थोडीशी वाट बघा, राज्यात राम राज्यच येणार – गिरीश महाजन

नाशिक – नाशिकमध्ये अयोध्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. मंदिरात जय श्री रामाचा जयघोष यावेळी करण्यात आला. महाजन याप्रसंगी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यात राम राज्यच येणार आहे, थोडा धीर धरा वाट बघा असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे म्हणाले. ते … Read more

न्यायालयाचा निर्णय कोणाचा विजय किंवा पराभव नाही

मुंबई : ‘सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही. तर भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे. मुळातच जवळजवळ सर्वानी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे विधान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर … Read more

लग्नाच्या बस्त्यासाठी जात असताना उपवराचा रेल्वे रुळात पाय अडकून जागीच मृत्यू

जळगाव – नुकतेच लग्न ठरले असल्याने लग्नाच्या बस्त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना घेण्यासाठी गेलेल्या नशिराबादच्या तरुणाचा रेल्वे रुळामध्ये पाय अडकल्याने धावत्या रेल्वेखाली येवून मृत्यू झाला.  ही घटना गरुवारी सायंकाळी असोदा रेल्वे स्थानकाजवळ घडली. अक्षय श्यामसुंदर मोरे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी तरुणाच्या लग्नाचा बस्ता जळगाव येथे भरण्याचे ठरले हाेते. त्यानमित्त ताे भादली येथून आत्याला आणण्यासाठी दुचाकीवर … Read more

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून आईनेही विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

केज –दोन महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून एका २८ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे घडली.  शिवकन्या सोमेश्वर रत्नपारखी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. युसूफवडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.  बनसारोळा येथील रामभाऊ सुवर्णकार यांची कन्या शिवकन्या हिचा पाच वर्षांपूर्वी भुईसमुद्र (जि. लातूर) येथील सोमेश्वर रत्नपारखी यांच्यासोबत विवाह झाला होता.  तिला … Read more

मुलगा होत नसल्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळले, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

नांदेड – किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावात दि.९ डिसेंबर १६ रोजी मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी सत्यव्रत गारौले (४२) याने पत्नीला रॉकेल अंगावर टाकून तिला पेटून दिले होते.  यावर आरोपीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी शुक्रवारी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सविस्तर माहिती अशी की, किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावात सत्यव्रत गारौले व … Read more

पंढरपुरात भगर खाल्ल्याने 60 वारकऱ्यांना विषबाधा

पंढरपूर –  भगर खाल्ल्याने 50 ते 60 वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे.हे सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  येथील असून त्यांच्यावर  पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  कार्तिकी यात्रेच्या  एकादशीसाठी पंढरपूरला आले असल्याने उपवास असणाऱ्यांनी ही भगर खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याची माहिती मिळते आहे.   ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.रात्री अडीच वाजण्याच्या … Read more

Live Update: ‘त्या’ जागी मंदिर होणारच ! मुस्लिम समाजाला दुसर्या ठिकाणी ५ एकर जागा मिळणार

या ऐतिहासिक खटल्याच्या निकालानंतर राम जन्मभूमी न्यास कार्यशाळा परिसरात कुठलंही सेलिब्रेशन होणार नाही : विश्व हिंदू परिषद अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचं स्वागत, संपूर्ण 2.77 जागा रामलल्लाचीच आयोद्धेतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा सुप्रिम कोर्टाचा निकाल. तेथे मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून … Read more

‘माहेरुन पिकअप घेण्यासाठी १० लाख आण’ असे म्हणत विवाहितेला मारहाण

नगर – फलटण जि. सातारा येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी आयसा अक्रम शेख, वय २४ हिने माहेरुन पिकअप घेण्यासाठी आई – वडिलांकडून १० लाख रुपये आणावेत, म्हणून नेहमी पैसे आण अशी मागणी करुन शिवीगाळ करायचे, मारहाण करायचे पैसे घेवून ये म्हणत उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिले व शारीरिक व मानसिक त्रास दिला.  या प्रकरणी … Read more

बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याचा जाब विचारल्याने भावाच्या डोक्यात पहार

कोपरगाव – शहरात संजयनगर भागात राहणारा तरुण राहुल सोमनाथ गायकवाड याच्या घरासमोर येवून त्याच्या बहिणीकडे पाहून आरोपीने शिट्टी वाजवली, तेव्हा शिट्टी का वाजवली असा जाब राहुल गायकवाड या तरुणाने विचारला असता त्याला ५ जणांनी बेदम मारहाण करत डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  जखमी राहुल … Read more

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना अवमान नोटीस

औरंगाबाद / शिर्डी- जागतिक तिर्थक्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाप्रकरणी दाखल जनहित याचिका आणि दिवाणी अर्जावर उच्च न्यायालयात गुरुवार (दि. ७) सुनावणी झाली.  त्यावेळी अनेक आरोप करण्यात आले. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वकील नितीन पवार यांनी अध्यक्षांनी संस्थानची बाजू मांडण्यास मज्जाव केल्याचे तर संचालकाने धमकावल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.  तसेच … Read more

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी आ. तनपुरेंनी दिले जिल्हाधिकार्यांना निवेदन

राहुरी –केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीतून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशा आशयाची मागणी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. ५ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील शेरी, चिखलठाण, कोळेवाडी, दरडगावथडी, म्हैसगाव या गावांमध्ये ढगफुटी झाली.  सलग चार तासांपेक्षा अधिक वेळ जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांबरोबर काही … Read more

आ. लंकेच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पारनेर –नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ४ कोटी ७७ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे निवडणुकीपूर्वी काही महिने आगोदर या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यानही नागरिकांनी … Read more

सोनियांसह गांधी कुटुंबीयाला धक्का, विशेष एसपीजी सुरक्षा काढली; फक्त सीआरपीएफ-झेड प्लस

नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी यांना असलेली विशेष सुरक्षा व्यवस्था (एसपीजी) काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता या तिघांनाही केवळ सीआरपीएफ व झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था असेल. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गृह मंत्रालयाच्या सुरक्षा आढावा समितीच्या बैठकीत हा … Read more

जे प्रेम दिले त्याबद्दल मी ऋणी राहील : आ. जगताप

नगर – कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भाविकांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील, तसेच या ठिकाणाच्या कामासाठी भविष्यात भरीव मदत उभी करून देऊन सदरच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकणासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी येथील कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भेट … Read more

वाळूचोरांनी पोलिसांना धक्काबुक्की करत वाळूचा डंपर पळवला!

पारनेर – तालुक्यातील कामटवाडी फाटा येथे गुरुवारी दुपारी पोलिसांना धक्काबुक्की करून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवून नेल्याची घटना घडली.  याप्रकरणी दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा, तसेच वाळूचोरीप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळशी गावाकडून वाळूने भरलेला डंपर खडकवाडीकडे येत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे … Read more

उद्धव ठाकरेंकडून भाजपच्या दाव्याची चिरफाड

मुंबई: अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं, या भाजप नेत्यांच्या दाव्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुरती चिरफाड केली आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आम्हाला खोटं ठरवलं आहे. शहा आणि कंपनीने कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी खोटं कोण आणि खरं कोण हे सर्वांना माहित आहे.  … Read more

सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी बोलवावे

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटले असतानाही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का देत नाहीत? असा थेट प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा … Read more

सत्तासंघर्षात भाजपा-शिवसेनेतच आरोप-प्रत्यारोप

मुंबई: पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा विश्वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, असंही ते म्हणाले. अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं कधीही ठरलं नव्हतं, तसंच एकदा या फॉर्म्युलामुळे बोलणी फिस्कटली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण … Read more