाहेब कळंबे, रा. शिवाजीनगर, राहुल आव्हाड , रा. विद्यानगर या दोघांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन धरुन ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. महिलेने प्रतिकार करताच गाडीच्या बाहेर ओडून मारहाण केली. यावेळी … Read more

मुळानदीत कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

राहुरी : राहुरीच्या कृषी विद्यापिठात ठेकेदार मार्फत नोकरीस असलेल्या २३ वर्षिय युवकाचा मुळा नदीपात्रात आज शनिवार दि . २२ फेब्रुवारी रोजी सकाळी मृतदेह आढळुन आला असल्याने मोठी खळबळ उडाली असुन या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. याबाबत राहुरी पोलिसात सुरवातीस मिसिंग दाखल करण्यात आली होती तर आज आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली … Read more