मृत्यूपूर्वी मुशर्रफचा हा मित्राला शेवटचा कॉल… भय्या, मी संपलोय…

नवी दिल्ली : राजधानीत अनाज मंडी भागात एका चार मजली इमारतीतील फॅक्टरीला रविवारी पहाटे आग लागली. आगीत  ४३ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश मृत्यू गुदमरून झाले आहेत. पोलिसांनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. या आगीत मुशर्रफ नावाचा मनुष्य अडकून पडला. त्याने पहाटे ५ वाजता आपला मित्राला  फोन लावला. तो मित्राला म्हणाला,  भय्या, मी आज मरतोय. आग लागली … Read more

काकडी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्या

कोपरगाव : देशाच्या व जगातील साई भक्तांना शिर्डी येथे साई दर्शनाला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विमानतळ आणले होते. या विमानतळासाठी काकडीच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी विमान प्राधिकरनाणे या प्रकप्ल बाधित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र आजपर्यंत विमानप्राधिकारणाने अजूनही अनेक आश्वासनाची पूर्तता … Read more

तिजोरीत भाजपा सरकारने खडखडाट करून ठेवलाय – मंत्री बाळासाहेब थोरात

राज्याच्या  : मंत्री थोरात राज्याच्या तिजोरीत मागील सरकारने खडखडाट करून ठेवला : मंत्री थोरात श्रीदत्त व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळ्यात बोलताना . संगमनेर: महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. मागील सरकारने तिजोरीत खडखडाट करुन ठेवला, परंतू नवीन सरकार यातून मार्ग काढणार आहे. निळवंड्यासह अनेक अपूर्ण कामे पूर्ण करावयाची असून समृध्द व संपन्न तालुक्यासह … Read more

कांद्याला वीस हजार भाव बळीराजा सुखावला

नेवासे: तालुक्यातील घोडेगाव उपबाजारात रविवारी जुन्या गावरान कांद्याला वीस हजार, तर नवीन लाल कांद्याला दोन ते बारा हजार क्विंटल दर मिळाला. नवीन कांद्याची साडेपंधरा हजार गोण्या आवक झाली. बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे. लिलावातील पारदर्शकता, समितीचे नियंत्रण व आमदार शंकरराव गडाखांचे लक्ष असल्याने या बाजार समितीत जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळतो व लगेचच रक्कम अदा … Read more

नायलॉन मांजामुळे गळा कापला

कोपरगाव : सोनारी येथील सुकदेव आघाव हे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धारणगाव रस्त्याने दुचाकीवरून जात असताना चिनी बनावटीच्या नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात हा धोकादायक मांजा सर्रास विकला जात असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. त्याबद्दल जनतेत चीड निर्माण झाली आहे. आघाव हे संजीवनी … Read more

राजधानीत अग्नितांडव ; ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानीत अनाज मंडी भागात एका चार मजली इमारतीतील अवैध फॅक्टरीला रविवारी पहाटे आग लागली. आगीचे लोळ आणि प्लास्टिकच्या विषारी वायूमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश मृत्यू गुदमरून झाले आहेत. पोलिसांनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. बहुतांश मृत कामगार बिहारचे आहेत. आग लागली तेव्हा ते गाढ झोपेत होते. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ६२ … Read more

एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला

राहुरी : शहरातील  नगर-मनमाड मार्गावरील राहुरीच्या बसस्थानकासमोरील काॅम्प्ल्केसमधील स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच टोळीतील ५ चोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पळून जाणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बसस्थानकासमोरील गाळ्यात असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. पाच चोरांच्या टोळीने एटीएम केबीनमध्ये प्रवेश करून … Read more

उच्चभ्रू वसाहतीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबाद : बीड बायपासवरील एकाच उच्चभ्रू वसाहतीमध्ये काही मीटर अंतरावरच दोन बंगल्यांमध्ये दोन हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री समोर आला. गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी दोन्ही ठिकाणी डमी ग्राहकाच्या मदतीने छापा टाकल्यानंतर या परराज्यातील तरुणींचा सहभाग असलेल्या उच्चभ्रू रॅकेटचा पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेेने शनिवारी तब्बल सहा तास ही कारवाई केली. संजय त्र्यंबक … Read more

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून अद्यापही एकमत झाले नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथविधी झालेल्या सहा मंत्र्यांकडे खात्यांचा तात्पुरता कार्यभार सोपवून सरकारचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका असली तरी शिवसेना आणि काँग्रेस मात्र अधिवेशनापूर्वीच विस्तार करण्यासाठी आग्रही आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन … Read more

उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील

नगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी मािहती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते … Read more

प्लास्टिक उत्पादनावर निर्बंधासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार : आमदार जगताप

नगर : शासनाच्या धोरणानुसार प्लास्टिक बंदी कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर कारवाई होत आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू असूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे आपण संबंधित पथकाला खातरजमा करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच दंडात्मक रकमेबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले … Read more

वाडिया पार्कमधील अनधिकृत इमारतीवर कारवाई 

अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. मोठी इमारत पाडल्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी काहींनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली … Read more

नापिकी, दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड: सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, परतीच्या पावसामुळे पाण्याखाली गेलेली पिकं यामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या तालुक्यातील सरदवाडी येथील अप्पासाहेब रावसाहेब गंभिरे (वय ४८) या शेतकऱ्याने कुसडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुळे परिसरात शोककळा पसरली. अप्पासाहेब गंभिरे हे गुरुवारी जामखेडवरून सरदवाडी येथे दुपारी घरी गेले होते. आपला मोबाइल घराबाहेर ठेवला … Read more

राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?

नगर: अहमदनगर जिल्हा  भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता  माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची  बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची … Read more

बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता पण ते गेल्यानंतर नागवडे कारखान्याची वाईट अवस्था

श्रीगोंदे: शिवाजीराव नागवडे यांनी सहकार चळवळ उभी करून कारखान्याची उभारणी केली. तळागाळातील शेतकऱ्यांनी पैसे दिले. बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता ,पण बापू गेल्यानंतर कारखान्याची वाईट अवस्था झाली असून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही सुरू केली असून कारखान्याच्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवून सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब … Read more

भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला

संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार घटनेच्या तत्त्वावरील असून सामान्य माणसाच्या विकासाचे आहे, तर भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मंत्री झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन यशोधन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. मंत्री थोरात म्हणाले, भाजपचा कारभार म्हणजे राजकारणातला … Read more

बाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

नगर : राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या खारे कर्जुने (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी शुक्रवारी दुपारी शेळके कुटुंबीयांची भेट घेतली. दादापाटील शेळके हे शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व होते. कृषी, … Read more

१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून डांबून ठेवत बलात्कार

जालना: जालना येथील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला सेनगाव येथे डांबून ठेवण्यात आले. नंतर तिच्यावर सतत बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २३ दिवसांनंतर पोलिसांनी या मुलीची सुटका केली. तीन आरोपींना अटक केली असून यात दोन महिलांचा समावेश आहे. या मुलीची विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली … Read more