गणित प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकासाला वाव

पारनेर : विज्ञान – गणित प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास होऊन बुद्धीमतेला चालना मिळते, त्यांची वैचारिक शक्तीप्रगल्भ बनून नवीन शिक्षण विकसित होते, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. कान्हूर पठार (ता.पारनेर) येथे जनता विद्या मंदिर विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय, पंचायत समिती (शिक्षण विभाग) व विज्ञान -गणित आध्यापक संघटना पारनेर यांच्या विद्यमाने … Read more

बेवारस मृतदेहामुळे उलगडले दोन खुनांचे रहस्य

नेवासा : वर्षभरापूर्वी प्रियसीच्या पतीचा खून केल्यानंतर तो पचला असतानाच तिच्या नात्यातील महिलेला याबाबत कुणकूण लागली. सदर महिलेने या दोघांना ब्लॅकमेलिंग करत पैशांची मागणी केली. तिचा वाढणारा तगादा आणि पहिल्या खूनाचे बिंग फुटण्याच्या भितीने आरोपी अमीन रज्जाक पठाण याने ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा काटा काढला. जोगेश्वरी – वाळुंज रस्त्यावर खून करून मृतदेह नेवासा तालुक्यातील जवळे खुर्द … Read more

डॉक्टरकडे मागितली दहा लाखांची खंडणी

श्रीरामपूर : शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरकडे दहा लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर माळवे, रमेश गायकवाड, माधवी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी : दि. २१ ऑक्टोबर रोजी उर्मिला रमेश गायकवाड या महिलेला पोटदुखीचा त्रास होवू लागल्याने बेलापूर … Read more

भाजपच्या तब्बल २१ नेत्यांवर महिला अत्याचाराचे गुन्हे

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या तब्बल २१ कायदे मंडळ सदस्यांवर महिला अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) आपल्या एका अहवालात केला आहे. याविषयी काँग्रेस दुसऱ्या (१६), तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष तिसऱ्या (७) क्रमांकावर आहे. ‘२००९ मध्ये लोकसभेतील २ सदस्यांवर महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे … Read more

अमेरिकेकडून अमित शाह यांच्यावर निर्बंध ?

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या अमेरिकेच्या एका केंद्रीय आयोगाने  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या मुद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक चुकीच्या दिशेने टाकलेले एक धोकादायक पाऊल आहे. हे विधेयक भारतीय संसदेत पारित झाले, तर अमेरिकेने भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निर्बंध लादावेत’, असे या आयोगाने म्हटले आहे. … Read more

सावधान! मुंबईच्या पाण्यात चक्क भलामोठा व्हायरस

मुंबई : मुंबईतील तलावांमध्ये ‘हल्ला करणारा अमिबा’ म्हणजेच ‘महाकाय व्हायरस’ मुंबईतील तलावात सापडला आहे. मुंबईच्या पाण्यात चक्क भलामोठा व्हायरस आढळून आलाय. या जलाशयांमधील असंख्य भल्या मोठ्या विषाणूंनी बनवलेली ‘प्रथिने’ पाहून संशोधकही अवाक् झाले आहेत. ते विषाणू कोणावरही विसंबून न राहता स्वत:च प्रथिनांची निर्मिती करतात, असेही अभ्यासात निदर्शनास आले. पवई येथील ‘आयआयटी बॉम्बे’ या संस्थेमधील संशोधक … Read more

१६ डिसेंबर रोजी ठरणार अजित पवार यांचे भवितव्य

नागपूर : सिंचन घोटाळ्याची सीबीआय किंवा सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यात यावी, याकरिता नागपूर खंडपीठात दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमवार, १६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याच वेळी महाविकास आघाडी सरकारचे  १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हायकोर्टात सुनावणी आहे. त्यामुळे हायकोर्टात अर्ज कायम राहणार की हायकोर्ट प्रतिवादींना … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: उद्या होणार शिवनेरीवर शेतकरी कर्जमाफीची घोषणा?

मुंबई : महाविकास आघाडी चे सरकार आल्या नंतर कर्जमाफी होणार असल्याचे संकेत सर्वच नेत्यांनी दिले आहेत. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे. शिवरायांच्या जन्मस्थळावर उद्धव ठाकरे कर्जमाफीची मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी … Read more

महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत दोषींवर तातडीने कारवाई

मुंबई: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांत दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक झाली.  महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. मागील काही कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा कशा पद्धतीने त्वरित … Read more

सहायक निबंधकासह लाच घेताना तिघांना अटक

शिरूर: लेखापरीक्षणाच्या तक्रारीतील चौकशीमध्ये चांगला अहवाल देण्यासाठी साडेआठ हजारांची लाच घेताना शिरूरच्या सहायक निबंधकासह मुख्य लिपिक व खासगी लेखा परीक्षक अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. सहायक निबंधक संजय कारभारी सोनवणे (५६), मुख्य लिपिक तुकाराम कोंडिबा वायबसे (४२), खासगी लेखा परीक्षक पद्माकर अवधूत कुलकर्णी (५७) अशी त्यांची नावे आहेत. तीन आठवड्यांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

खडसे- ठाकरेंचे गुफ्तगू

  मुंबई: शरद पवार यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट विधानभवनात घेतली. दाेन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. ‘जळगावातील सिंचन प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी आपण काल पवारांची व आज ठाकरेंची भेट घेतली. मी भाजप नव्हे, तर पक्षातील दाेन- तीन नेत्यांवर नाराज आहे. पक्ष साेडण्याचा … Read more

शिवसेनेचा यू टर्न

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ सादर करतील. सोमवारी मध्यरात्रीपर्यंतच्या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले होते. मात्र, लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना आणि जनता दलाने (युनायटेड) राज्यसभेसाठी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे … Read more

महापालिकेच्या 50 टक्के निधी खर्चास स्थगिती

अहमदनगर: महापालिका अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आणि जाता जाता तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी खर्चास मंजुरी दिलेल्या 50 टक्के महापालिका निधीच्या खर्चास प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्थगिती दिली आहे. महापालिका निधी म्हणून मोठ्या प्रमाणात निधीची मंजुरी अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.    या  निधीस भालसिंग यांनी जाता जाता मंजुरी दिली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर … Read more

तरुण तलाठ्यावर प्राणघातक हल्ला 

राहुरी: तालुक्यातील कात्रड- गुंजाळे येथील तलाठी सतीश सुभाष पाडळकर (वय 35) या तरुण तलाठ्यावर चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उंबरे-कात्रड-गुंजाळे रस्त्यावर काल मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. तलाठी सतीश सुभाष पाडळकर हे  वांबोरीमार्गे जात … Read more

झेडपी अध्यक्षांची निवड 21 डिसेंबरपूर्वी

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार ही उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कारणं ही असाच आहे  महा विकास आघाडी चे सरकार आल्यानंतर जिल्हा परिषद मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम एक महिना आधीच होणार आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार आता 21 डिसेंबरपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. … Read more

अन्नातून विषबाधा एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा – बहिणीचा मृत्यू

संगमनेर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा – बहिणीचा मृत्यू झाला. संगमनेरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. कृष्णा दीपक सुपेकर (वय ६), श्रावणी दीपक सुपेकर (वय ९) अशी या भावंडांची नावे आहेत. या दोघांची मोठी बहीण वैष्णवी दीपक सुपेकर (वय १३) हिच्यावर संगमनेरमधील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक … Read more

चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असताना ही वापर सर्रासपणे सुरू

नगर – शहरात चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मकर संक्रातीच्या उत्सवामुळे शहरातील पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र त्यासाठी चायना बनावटीच्या मांजाचा वापर केला जात असल्याने नागरिक व पक्षी यांच्या जीविताला अपाय होऊ लागला आहे. अशाच दोन घटनांत शहरातील दोन नागरिक जखमी झाले. नालबंदखुंट येथील सय्यद … Read more

अल्पवयीन मुलीला  पळवून नेलेल्या आरोपीला ३ वर्षे सक्त मजुरी 

श्रीगोंदा : आरोपी बंडू उर्फ प्रकाश पोपट चौधरी रा. शिंदे ता. कर्जत जि. अहमदनगर याने शाळेतील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी श्रीगोंद्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही.व्ही. भांबर्डे यांनी आरोपीस  ३ वर्षे सक्त मजुरी व ५००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दि. १८ आक्टोबर २०१६ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी दुपारी दीड वाजता पेपरला जात … Read more