मुलाने केला बापाचा दगडावर डोके आपटून खून

संगमनेर : घरातील सात ते आठ क्विंटल कापूस विकण्याच्या वादातून मुलाने बापाचा दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री आश्वी येथील गायकवाड वस्ती येथे घडली. सोन्याबापू किसन वाकचौरे असे मृताचे नाव आहे. सुनेने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा संतोष वाकचौरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. संतोष वाकचौरे हा रविवारी सायंकाळी दारू पिऊन घरी … Read more

निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रताच्या चौथ्या दिवशी म्हसणे फाटा येथील समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थिनींसह वाशिम व मालेगाव येथील विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. दरम्यान, दिल्लीतील निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांना दिलेल्या लिखित संदेशाद्वारे हजारे यांची जाहीर केले. जेथे अन्याय अत्याचार होतो, त्या विरोधात आजवर हजारे यांनी आवाज उठवून … Read more

भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला

संगमनेर: भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या मांजराला पकडण्याच्या नादात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. तुडुंब पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबट्याने कठड्याचा आधार घेतला. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने बिबट्याला अलगद बाहेर काढले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील आंबीदुमाला येथे उघडकीस आली. आंबीदुमाला येथील शेतकरी डॉ. संतोष इथापे यांच्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याला … Read more

विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

श्रीरामपूर : श्रीरामपुरातील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकणाऱ्या वरूण विशाल फोपळे (वय १७) याला अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी मोटारीतून तिघानी तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे असे सांगून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता पण विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. शहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकत असून.त्याने खासगी शिकवणी … Read more

कार ओढ्यात पलटी होऊन दोघे जखमी

श्रीरामपूर : श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील नरसळी गावाच्या पुढे असलेल्या ओढ्यात सोमवारी दुपारी स्विफ्ट गाडी पलटी होऊन कारमधील व महिला व पुरुष जखमी झाल्याची घटना घडली आहे. या रस्त्यावर एम एच १५ सिटी ५०२४ या क्रमांकाची स्विफ्ट कंपनीची कार ओढ्यात पलटी झाली. गाडीचा टायर पंकचर झाल्याने भरधाव वेगात पलटी झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात … Read more

कचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- माझे शहर स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, अशी मानसिकता सर्वांनीच तयार करणे आवश्यक आहे. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक हे नवीन पिढी घडविण्याचे महत्वाचे काम करतात. त्यांनी विद्यार्थ, पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास जनजागृती होईल. शहर कचरामुक्त होण्यासाठी शाळांचे व शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यातून गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शाळकरी मुलीवरील बलात्काराची आणखी एक घटना नगर जिल्ह्यात घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावात आजोबाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाण्यातून गुंगीचे औषध टाकून अत्याचार केल्याची घटना घडली आहे . यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रविवारी पारनेर पोलिसांत दाखल केली आहे, ओळखीचा गैरफायदा घेवून … Read more

कारागृहातून पळून जाण्यासाठी कैद्याने उचलले हे धक्कादायक पाऊल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील उपजिल्हा कारागृहाच्या स्वयंपाक घरातील चाकू हातात घेऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या पावलस कचरू गायकवाड या बंदीने बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जखमी महिला पोलिस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला पोलिस … Read more

अन्यथा ‘हे’ जिल्हा बँकेचे सभासद मतदानाला मुकणार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर – जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर  निवडणूक पूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात विकास सोसायट्यांचे ठराव घेतले जात असताना बँकेच्या एकूण सहा हजार 44 सभासदांपैकी 2 हजार 685 सभासद हे अक्रियाशील सभासद असल्याचे दिसतंय. आता या सभासदांना प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीत त्यांचे नाव नसणार आहे. यादीत … Read more

निवडणुकांचे बिगुल वाजले : अहमदनगर जिल्ह्याचे पुन्हा वातावरण तापणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष कोण होणार याची चुरस असतानाच सहकारी सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. महा विकास आघाडी झाल्यानंतर ची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता नेमके सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्ते … Read more

घराची मागील भिंत फोडून चोरट्यांनी सात तोळे दागिने, रोकड लांबवली

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील डोंगरवाडी परिसरात विनायक देवराम गवळी यांच्या घराची मागील भिंत फोडून चोरट्यांनीसात तोळे दागिने व रोख रक्कम लांबवली. गवळी हे कुटुंबीयांसमवेत घराच्या बंदिस्त पडवीत झोपले होते. त्यांची पुणे येथील बहीण व भाची सुटी असल्याने आईला भेटण्यासाठी आल्या होत्या. सर्व मंडळी रात्री एकपर्यंत गप्पा मारत बसले होते. पहाटे … Read more

एसटी अपघातातील प्रवाशांना भरीव मदत द्या : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- एसटी अपघातातील प्रवाशांना मिळणारी वैद्यकीय मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या अपघातग्रस्तांसाठी भरीव मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधीद्वारे सूचना मांडताना ते म्हणाले, सर्वसामान्य जनता एसटीने प्रवास करत असते. अपघात झाल्यास एसटी महामंडळाकडून २३ हजारांची मदत दिली जाते. … Read more

शेतकर्‍यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला – विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफीची केलेली घोषणा ही विसंगती निर्माण करणारी असून, सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. सरसकट कर्जमाफी करावी या शेतकर्‍यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला असल्याची टीका करतानाच, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेचाही मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर विसर पडल्याची प्रतिक्रिया माजी … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगांव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सलग दुसर्‍यांदा निवडून आलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या लेखाशीर्ष 2515 तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना या सारख्या लोकाभिमुख योजनांना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात … Read more

प्लॅस्टिक बंदीला अडथळा आणणाऱ्या दोन बड्या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत सुरू असलेल्या कारवाई मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.17) कापडबाजारात मनपा कर्मचार्‍यांना कारवाईस मज्जाव करुन हालकून लावण्यात आले होते. दरम्यान, मनपाच्या कठोर कारवाईमुळे … Read more

नव्या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पत्र असतील ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /नागपूर : बहुचर्चित कर्जमाफी अखेर आज झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर  हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत  राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ  करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर … Read more

आनंदाची बातमी : अखेर शेतकऱ्यांचे कर्ज माफ, महाआघाडीने शब्द पाळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा आज अखेर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या … Read more

‘सारथी’ तारादूत पथदर्शी प्रकल्पाकडून संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /अहमदनगर:- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था,(सारथी) पुणे, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थेच्या तारादूत प्रकल्प अंतर्गत अहमदनगर येथील  तारादूतांनी तालुक्यातील श्रीमती अलबर्ट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्यु. कॉलेज भिंगार  या ठिकाणी गाडगेबाबा यांच्या 63 पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमास सारथी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विजय पठारे उपस्थित होते. … Read more