इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात. … Read more

राम शिंदे यांच्या मुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ 

माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली आहे.  याप्रकरणी कोर्टाने रोहित पवार यांना 13 फेब्रुवारीपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोर्टात रोहित पवारांना बाजू मांडावी लागणार आहे. या याचिकेमुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे . रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनो व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात दि.६ फेब्रुवारी रोजी दाखल … Read more

‘असे’ झाले त्या आरोपींचे कट रचून पलायन !

कर्जत : कर्जत पोलिसांच्या ताब्यातील पाच आरोपी काल पळून गेल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे यांनी आज येथे भेट देऊन पाहणी केली. आज एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. येथील उपकारागृहातून. दि ९ फेब्रु. रोजी पाच आरोपींनी छतावरून पलायन केले. याबाबत आज या बराकीतील वस्तुस्थिती पाहिली असता, बराकीत प्लायवूडचे … Read more

धक्कादायक : अवघ्या एका महिन्यात अहमदनगरमधून 37 अल्पवयीन मुलींला पळविले !

जिल्ह्यामध्ये जानेवारीत 37 अल्पवयीन मुलींला पळविले असल्याचे समोर आले आहे. या 37 मुलीपैकी 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारीमध्ये आठ मुलांचे देखील अपहरण झाल्याचे गुन्हे जिल्ह्यातील संबंधीत पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या आठ पैकी तीन मुलांचा शोध लागला आहे. श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतून सार्वाधिक चार, पारनेर, पाथर्डी, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंतप्रधान उज्वला योजनेतून मिळालेल्या सिलिंडरचा स्फोट

नगर तालुक्यातील भोरवाडी येथील पद्मावती वस्तीवर घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना आज रात्री साडेसात वाजता घडली.  विमल बबन जाधव यांच्या घरात ही घटना झाली. विशेष म्हणजे, हा सिलिंडर पंतप्रधान उज्वला योजनेतून मिळालेला आहे. विमल जाधव या स्वयंपाकाच्या तयारी करत होत्या. त्यामुळे त्यांनी गॅस शेगडी पेटवली. परंतु सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळ गॅस गळती सुरू झाली. त्याच … Read more

बाजार समितीच्या आवारातून दोन टन कांदा चोरला

नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून खरेदी केलेला दोन टन 934 किलो कांदा चोरून नेल्याची घटना 4 जानेवारी रात्री घडली.  याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा व्यापारी बाळासाहेब बायाजी आंधळे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.आंधळे नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा व्यापारी आहेत. … Read more

तरुणाची कालव्यात उडी घेत आत्महत्या

श्रीरामपूर :- येथील कृष्णा बाबासाहेब साबळे (वय ४१) यांनी शहरातील कालव्यात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अशोकनगर परिसतील कालव्यात नागरिकांना साबळे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते, पत्नी, भाऊ, तीन बहिणी, चुलत भाऊ असा परिवार आहे. साबळे शुक्रवारपासून बेपत्ता होते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या कॉलेजमध्ये होतेय रॅगिंग ?व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पारनेर अळकुटी रोडवर असणार्‍या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका विद्यार्थ्याबरोबर इतर सहा ते सात विद्यार्थी रॅगिंग करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रॅगिंगचा प्रकार की अन्य काही याचा तपास या औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या समितीने सुरू केला असून या संबंधीची लेखी तक्रार संस्थेतील एका विद्यार्थ्यासह पालकांनी केली आहे. तर दुसरीकडे या … Read more

भाजपच्या तालुकाध्यक्षपदावरून पारनेर भाजपमध्ये अंतर्गत वाद

जिल्ह्यातील काही नेत्यांनी पारनेरचे तालुकाध्यक्षपद वसंत चेडे यांना देऊन सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय केला. शिष्टमंडळ लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कुणीही चालेल, चेडे नको अशी भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी दिली. कोरडे यांच्या निवासस्थानी रविवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युवक युवतींना पोलीसी पाहुणचार

श्रीगोंदा पोलिसांनी मागील काही दिवसांपासून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या, कायदा मोडणाऱ्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला असून त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुपारी अचानक शहरातील काही कॅफे सेंटरवर जाऊन त्यांची तपासणी केली.  शहरात कॅफे सेंटरमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी अश्लील चाळे करतात, काही गैरप्रकार या कॉफी सेंटरमध्ये होत असल्याच्या अनेक तक्रारी पो नि … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू

अहमदनगर :- चीनहून परतलेल्या आणखी २३ जणांची सोमवार (१० फेब्रुवारी) ला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या दक्षतेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शेनानुसार ही तपासणी करण्यात आली आहे.  दरम्यान, चीनहून गेल्या आठवड्यात देखील २७ जणांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक जणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याच्या घशातील लाळेचे … Read more

ब्रेकिंग न्यूज : कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या विष्णू भागवतला अखेर अटक !

नाशिक / अहमदनगर :- कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि.च्या मुख्य संचालक तथा सूत्रधार विष्णू भागवत यास नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे.  न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमीष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रूपयांची हजारो … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी इंटरनेट आणि वायफाय बंदी !

अहमदनगर ;- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नगरमधील परीक्षा केंद्रांवर इंटरनेट आणि वायफाय बंदी करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे निर्देश दिले आहेत.  आज जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी दक्षता समितीसोबत बैठक घेतली . यावेळी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा आणि परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला . यावेळी परीक्षा सुरू असताना … Read more

खंडाळा गावाचे उपसरपंचाचे पद रद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींचा निर्णय

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावचे उपसरपंच भास्कर कारभारी ढोकचौळे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केले आहे. उपसरपंच ढोकचौळे यांनी मुलाच्या नावावर गावातील पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम केले होते. खंडाळा गावातील शाहू-फुले चौकात सुमारे 2 लाख 80 हजार रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले होते. उपसरपंच भास्कर ढोकचौळे यांचा मुलगा अमोल याने हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ पीएसआय’ च्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर तालुक्यात रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणाऱ्या पीएसआय पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार काल रात्री घडला . पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्जत येथील जेलमधून ४ आरोपी काल फरार झाल्यानंतर जिल्हाभर पोलीसांनी नाकेबंदी केली. श्रीरामपुरातही नेवासा रोडवर बाजार समितीच्या पेट्रोल पंपासमोर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही !

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणूसंसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या … Read more

आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- हिंगणघाट जळीता हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.त्याला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली … Read more