आ.प्राजक्त तनपुरे आणि आ.शंकरराव गडाख यांना मंत्रीपदाची लॉटरी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना १३, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. नगर जिल्ह्यातून सेनेकडून आ. शंकरराव गडाख व राष्ट्रवादीकडून आमदार प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार असून ते आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती … Read more

जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वात कधीही तडजोड केली नाही. त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याची … Read more

Airtel वापरत असाल तर हे नक्की वाचाच ! कॉल रेट, SMS चे दर वाढले,ग्राहकांच्या खिशाला झटका !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे.वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी टेलिकॉम कंपनी Airtel ने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झटका दिलाय  एअरटेलने नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कॉल रेटच्या किंमतीत वाढ केली असून रिचार्जच्या किंमती बदलून नवी किंमत लागू केली आहे. तुम्हाला दरमहिन्यात एअरटेल नेटवर्क वापरता यावे यासाठी 45 रुपयांचा रिचार्ज करावाच लागणार आहे. या प्लॅनची … Read more

प्रियंका गांधी बसलेल्या स्कूटी चालकाला झाला इतक्या हजारांचा दंड !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लखनऊ :- प्रियंका गांधी या उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊच्या दौऱ्यावर असताना ज्या स्कूटीवर प्रियंका गांधी बसल्या होत्या त्याच्या चालकास पोलिसांनी चांगलाच दंड ठोठावला आहे.  शनिवारी प्रियंका गांधी या निवृत्त आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाल्या. यावेळी पोलिसांनी आपली गाडी रोखल्याचा आरोप प्रियंका यांनी केला. त्यानंतर प्रियंका गांधी … Read more

धक्कादायक : कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय हैदराबादमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत कॉलेजमधील तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघडकीस आलं आहे. या कॉलेजच्या विद्यार्थीनींचं रूटीन चेकअप करण्यात आलं होत त्यांनतर तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघड झालं. या तिन्ही विद्यार्थीनींवर काही … Read more

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, म्हणाले मी आता निवृत्ती घ्यायला हवी ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शतकाचे महान नायक अमिताभ बच्चन यांना रविवारी आणखी एका पुरस्काराने गौरविण्यात आलेय,अमिताभ बच्चन यांना सिनेमा जगातील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यानंतर बच्चन यांनी सर्वांचे आभार मानले. Actor @SrBachchan honoured with #DadasahebPhalkeAward at Rashtrapati Bhawan, in New Delhi … Read more

आ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधून चार आमदार असल्याने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबईत सायंकाळी सुरू असलेली बैठकीत ही सकारात्मक चर्चा झाली आहे. आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन … Read more

‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या क्रिकेटपटूचा भीषण अपघातात मृत्यू

यवतमाळ :- क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या दोन क्रिकेटपटूंचा रस्ते अपघातात जागेवरच मृत्यू झाला आहे. नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शनिवारी हा अपघात झाला. जयेश प्रवीण लोहिया (वय-10, रा.रामनगर वर्धा) अक्षद अभिषेक वैद (वय-11, रा.वर्धा) असे मृतांचे नावे आहे. ब्रदर हूड क्रिकेट क्लब, वर्धाचे हे क्रिकेटपटू होते. या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, पद्मविलास क्रिकेट क्लबने यवतमाळ … Read more

भाजप नगरसेविकेची विष पिवून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- नाशिकमधील भाजप नगरसेविका शांताताई हिरे यांचा विषारी औषध प्राषाण केल्याने मृत्यू झाला आहे. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय. फुलेनगर परिसरातील प्रभाग 4मधील त्या नगरसेविका होत्या. त्यांच्या अशा जाण्यामुळे  खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली आहे. शांताताई हिरे या त्यांच्या प्रभागातील उत्तम नगरसेविका होत्या. पण गेल्या … Read more

बाळासाहेब विखे पाटील…एक उत्तुंग व्यक्तिमत्व

खासदारसाहेब आपल्यातून गेलेत ही कल्पनाच सहन होत नाही. ज्यांना ज्यांना त्यांचा प्रेमळ सहवास लाभला त्यान्च्या मनातून त्यांची स्मृति जाणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या सहवासाचा लाभ ज्यांना झाला ते खरोखर भाग्यवानच म्हणावे लागतील.. या भाग्यवानानपैकी मी एक असल्याने मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू माहीत झाले. ते एक जिंदादील व उत्तुंग व्यक्तिमत्व होते. नगर … Read more

पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्‍मृतीदिना निमित्‍त अभिवादन कार्यक्रम

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहता: शेती, सहकार, शिक्षण, पाणी या क्षेत्रातील अभ्‍यासक पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा तृतीय स्‍मृतीदिना निमित्‍त प्रवरा परिवाराच्‍या वतीने सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ राजी सकाळी ९ वा. प्रवरानगर येथील स्‍मृतीस्‍थळावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. प्रवरा परिवाराच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अभिवादन कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने स्‍वरसुमनांजली संपन्‍न होणार आहे. या … Read more

एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणारे विखे आणि थोरात आले एकत्र पण…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :-  काँग्रेसमध्ये एकत्र असताना विखे आणि थोरात यांच्यामध्ये अनेकदा वैर पाहायला मिळालं. त्यांनतर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकमेकांवर टीका करण्याची हे दोघे एकही संधी सोडत नाहीत.गेल्या दोन दिवसांपासून ह्या दोन्ही नेत्यांत जोरदार शाब्दिक युध्द सुरु आहे.  मात्र शनिवारी एका लग्नसमारंभात विखे-थोरात एकमेकांशेजारी बसलेले दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. विखे … Read more

बाळासाहेब थोरातांनी दिली कबुली म्हणाले हो भाजपच्या नेत्यांना भेटलो होतो पण….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- बाळासाहेब थोरात हे दोन वर्षाआधी भाजपमध्ये येण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्या पक्षप्रवेशाची चिंता करू नये असंही विखे पाटील म्हणालेत. राजकीय फायद्यासाठी थोरातांनी पक्षाची फरप़ड केली आणि पक्ष दावणीला बांधला. भाजपमध्ये येण्यासाठी ते … Read more

माजीमंत्री आ.विखे पाटलांची बदनामी करणा-यांवर गुन्‍हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टिम / राहाता :- माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याबाबतचे वृत्‍त समाज माध्‍यमातुन प्रसारित केल्‍याच्‍या कारणाने संबधितांच्‍या विरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.  या संदर्भात दिलेल्‍या तक्रारीत लक्ष्‍मण बनसोडे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौदा वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- तालुक्यातील अशोक नगर येथील मयुरी नंदू पळसकर (वय १४) या युवतीने शुक्रवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत सूरज अण्णासाहेब गजभीव (वय ३८) अशोक नगर श्रीरामपूर यांनी पोलिसात खबर दिली. मयुरी हिने आपल्या राहत्या घराचे छताचे लोखंडी पाइपला ओढणीचे साहाय्याने गळफास … Read more

खासदार डॉ. सुजय विखे समर्थक बैठकीकडे फिरकलेही नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- भाजप तालुकाध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून भाजप अंतर्गत तालुक्यात राजकीय हवा तापली असताना खासदार प्रीतम मुंडे यांनी तालुकाध्यक्षपदाची इच्छुक उमेदवार धनंजय बडे यांच्या संपर्क कार्यालयापुढे धावती भेट दिली. गेल्या मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष निवडीसाठी आमदार मोनिका राजळे व पक्षनिरीक्षक प्रसाद ढोकरीकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. खासदार डॉ. सुजय विखे … Read more

भाजपमध्ये येण्यासाठी बाळासाहेब थोरात कोणत्या नेत्यांना भेटले ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- नगर जिल्ह्यातील दोन प्रतिष्टीत राजकारणी थोरात आणि विखे पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक हल्ले सुरु झाले आहेत. यावेळी निमित्त आहे विखे पाटील परिवाराची भाजपातून पुन्हा कॉंग्रेसमध्ये होणारी घरवापसी अर्थात याबद्दल राधाकृष्ण विखे यांनी ह्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितलेय. मात्र हे जाहीर करतानाच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नामदार बाळासाहेब … Read more

पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :-  पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. इतर सदस्यांना संधी देण्यासाठी राजीनामा दिल्याचे सांगून यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी निवडण्यात आलेल्या विविध विषय … Read more