अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : देवळाली प्रवरा येथे सोसायटी चौकात राहणाऱ्या एका तरुणाने काल (मंगळवारी) पहाटे घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजित दिलीप गुलदगड (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही. मयताच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात … Read more

श्रीगोंद्यातील त्या गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीगोंदा : गुटखा विक्री व साठा करण्यावर बंदी असताना त्याची विक्री व साठा केल्याप्रकरणी शहरातील दीपक पोपट लोखंडे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा हा १२ ते १३ ज़ानेवारी २०२० दरम्यान घडला होता; परंतू १७ फेब्रुवारी २०२० रोजी याबाबत गुन्हा … Read more

अहमदनगर शहरात एका दाम्पत्यास मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:-  माळीवाडा येथील चंदूकाका सराफ दुकानाजवळ शकिला अस्लम शेख, त्यांचे पती व मुलीस मारहाण करण्यात आली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी सचिन बेल्हेकर, मयुर कानडे, डेव्हिड कानडे, निर्मला विलास कानडे, प्रिती विलास कानडे, ताराबाई बेल्हेकर, मनिषा बेल्हेकर, जया कानडे, संदीप बेल्हेकर यांच्या पत्नीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more

माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्याला आग लागून झाले ‘इतक्या’ कोटींचे नुकसान !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्यात सोमवार, दि.१७ रोजी दुपारनंतर लागलेल्या आगीत कोल बॅग व मशिनरी विभागाचे अंदाजे पाच ते सव्वापाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाने पेट घेतल्यामुळे ही आग लागण्याची श्यक्यता कारखाना व्यवस्थापक जरे यांनी बोलताना दिली. आग … Read more

कोण होणार राहुरीचा नगराध्यक्ष ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राहुरी  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील निवडणूक नेमकी सर्वसाधारण मतदारांमधून होणार किंवा नगरसेवकांतून होणार याबाबत चर्चांना आता वेग आला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक येथून पुढे जनतेतून न होता निर्वाचित नगरसेवकांमधून होणार, हा नियम ठाकरे सरकारने आणताना भाजपा सरकारचा जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा फतवा मोडित काढला आहे. राहुरी पालिकेत … Read more

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा ‘यू टर्न’ पुन्हा महाविकास आघाडीत ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भाजपची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगत आहेत.  आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. विशेष … Read more

बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव : शहरातील एका बिल्डरने अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असलेल्या साइटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे बिल्डर व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (५४, रा.अष्टभुजानगर) असे मृताचे नाव आहे. ते मूळचे वढोदा (ता.चोपडा) येथील रहिवासी आहेत. सूर्यवंशी यांच्या शहरातील काही भागात बांधकाम साइट सुरू … Read more

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना डी.लिट. पदवी प्रदान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे आणि देशसेवेमुळे डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी. लिट. या पदवीने गौरव करण्यात आला. नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भव्य सोहळ्यात आठवले यांना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) … Read more

विवाहित महिलेचा विनयभंग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधीत महिला आपल्या कुटुंबासोबत मांडवे बुद्रुक याठिकाणी राहाते. सोमवारी सकाळी महिला एकटी आपल्या घरात होती. त्यावेळी योगेश कारभारी खेमनर हा महिलेच्या घरात आला व म्हणाला की … Read more

बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील वाकडी येथील लांडेवाडी-नांदूर रस्त्यावरील शिंदे-आहेर वस्ती परिसरात एका बिबट्यासह दोन मोठे बछडे असल्याचे आढळून आल्याने या परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपूर्वी शिंदे वस्ती येथील एक शेतकरी पहाटे जनावरे ओरडत असल्याने घरातून बाहेर आले असता त्यांना बिबटे दिसले. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वस्तीवरील सर्व जागे होऊन त्यांनी … Read more

लक्झरी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण ठार 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भरधाव वेगातील लक्झरी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी निघोज फाट्याजवळील गव्हाणवाडी शिवारात घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात ऋषिके सुदाम झरेकर गंभीररित्या जखमी होवून ते मृत पावले. विशाल सिताराम कळमकर (वय २५, रा.कळमकरवाडी, ता.पारनेर) यांनी … Read more

नामदार बाळासाहेब थोरात विरोधकांना सपशेल अपयश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. थोरात यांच्या पॅनेलविरोधात उमेदवार देण्यात थोरात विरोधकांना सपशेल अपयश आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची निवडणूक मार्चमध्ये होणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज मगे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. सुरुवातीपासूनच एकतर्फी असलेल्या या … Read more

इंदूरीकर महाराजांबद्दल सिंधूताई सपकाळ म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : इंदूरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील, त्याचे इतके काय भांडवल करताय. बोलून गेले ते शब्दांचे वारं होते, त्यांना एव्हढे मोठे करण्याचे कारण नाही, असे मत समाजसेवीका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. त्या राहता तालुक्यातील श्रीगणेश शैक्षणीक संकुलाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. इंदूरीकर यांचे कार्य महान आहे. त्यांनी आपल्या … Read more

राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा भर कार्यक्रमात राडा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अकोले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बोलविलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राडा घातल्याने निवडीविनाच हा मेळावा आटोपता घ्यावा लागला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आ. डॉ. लहामटे यांनी गचांडी पकडल्याने सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक्‌ झाले. यावेळी आ. डॉ. लहामटे यांनी अक्षरशः त्या कार्यकर्त्यावर शिव्याची लाखोली … Read more

धक्कादायक ‘या’ प्रयोगशाळेतून पसरला कोरोना?

बीजिंग : कोरोना व्हायरस सीफूडमुळे पसरला नसून चीनमधील जैविक प्रयोगशाळेतून पसरल्याचा दावा दावा काही अहवालातून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चीनमध्ये थैमान माजविणाऱ्या कोरोना विषाणूची भीती जगभर पसरत असताना या विषाणूचा प्रसार चीनच्या प्रयोगशाळेतून झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. वुहानच्या मासे बाजारातील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा प्राणघातक विषाणू सगळीकडे पसरल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने केली आईची हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुलीबरोबर लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या आईची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत सविता सुनील गायकवाड ( वय ३५ ) ही महिला ठार झाली . ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली . या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर … Read more

इंदुरीकर सातत्याने कीर्तनातून महिलांचा अपमान करत आहेत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्य़ाप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी देसाई यांनी मंगळवारी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन दिले. त्यांच्याबरोबर काही महिला कार्यकर्त्याही होत्या. कीर्तनातून प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी ४ फेब्रुवारीच्या कीर्तनात पीसीपीएनडीटी कायद्याचे उलंघन करणारे विधान केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कीर्तनातून वारंवार महिलांचा … Read more

लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांनी झालेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी २५ ते ३० जणांवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोन गटांतून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गुन्हा दाखल झाला. यासंबंधी इंदिरानगर कोपरगाव येथील शमिना कलिम शेख हिने दिलेल्या … Read more