सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो असे सांगून ७४ तरुणांना गंडा

नगर : सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो म्हणून तालुक्यातील कळस बुद्रुक येथील ७४ तरुणांना सुमारे सात लाख रूपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पुणे येथील दाम्पत्याविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नितीन महाजन याने बालाजी कंपनीत ७४ तरूणांची सिक्युरिटीसाठी निवड केली. प्रत्येकाला ड्रेससाठी ३२४० रूपये याप्रमाणे … Read more

ग्राहकांच्या खिशावर ताण वाढणार, मोबाइल बिल वाढणार

नवी दिल्ली : १ डिसेंबर २०१९ पासून अनेक नियमांत बदल होत असून याचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो. रविवारपासून कॉलसोबत इंटरनेटचा वापर महाग होऊ शकतो. वास्तविक, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल दरवाढीच्या तयारीत असून यात नेमकी किती वाढ होईल याबाबत कोणत्याही कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. याशिवाय विमा हप्ताही महाग होऊ शकतो. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या … Read more

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६२.८% मतदान ; नक्षल्यांनी पूल उडवला 

रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. ६ जिल्ह्यांमध्ये १३ जागांसाठी ६२.८७ टक्के मतदान झाले. हे मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असल्याने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ होती. दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक मुरारी लाल मीणा यांनी सांगितले की, नक्षल्यांनी गुमला जिल्ह्यात विष्णुपूर भागात एक पूल स्फोटकांनी उडवला. यात कोणतीही … Read more

चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याने वायरमनला मारहाण 

नगर:  बेकायदेशीरपणे घेतलेले वीज कनेक्शन तोडल्याचा राग आल्याने दोघांनी वायरमनला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बोल्हेगाव येथील भारत बेकरीच्या मागे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील नारायण तांबे व नीरज सुनील तांबे अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनी घरात चोरून वीज कनेक्शन घेतले होते. महावितरणचे … Read more

उद्या आमदार निलेश लंकेंचा जनता दरबार 

पारनेर : गेल्या महिन्यात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार नीलेश लंके यांचा जनता दरबार सोमवारी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्ता आवारी यांनी दिली. आ. लंके हे सध्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानिमित मुंबईत असून त्यांच्या वतीने राहुल झावरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना जनता दरबाराच्या आयोजनासंदर्भात पत्र दिले आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात … Read more

दोन लाचखोर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; मागितली ४० हजारांची लाच

कोपरगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये यासाठी ४० हजारांची लाच मागणारे शिर्डी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस शिपायांविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद अशी आरोपींची नावे आहेत. कोपरगाव येथील सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान … Read more

अवैधरित्या मुरूम उपसा; जेसीबी पोकलेनसह जप्त

पारनेर : रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूम उपसा करणारी दोन यांत्रिक उपकरणे ताब्यात घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी ठेेकेदार महेश गुंदेचा यांची मुरूम चोरी उघडकीस आणली. सध्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वनकुटे ते तास या रस्त्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत अनंत तक्रारी करण्यात येत आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमाची रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची तक्रार … Read more

संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव

नगर : महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. असा प्रकल्प राबवलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्युत विभागाला दिले आहेत. शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी सायंकाळी विद्युत विभागाची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनील त्र्यंबके, … Read more

प्रियंका यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

अहमदनगर: डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. आरोपींनीच केली … Read more

ज्या निलेश लंकेंची सेनेतुन हकालपट्टी केली त्यांच्याच मताने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री !

अहमदनगर :- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरीक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. Ahmednagar … Read more

कन्या विद्यालयात रंगला नवसिताऱ्यांचा सन्मान सोहळा

श्रीगोंदा:अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यातील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात आयोजीत केलेल्या सोहळ्यात एम पी एस सी परिक्षेत यश व राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत झेंडा रोवणाऱ्या नव सिताऱ्यांचा सन्मान केला. आणि मुलींना गणवेश व सायकल भेट दिली भाग्यश्री फंड हर्षद जगताप धनश्री फंड पल्लवी हिरवे कोमल हिरडे पल्लवी पोटफोडे सोनल नवले शितल कांगुणे निकीता काटे … Read more

माजी आ. नरेंद्र घुलेंना विधानपरिषदेवर घेण्याचे मागणी !

शेवगाव :- राष्ट्रवादीची स्थापना करताना सर्वात प्रथम स्व.मारुतराव घुले पाटलांनी समर्थन दर्शवत शरद पवाराना पाठिंबा दर्शविला, आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहात घुले यांनी पवारांची साथ सोडली नाही. जिल्ह्याची वाताहत होत असताना घुले बंधुंनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आघाडीसाठी महत्वाची भूमिका बजावत जिल्ह्यात १२ /० चे गणित बदलवत ३/९ करुन पक्ष संघटनेचा पाया मजबुत केला. याच दरम्यान … Read more

१ लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ८० विद्यार्थ्यांना पाजले 

वृत्तसंस्था :- उत्तरप्रदेशातील एका शाळेत माध्यान्ह भोजन कार्यक्रमांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ते ८० मुलांना देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षकमित्राला निलंबित केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. सोनभद्र जिह्यातील कोटा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बनवा प्राथमिक विद्यालयातील बुधवारची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल … Read more

शिर्डीत रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह !

शिर्डी :- शहरातील साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात ५५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेबाबत काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार ! 

कोटा : राजस्थानमध्ये बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्यासोबत लग्न करणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा नराधम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नववीच्या वर्गात शिकणारी ही १५ वर्षीय मुलगी बुधवारी शाळेतून परत येत होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या काही व्यक्तींनी तिचे अपहरण केले. या लोकांमध्ये पीडितेसोबत बालविवाह करणाऱ्या २० … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी !

अहमदनगर : येत्या वर्षातील जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील. यात मुदत संपत असलेल्या आणि नव्याने झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेत प्रभागरचना, आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काल शुक्रवार रोजी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी … Read more

महापौरांच्या प्रभागातच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ! 

अहमदनगर : प्रभाग क्र. १ मधील सिद्धिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्­वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्­वानामुळे आरोग्याचा प्रश्­न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्­न त्यांना सांगून देखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिद्धिविनायक कॉलनीत एका श्­वानाला काही … Read more