रोज नऊ तास झोपण्यासाठी ही कंपनी देईल एक लाख रुपये 

रोज तेच तेच काम करून अनेकजण पार कंटाळून जातात. एवढे नोकरी सोडून द्यावी, अशीही त्यांची बऱ्याचदा इच्छा होते. नोकरी सोडून काहीतरी वेगळे करावे, असेही वाटत असते. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यातही झोप प्रिय असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता अशा एका नोकरीची ऑफर आली आहे, ज्यात तुम्हाला फक्त झोप काढण्याचे काम … Read more

फरार आरोपीस सापळा रचुन शिताफीने पकडले! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल राजेंद्र पालवे (वय २९, रा.मेहेकरी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठला परिसरात सापळा रचुन शिताफीने पकडले.  सुनिल पालवे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास जामीनावर सोडले होते. जामीनावर सुटल्यानंतर कोर्ट कामाकरीता सुनील पालवे हा न्यायालयात हजर झाला नाही. … Read more

शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून जबर मारहाण

अहमदनगर : बांध का कोरला अशी विचारणा केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत अमोल महादेव दिवटे हे जखमी झाले असून, याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की,श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील अमोल महादेव दिवटे यांनी माझ्या शेताचा बांध का कोरला अशी विचारणा केल्यावरून त्यांना … Read more

मोबाईल क्रमांकासाठी ग्राहकांचा चेहरा स्कॅन करवून घेणे अनिवार्य

बीजिंग : चीनच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने देशातील सर्वच मोबाईल कंपन्यांना नवा मोबाईलक्रमांक देण्यासाठी मोबाईल ग्राहकांचा चेहरा स्कॅन करवून घेणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिलेत. याद्वारे चीनचा देशातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात येत असले तरी नागरिकांवर पाळत ठेवण्याचा यामागे हेतू असल्याचा आरोप होत आहे. चीनकडून जनगणनेसाठी फेशियल रिकॉग्नेशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात … Read more

मोदी व शहा हे गुजरातहून दिल्लीत आलेले घुसखोर आहेत !

दिल्ली –  ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे घुसखोर आहेत, असा तीक्ष्ण प्रहार काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी रविवारी केला आहे.  देशावर सर्वांचा हक्क आहे. भारत कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा देश नाही. सर्वांना समान हक्क मिळाले असून, ‘एनआरसी’मुळे सामाजिक सौहार्द … Read more

गोव्यात राजकीय भूकंप घडविण्याचे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले ! 

पणजी : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी’ने एकत्रितपणे सरकार बनवीत नवा सत्ताप्रयोग केला आहे; परंतु महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप गोव्यात घडणार नाही, असा दावा करीत या संबंधित वृत्त राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाओ यांनी रविवारी फेटाळून लावले आहे. गोव्यात भाजपने घोडेबाजार करून सरकार बनविले आहे. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी … Read more

खंडणी मागितल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणला अटक

पुणे : ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार देऊन, ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्याप्रकरणात अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (३२, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिला गुन्हे शाखेचा युनिट २ ने मुंबईतून अटक केली आहे. हा गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व … Read more

‘माझ्या मुलाला फाशी द्या, किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका’ !

हैदराबाद : पशुवैद्यक महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर जाळून निघृर्ण हत्या करणाऱ्या ४ पैकी एका आरोपीच्या आईने आपल्या मुलालाही जिवंत जाळून टाकण्याची मागणी केली आहे.  ‘त्याला फाशी द्या,  किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका,’ असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत या प्रकरणाची … Read more

पंकजा मुंडे देणार भाजपला सोडचिठ्ठी ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि सत्तास्थापनेत अपयश आल्याने भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोचरी टीका केली असतानाच आता माजी मंत्री पंकजा मुंडे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना भावनिक पोस्ट लिहीत १२ डिसेंबर रोजी पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. पंकजा मुंडेंच्या या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एका युवकाचा मृत्यू !

राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी … Read more

नगर- दौंड रोडवर बर्निंग कारचा थरार

श्रीगोंदे – दि.1 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता दौंड कडून नगरकडे जाणार्‍या फोर्ड कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली.  या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. मात्र लाख मोलाची कार जळली असताना याबाबात साधी खबर देखील बेलवंडी पोलिसात स्टेशनला दिली नसल्याने घटने बाबत संशय वाढला आहे. नगर-दौंड रस्त्याचे काम झाले आहे. मात्र अनेक … Read more

वीज दुरुस्तीचे काम करत असतानाच अधिकाऱ्याला मारहाण

श्रीरामपूर – महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांना वीज दुरुस्तीचे काम करीत असताना नगरसेवकाने शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत महावितरणचे एमआयडीसी ऑफिस श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, ग्राहकांना बसेल मोठा झटका !

वृत्तसंस्था :- एअरटेल, व्होडाफोननंतर आता रिलायन्स जिओने आपल्या दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. ‘रेट्स ऑल इन वन प्लान्स’मध्ये ही दरवाढ होणार असल्याचे जिओने सांगितले आहे. कंपनीनं रविवारी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात कंपनीनं म्हटलं की, सर्व नेटवर्कवर मोबाइल सर्व्हिस रेट्स ऑल इन वन प्लान्सच्या अंतर्गत वाढवले जातील. जिओ लवकरच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग … Read more

आरक्षण रद्द करण्याचा मोदी सरकारचा डाव !

नवी दिल्ली – मोदी सरकार संवेदनाहीन आणि मूकबधिर आहे. हे सरकार सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करून आरक्षण रद्द करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळेच या सरकारच्या धोरणांच्या विरोधात जनआंदोलनाची गरज आहे, असे मत अनुसूचित जाती-जमाती संघटनेचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार उदित राज यांनी रविवारी व्यक्त केले आहे. देशाच्या विविध भागांतून येथील रामलीला मैदानात जमा झालेल्या … Read more

महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार

अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक पार पडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेत तिन्ही पक्षाच्या ताकदीवर महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याचे राजेंद्र फाळके यांनी सुतोवाच केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, … Read more

कारच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू

नगर : नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गवर देवगड फाट्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . ताराबाई संतोष वणवे (वय ५३, रा.आडगाव, जि. जळगाव) व मंगल सुनिल काळे (वय ४५, रा.निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर) अशी मृत महिलांची नावे आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील लग्नाचे वऱ्हाड औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरजवळील भानवाडी … Read more

पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल यासाठी प्रयत्नशील – खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगर : “भिंगार गावचा पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून येथील जनतेला न्याय देऊ,” असे आश्वासन भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. भिंगार बँकेच्या कार्यालयात खा.विखे यांची भिंगारच्या समस्यांबाबत पहिली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भिंगार बँकेचे चेअरमन गोपाळराव झोडगे यांनी तर भिंगार भाजपतर्फे महेश नामदे … Read more

तरुणाचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

नगर : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणारा सोमनाथ उर्फ वैभव अशोक अभंग (वय १८) हा विद्यार्थी मित्रांबरोबर गावातीलच बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पण बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे चंदनापुरी गावावर शोककळा पसरली आहे. सोमनाथ … Read more