सिरॅमिक फॅक्ट्रीत एलपीजीचा स्फोट; १८ भारतीयांसह २३ जणांचा मृत्यू

 खार्तुम : सुदानमध्ये सिरॅमिक फॅक्ट्रीमध्ये एलपीजी टँकरच्या झालेल्या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १८ भारतीयांचा समावेश आहे. या आगीत १३० लोक जखमी झाले असून प्रारंभिक माहितीनुसार सात भारतीयांचा जखमींमध्ये समावेश आहे. सुदानची राजधानी खार्तुमच्या बाह्य भागात असलेल्या सेला सिरॅमिक फॅक्ट्रीमध्ये मंगळवारी हा स्फोट झाला. अद्याप १६ भारतीय बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. … Read more

बिगर मुस्लिम नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक-२०१९ च्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे अफगाणिस्तान, बांगला देश आणि पाकिस्तानातील बिगर मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी संसदेत हे विधेयक दाखल होऊ शकते. गेल्या कार्यकाळात मोदी सरकारने हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले होते. मात्र, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हप्ता न दिल्याच्या रागातून मजुराचा कु-हाडीने घाव घालून खून

पाथर्डी :- गावातील गावगुंडानी एका मजुराचा हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात मंगळवारी दुपारी घडली. साहिल पठाण (रा.खोसपुरी, ता. नगर) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा … Read more

संगमनेरचे ‘ राजहंस ‘ बाळासाहेब थोरात यांच्या खेळीने काँग्रेसला अच्छे दिन !

अहमदनगर :- राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे व संगमनेरचे ‘ राजहंस ‘ समजले जाणारे ज्येष्ट नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संयमी खेळीने काँग्रेसला पुन्हाअच्छे दिन आले आहेत. आमचा नेता बाळासाहेब थोरात गडी लयीच जोरात असे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्ते आनंद साजरे करीत असून सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तास्थापणेमुळे थोरात यांच्यामुळे जिल्ह्याला … Read more

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचं हॉट फोटोशूट

बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सची चर्चा तर नेहमीच चर्चा होत असते. मराठीतील्या या स्टारकिड्स चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे तिचं हॉट फोटोशूट. ही स्टारकिड आहे, लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे. स्वानंदीने नुकतंच फोटोशूट केलं असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.   स्वानंदी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती बरेच फोटो पोस्ट … Read more

अचानक USB Condom ची मागणी वाढण्याचं हे आहे कारण

USB Condom हे नाव ऐकूनच तुम्हाला हादरा बसला असेल . पण, हे  नवं प्रोडक्ट सध्या मार्केट मध्ये  धुमाकूळ घालताना दिसत आहे.  तुमची कोणतीही गोष्ट ‘लीक’ होणार नाही याची काळजी USB Condom (डेटा ब्लॉकर) घेते.  अचानक USB Condom (डेटा ब्लॉकर) ची मागणी वाढत आहे.  एखाद्याच्या खासगी जीवनाशी घेणं-देणं आहे. दिसायला अत्यंत साधं आणि आकारनं लहान असलेलं हे उपकरण जवळपास … Read more

छेड काढून मुलीस घरासह पेटवण्याचा प्रयत्न

उमरगा :- तालुक्यातील मुळज येथील एका महाविद्यालयीन मुलीची सातत्याने छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक व पोक्सो अंतर्गत सोमवारी (दि.२) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाविद्यालयीन युवतीने उमरगा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुळज येथील अजित लहू मुळजे हा महाविद्यालयास जात असताना वारंवार छेड काढत अश्लील इशारे … Read more

जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत करायचा अत्याचार!

चिखली :- जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे प्रकरण देऊळगाव घुबे गावात उघडकीस आले आहे. सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईकांच्या मदतीने मुलीने पोलिसांत तक्रार दिली. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने नातेवाईकांना याची माहिती दिल्यानंतर बापाला समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र बापाने … Read more

१४ वर्षे वयाच्या मुलीवर तिघांचा बलात्कार

उमरगा :- तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व नंतर तिचा दोघांनी विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत मुळज येथे मुलीची छेड काढून तिला घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुगावमधील घटना बुधवारी तर मुळजची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी उमरगा व मुरूम पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुगाव येथे १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार … Read more

मुलीशी चाळे करणाऱ्याला मारहाण करून काढली धिंड !

नागपूर :- घरात घुसून चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत व्यक्तीला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली व त्याची धिंड काढून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नागपुरातील पुनापूर वस्तीत रविवारी उघडकीस आली. पीडित मुलीची आई घरकामात व्यस्त होती. त्यावेळी जवाहर नावाचा चाळीसवर्षीय व्यक्ती घरात शिरला. त्याने घरात समोरच्या खोलीत खेळत असलेल्या चार वर्षीय मुलीशी अश्लिल … Read more

अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढला !

अहमदनगर/ नालेगाव- अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि.२) उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.  परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला. अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि.१) दिवसभरात सुमारे १३ ते १४ अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी … Read more

वाडिया पार्कचे नाव छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल होणार?

नगर – वाडिया पार्क व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल असे नामकरण करावे, असा प्रस्ताव महापालिकेने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांना पाठवला आहे.  १६ जुलैला झालेल्या महासभेत तसा ठराव घेण्यात आला होता. वाडिया पार्क क्रीडा व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल नामकरण करण्याचा ठराव २६ मे २०१२ रोजी महासभेने … Read more

श्रीगोंद्यात माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

श्रीगोंदा :- काष्टीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य असलेले शिवनेरी उद्योग समुहाचे अध्यक्ष पोपटराव विलासराव माने यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. एक डिसेंबरला रात्री दहा वाजता माने आपल्या शिवनेरी हॉटेलचे कामकाज संपवून समोरच असलेल्या घरी जात असताना रस्ता ओलांडताना दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. माने … Read more

कांद्याच्या दराने ओलांडली शंभरी,सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी !

अहमदनगर :- नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा, तसेच लाल कांद्याला विक्रमी १०० ते १३० रुपये किलो भाव मिळाला. गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यापासून कांद्याची आवक … Read more

राहुरी भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

राहुरी : राहुरी तालुका भाजपाची यावेळच्या अध्यक्ष निवडीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जात आहे. कारण सन २००४ पासून राहुरी विधानसभा मतदार संघात पक्षाचे आमदार होते. यावेळी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाल्याने आता तालुकाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार,याबाबत उत्सुकता आहे.  राहुरी तालुका भाजपाचे विद्यमान अध्यक्ष विक्रम तांबे पदावर असताना २००९ मध्ये शिवाजीराव कर्डिले विजयी ठरले होते. सध्या तेच … Read more

आमदार तनपुरेंना मंत्रिपद मिळाल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल !

तिसगाव : राहुरी -नगर -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांची नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस, या तीन पक्षांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये यांची वर्णी लावावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह तनपुरे समर्थकांकडून करण्यात आली आहे.  मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने … Read more

तीन तासांतच जन्मलेले बाळ तिने गमवले, मंग अंगावरच्या दुधाचे ती दान करू लागली…

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या विस्कॉसिन प्रांतातील एका महिलेने छोट्या बाळांचे आयुष्य वाचविण्यासाठी स्वत:च्या अंगावरचे दूध (ब्रेस्टमिल्क) दान करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अडीच महिन्यांत तिने जवळपास १५ किलो ब्रेस्टमिल्क एनआयसीयू बँकेला दान केले आहे.  नेल्सविलेमध्ये राहणाऱ्या या महिलेचे सिएरा स्ट्रँगफेल्ड असे नाव असून ५ सप्टेंबरला तिने शस्त्रक्रियेद्वारे सात महिन्याच्या अपुरी वाढ झालेल्या बाळाला जन्म दिला … Read more

आश्चर्यकारक ! 21 वर्षीय या तरुणीला चक्क पाण्याची आहे ॲलर्जी, पाणी पिल्यानेही…

वॉशिंग्टन : पाण्याबिगर आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मात्र एखाद्याला चक्क पाण्याचीच ॲलर्जी आहे, असे कधी तुम्ही ऐकलेय का? आंघोळ तर दूरची गोष्ट साधे पाणी पिणेही असह्य वेदना देते. एवढेच नाही तर घाम व डोळ्यांतून अश्रू निघाले तरी शरीरावर चट्टे पडतात आणि ताप व डोकेदुखी सुरू होते.  अमेरिकेतील टेसा हॅनसन स्मिथ नावाची २१ वर्षीय … Read more