बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात संधी देणार पण…..!

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता भाजपची सत्ता गेल्यावर हेच नेते पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या रंगू लागल्या आहेत.याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

पत्नीचा साडी धरुन विनयभंग, तर पतीला पट्ट्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी!

शिर्डी – राहाता शहरात पिंपळवाडी रोड भागात राहणारे एका २८ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीचा मागील भांडणाच्या कारणावरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन साडी धरुन विनयभंग केला.  तसेच तरुणीस व तिच्या पतीस लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहित तरुणीने राहाता पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन नातेवाईक असलेले आरोपी अक्षय … Read more

भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवले !

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ५ च्या सुमारास भरदिवसा तिच्या रहात्या घराजवळून अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले.  याप्रकरणी मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे. मुलीचा व आरोपीचा हे.कॉ. औटी हे … Read more

दुचाकी घसरून अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंपरी परिसरात दुचाकी रस्त्यावर स्लीप – घसरुन गाडी वरील विद्यार्थिनी निर्मला दुराजी कांबळे, वय १४, रा. म्हातारपिंपरी, ता. श्रीगोंदा ही तरुणी गाडीवरुन पडून डोक्याला मार लागून जबर जखमी झाली.  तिला गंभीर स्थितीत पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना डोक्याला मार लागलेली निर्मला कांबळे ही मुलगी … Read more

श्रीगोंदा : नवजात पुरुष जातीचे अर्भक विहीरीत फेकले !

श्रीगोंदा – शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक अज्ञात स्त्रीने बाळंत होवून ते लपविण्याच्या उद्देशाने फेकले असावे असा संशय पोलीसांनी व गावकर्यांनी आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील शेती गट नं. ३५९ मधील रोहिदास टकले यांच्या शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक विहिरीत मृतावस्थेत मिळून आले आहे. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

राहुरी  – नगर – मनमाड रस्त्यावर डिग्रस शिवारात मुळा उजव्या कालव्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक देवून उडविले.  ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीवरील तरुण राजू संजय पवार, वय ३०, रा. धामोरी बु., ता. राहुरी हा तरुण जागीच ठार झाला. काल ६:४५ वाजता हा भीषण अपघात झाला. अपघात करुन चालक गाडीसह फरार … Read more

भरधाव पिकअपच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

श्रीगोंदा  –  दौंड रस्त्यावर काष्टी परिसरात शिवनेरी चौकात भरधाव पिकअपच्या धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. पोपट विलास माने, वय ३८, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा असे पद्चार्याचे नाव आहे.  भरधाव वेगातील पिकअप गाडी नं. एमएच १५ एफव्ही ३६९५ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालवून पायी चाललेले पोपट माने यांना धडक देत उडविले. … Read more

चारित्र्यावर संशय घेऊन छळ, विवाहित तरुणीने स्वतःला संपवलं !

नगर  –  नगर तालुक्यात केडगाव परिसरात जयहिंदनगर, भूषणनगर भागात विवाहित तरुणी सौ. प्रियंका सुनील कांबळे, वय ३२ हिने सासरच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली.  नवरा, सासू व सासरच्या लोकांनी प्रियंका या तरुणीस सासरी नांदत असताना तुझ्या बापाने लग्नात काही दिले नाही, असे म्हणत घालून पाडून बोलून तसेच तू मोबाईल वापरायचा नाही, ड्रेस घालायचा नाही, प्रियंकाच्या चारित्र्यावर … Read more

पारनेर क्रीडा संकुलासाठी साडेचार कोटींचा आराखडा

पारनेर : शहरातील क्रीडा संकुलात विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेचार कोटींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लंके यांच्याकडेही त्यासंदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी क्रीडा संकुलातच बैठक घेत विविध प्रश्नांचा आढावा घेतला. क्रीडा संकुुलात कायमस्वरूपी जॉगिंग ट्रॅक तयार करावा, महिला व पुरुषांच्या व्यायामशाळेत अत्याधुनिक … Read more

जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान

अहमदनगर: राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.  यात नगर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याठिकाणी थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्याने चुरस पहायला मिळणार आहे. संबंधित ठिकाणी आचारसंहिता … Read more

विकास कामात राजकारण न करता निधी आणणार : आ. जगताप

नगर : नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील विकास कामाचे नियोजन करावे. विकास कामात पक्षीय राजकारण आणणार नाही, सर्व भागाचा समतोल विकास साधावा यासाठी नगर शहरात आता मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे.  उपनगराच्या विकास कामाला चालना मिळाली आहे. आता जुन्या शहरात गावठाण भागात नियोजन करून विकासकामे केली जाणार आहेत. नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करणार … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून पंकजा मुंडेंना झटका

मुंबई:  फडणवीस सरकारने महत्त्वाच्या कामांबाबत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन यापैकी काही वादग्रस्त निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीआधी ग्रामविकास विभागाअंतर्गत मंजूर २ ते २५ कोटीपर्यंतच्या अनुदान असलेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे यांनी गुरुवारी घेतला. बुधवारी संध्याकाळी मात्र सरकारने एक शासनादेश जारी करून ग्रामविकास विभागाच्या योजनांना … Read more

घोटाळेबाजांनी देशाला लावला १७,९०० कोटींचा चुना

नवी दिल्ली : भारतात आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या एकूण ५१ लोकांनी १७९०० कोटी रुपयांची देशाची फसवणूक केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) सांगितले आहे की, आजपर्यंत ६६ प्रकरणांमधील ५१ आरोपी फरार असून, त्यांनी अन्य देशांत पलायन केले आहे. ठाकूर यांनी सांगितले … Read more

धावपळीच्या जीवनात सोशल मीडियामुळे या गोष्टी होतात सोप्या

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सुख-दु:खाची खबरबात देण्यासाठी विशेषत: लग्न पत्रिका व इतर निमंत्रण देण्यासाठी सोशल मीडिया सध्या वरदान ठरत असल्याने वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. कमी वेळेत किंवा अचानकपणे ठरलेला शुभ मुहूर्त या कामासाठी लागणाऱ्या वेळेचे बंधन पाहता अनेकदा वधू व वर पक्षाची मोठ्या प्रमाणात धांदल उडते. तसेच निमंत्रण पत्रिका छापल्यानंतरही नजर … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ

कोपरगाव : आगामी वरसात पाच सहा महिन्यांनी राजकारणात उलथापालथ व्हईल. लक्ष्मीला पिडा राहील. ज्येष्ठामधी पाऊस पडलं. आषाढ महिन्यात पाऊस येणार नाय. कौर नक्षत्रात पाऊस पडल व पेरण्या व्हतिल. मनुष्याला पिडा राहील. चैत्र महिन्यात गारा पडतील. पिवळ्या धान्याला महागाई राहील. नदीनाल्यांना पूर येतील. जसा माझा आनंद केला तसा नगरीचा आनंद राहील, असे व्हईक तालुक्यातील भोजडे येथील … Read more

बुरुडगाव रोडवरील दिमखादार ‘हॉटेल प्रभा पॅलेस’चे शुक्रवारी उद्घाटन

अहमदनगर : सध्याच्या काळात सेवाक्षेत्रात वेगवान बदल होत असून हॉटेलिंग व्यवसायात उत्कृष्ट स्वादाच्या जोडीला सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य व आधुनिकता वाढत आहे. नगरमध्ये बुरुडगाव रस्त्यावर नक्षत्र लॉनच्या रुपाने मंगलकार्यासाठी अतिशय दिमाखदार कार्यालय उपलब्ध करून देणार्‍या फुलसौंदर परिवाराने आता हॉटेल प्रभा पॅलेसच्या रुपाने आपल्या व्यवसायाचा नवा आविष्कार साकारला आहे. बुरुडगाव रोडवर नक्षत्र लॉन जवळ शुक्रवार दि.6 डिसेंबर रोजी … Read more

नव्या सरकारचा ZP अध्यक्षा शालिनीताई विखे यांना धक्का, घेतला हा मोठा निर्णय !

अहमदनगर :- फडणवीस सरकाराने मंजूर केलेल्या कामांना महाविकास आघाडीच्या सरकारने हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देऊन दणका दिला आहे. त्यापाठोपाठ आता थेट नगर जिल्हा परिषदेतही त्याचे लोन पोहचले आहे. विखे कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या नगर जिल्हा परिषदेतीलही लाखो रूपयांच्या कामांना तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश थेट मुंबई ग्रामविकास व नगरपंचायत राज तसेच बांधकाम विभागाने दिले आहेत. आजपासून कार्यारंभ … Read more

राधाकृष्ण विखे पाटील,बबनराव पाचपुते यांच्यासह हे आमदार भाजप सोडणार ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकी पूर्वी मेगा भरती करून घेणाऱ्या भाजपला आता धक्का बसण्याची शक्यता आहे आता याच मेगाभरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपचे तब्बल 12 विद्यमान आमदार आणि एक खासदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.  राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता त्याचे हादरे भाजपला बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे … Read more