शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप

नगर : नगर शहरातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी मी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संजयनगर झोपडपट्टी येथे २९८ घराचा प्रकल्प साकार होत आहे. नगर शहर हे झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संजयनगर येथील २९८ घराच्या प्रकल्पामधील अडचणी सोडवणार आहे, … Read more

भाचीने गळफास घेत संपविले जीवन, धक्का सहन न झाल्याने मामाचा झाला असा शेवट

अहमदनगर :- भाचीने गळफास घेतल्याचे घटना मामाला कळताच त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. मामाचे ह्यदयविकाराने निधन झाले. महिलेच्या गळफासप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॅलिस्टा ग्रॅहम रॉक (वय-३२, रा. सौरभनगर, भिंगार) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे. भिंगारमधील सौरभनगर येथे रॉक या युवतीने मंगळवारी पहाटच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. … Read more

ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या खोल्यांना या एका कारणामुळे ठोकले सील

अहमदनगर :- महापालिकेच्या बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी टिळक रस्त्यावरील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या पाच खोल्यांना सील ठोकत जप्तीची कारवाई प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी केली. टिळक रस्त्यावरील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसकडे मनपाची मिळकतीवरील मालमत्ताकराची आज अखेर थकबाकी १५ लाख ३७ हजार ४६९ रुपये एवढी आहे. महापालिकेच्या वतीने संबंधितांना वेळोवेळी थकबाकी भरण्याबाबत कळविले होते. मात्र त्यांनी … Read more

मुलीस फूस लावून पळवून नेत बलात्कार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला,पण…

श्रीरामपूर :- येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. राहुल गणेश शिंदे (वय २०) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला.मात्र पोलिसांनी त्याला पाच तासात पुन्हा अटक केली. तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. … Read more

लग्नाळु तरुणांची फसवणुक करणाऱ्या अहमदनगरच्या टोळीचा पर्दाफाश

श्रीरामपूर – बनावट नवरी, आई- वडील, नातेवाईक दाखवून लग्नाच्या बंधनात अडकवून तरुणांना फसवून लाखो रुपयाला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे टोळके देशभर कार्यरत असून ते श्रीरामपूर येथील असल्याचे समोर येत आहे.  याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बनावट मुलगी उभी करुन बनावट नातेवाईक दाखवून काहींना फसवल्याचा असाच प्रकार श्रीरामपूरमध्ये उघड झाला होता.याबाबत कार्यवाही करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग – महिलेचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकला !

नेवासा-  एका ३० ते ४० वर्ष वयाच्या महिलेचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना नेवासा खुर्द परिसरात असलेल्या जळके गावच्या शिवारात राजू जानकू सोनकांबळे यांच्या शेती गट नं.१२९ /१ मध्ये असलेल्या कॅनॉललगत मृतदेह फेकून देण्यात आला. या महिलेच्या तोंडावर जखमा असून गळा दाबून मारहाण करुन सदर महिलेचा खून करण्यात आला … Read more

आ. डाॅ. लहामटेंच्या बैठकीकडे नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह नगरसेवकांनी फिरवली पाठ !

अकोले – आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी राज्य सरकारकडून प्रलंबित योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप प्रशासनाकडून प्राप्त होऊनही बैठकीला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली. परंतु, भाजपत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड पिता-पुत्रांशी नाळ जोडलेल्या नगरपंंचायतच्या या पदाधिकारी व नगरसेवकांनी … Read more

श्रीगोंद्यात पोलिस निरीक्षकालाच गंडा ! 

श्रीगोंदे – ठाणे जिल्ह्यात नोकरीला असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावे श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे जमीन होती. काही लोकांनी बनावट आधार कार्ड बनवून ही शेतजमीन परस्पर विकली.  या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वेल्हा (पुणे) येथील किशोर चंद्रकांत पासलकर हे ठाणे जिल्ह्यात पोलिस निरीक्षक असून त्यांच्या पत्नी मीना पासलकर यांच्या नावे … Read more

…तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू – आ. जगताप

अहमदनगर  – शहरात मागील अनेक दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या माध्यातून प्रतिष्ठीत लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत.  अशा प्रकाराचा अन्याय यापुढे कोणावरही होऊ देणार नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू, असा इशारा देतानाच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मागवून घेणार असून अशांवर कारवाईची मागणी करणार … Read more

नगरसेविका सारिका भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द !

  अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या प्रभाग सहा अ मधील विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांची ही दुसरी टर्म होती. मागील महापालिकेत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. मात्र जातपडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्दबातल … Read more

लाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड

नगर – वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुधाकर नेहूलकर असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तक्रारदाराच्या मुलाचे वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने दहा टक्क्यांप्रमाणे १३०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १२०० रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई … Read more

पवारांना भेटून आज  खडसेंचा ‘वेगळा विचार’

नवी दिल्ली: भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी साेमवारी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दाेन्ही नेत्यांमध्ये सुमारे ३० मिनिटे बंद द्वार चर्चा झाली.  पक्षात मिळणारी दुय्यम वागणूक व भाजपमधील लाेकांकडून मुलीचा झालेला पराभव याबाबत खडसेंनी पवारांकडे मन माेकळे केले. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री … Read more

त्या  आरोपींना फासावर द्या 

पारनेर :   दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे झाली, तरी अद्याप शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करून निर्भयाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू करणार आहेत.  यासंदर्भात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात … Read more

पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील सम्राट ‘बारा-शून्य’ करू असा नारा देत होते. त्यांना गर्व झाला होता. साधन संपत्ती त्यांच्या हाती होती, पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता लगावला. नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक महिनाखेरीस निवड? ही नावे चर्चेत…

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्ष शालिनी विखेंसह राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, काँग्रेस थोरात गटाच्या अनुराधा नागवडे, राष्ट्रवादीच्या प्रभावती ढाकणे यांची नावे चर्चेत आहेत.  मंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर … Read more

अल्पवयीन मुलीचे सख्या भावांनींच केला बलात्कार

नागपूर: दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे महिनाभरापूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी आकाश संजय कारमोरे (वय 27) व शुभम संजय कारमोरे (वय 21, दोघेही गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे. 14 वर्षीय पीडिता मूळची भंडारा जिल्ह्यातील लाखनीची आहे. आई आणि वडील विभक्त असल्याने आई बुटीबोरी … Read more

ताब्यात घेतलेले जेसीबी, डंपर तस्करांनी पळवले

पारनेर : गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी जापनीज हबमध्ये ताब्यात घेतलेले दोन जेसीबी व एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून मध्यरात्री कारवाई सुरू असतानाच पळवून नेण्यात आला. एक पोकलेन पळवून नेण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला. मायडीया, कॅरीअर व मिंडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन व ईसीआर या नामांकित बांधकाम कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांनी गौण खनिजाचा … Read more

दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला सहावर्षीय मुलीचा मृतदेह

नागपूर : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. हैदराबाद येथील महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूर मध्ये एक अमानुष प्रकार समोर आलाय. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. नीलम शांताराम धुर्वे (६) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी या मुलीचा … Read more