मनापा कर्मचार्‍यांना अखेर कामवाटप

नगर : नगररचना विभागात महापालिकेने महिनाभरापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना अखेर कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. महिनाभर हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी केवळ बसून होते. आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतल्यानंतर कामकाज वाटपास वेग आला. यामुळे येथील कामाला वेग येण्याची शक्यता आहे. नगररचना विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी तळ ठोकून बसले होते. काही कर्मचारी तीस तर काही … Read more

राजीनामा देताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस..

राज्याच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मला विश्वास आहे, येत्या काळात जे सरकार येईल ते भाजपच्याच नेत्रृत्वात सरकार येईल सरकार बनवण्यासाठी घोडेबाजार करणार नाही सरकार स्थापन करताना कुठल्याही प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आम्ही करणार नाही पुन्हा निवडणुका लादणं हे चुकीचे आहे राज्याला सरकार मिळालं पाहिजे वैकल्पिक पर्याय उपलब्ध होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री … Read more

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.  राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय … Read more

….आता २ किलो प्लास्टिकवर मिळतील ६ अंडी

कामारेड्डी – तेलंगणातील कामारेड्डी जिल्हाधिकारी एन. सत्यनारायण यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी एक मोहिम सुरू केली आहे.  यात दोन किलो प्लॅस्टिक दिल्यास ६ अंडी देण्यात येतात. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत, मंडळ व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. व्यापारी असोसिएशनची एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी अंड्याचा … Read more

दुकानातून खाऊ घेऊन देतो म्हणत, नराधमाने 6 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार

सातारा – खाऊचे आमिष दाखवून एका सहा वर्षांच्या मुलीवर नराधम तरुणाने बलात्कार केल्याची घटना सातारा शहरात घडली.  याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सलम्या मंडे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  दरम्यान, पीडित मुलगी दिवाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आली आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. सलम्या याने किराणा दुकानातून खाऊ देतो, असे मुलीला सांगितले.  … Read more

कर्तव्य बजावत असताना वीज पडून २२ वर्षीय जवान शहीद

नळदुर्ग  तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी गावचे सुपुत्र भारतीय लष्कर दलात मेजर सतीश नागनाथ बाबर (२२) यांचा पुणे येथे कर्तव्य बजावताना बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.  गुरुवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या मूळगावी गुळहळ्ळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबर हे पुणे येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी दुपारी अंगावर वीज … Read more

धक्कादायक! कपडे वाळवताना विजेचा धक्का, आतेबहिणींचा जागेवरच मृत्यू

केज – केज तालुक्यातील शिंदी येथे गुरुवारी (दि. १) दुपारी एकेच्या सुमारास  २२ वर्षीय विवाहित तरुणी कपडे वाळू घालत असताना तिला  विजेचा धक्का बसला व  तिला वाचवण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय आतेबहिणीचाही मृत्यू झाला. दिवाळी सणासाठी विवाहिता माहेरी तर मुलगी आजोळी आली होती. शिंदी येथील अनिल पाटील यांची कन्या रेणुका थोरात ही दिवाळीच्या सणासाठी माहेरी आली होती. … Read more

पाचच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू

तीर्थपुरी –  एका सीड्स कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत असलेले आकाश जाधव (२४, राहेरा तांडा, ता. घनसावंगी) हे तीर्थपुरी येथे पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होते.  बुधवारी संध्याकाळी उशिरा घरी येऊन जेवण करून झोपी गेले होते. पहाटे पती झोपेतून उठत नसल्याने पत्नीने हलवून पाहिले असता ते जागे होत नसल्याने पत्नीने शेजारच्यांना उठवून पतीला दवाखान्यात अंबडला नेले होते.  … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे खा. लोखंडेंनी फिरवली पाठ

नेवासा –शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी अजून वेळ मिळालेला नाही. खासदारांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नेवासे तालुक्याने लोकसभेला लोखंडे यांना मतांची झोळी भरून दिली, त्याच तालुक्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पीक वाया गेले.  सर्व पक्षांचे खासदार, आमदार आपापल्या मतदारसंघात … Read more

हंगा तलाव ओव्हरफ्लो, पारनेरची तहान भागली !

पारनेर–पारनेर शहर, तसेच हंगा, लोणी हवेली या गावांची तहान भागवणारा हंगा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी पहाटे चार वाजता तो ओव्हरफ्लो झाल्याची माहिती शाखा अभियंता अजिनाथ मोहळकर यांनी दिली. गेल्या दुष्काळात ७० हजार घनमीटर गाळ उपसण्यात आल्याने यंदा पाणीसाठ्यात सुमारे ४ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. १९८५ मध्ये बांधून पूर्ण झालेल्या या … Read more

२ हजारांच्या पैजेपोटी तो झाला ५० अंडे खायला तयार, तो जिंकेल असे वाटत असतानाच त्याच्यासोबत झाले असे काही की…

आपल्यापैकी अनेक जण थट्टा मस्करी मध्ये पैज लावत असतात, ‘ मी पैंज लावू शकतो’ ‘लाव शर्त’ अशा गोष्टी चालू असतात. काहीतर याला सूत्र शब्द म्हणून वापरतात. परंतू या पैंजा कधी कधी खूप महागात पडतात. जौनपुर मध्ये असच या पैजेचा एकजण शिकार शिकार झाला यात त्याला आपला जीव गमवावा लागला. # काय आहे नक्की प्रकरण? जौनपुर … Read more

५ लाख रुपये माहेरुन घे, तरच तुला नांदवतो, असे म्हणत मारहाण…

राहुरी  – राहुरी येथील सातनपीरबाबा रोड परिसरात राहणारी विवाहित तरुणी तेरेसा कन्हैय्या वाघमारे ही भैरवनाथ मंदिर परिसर कोंढवा खुर्द, पुणे येथे नांदत होती.  नांदत असताना नवरा व सासरच्या लोकांनी ११/ ५/ २०१८ ते १८/ ६/ २०१८ दरम्यान ५ लाख रुपये माहेरुन घे, तरच तुला नांदवतो, असे म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन शारीरिक व मानसिक छळ … Read more

स्कुटर खड्ड्यात आदळून एकाचा मृत्यू

संगमनेर – संगमनेर तालुक्यात साकूर गावच्याजवळ बिरेवाडी फाट्याजवळ कोठे मकापूर रस्त्यावर स्कूटर दुचाकी नं. एमएच १७ सीइ ६६५८ हिच्यावरील,  चालक रमेश मच्छिंद्र बोरुडे, रा. कोल्हार, ता. राहाता याने स्कूटरवर पाठीमागे मनाजी काशिनाथ नान्नोर, वय ७४, रा. गंगापूर, ता. राहुरी यांना बसवून साकूर ते करणपूर अशी स्कूटर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालविली.  दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात … Read more

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र पाहून आ. तनपुरे हळहळले

राहुरी: म्हैसगाव , शेरी चिखलठाण येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली. यावेळी ‘ पिकांच्या नुकसानीसह, वाहून गेलेल्या शेतीचे स्वतंत्र पंचनामे करावेत’ , अशी सूचना त्यांनी तहसीलदारांना केली.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मोबाईलवर संपर्क साधून , नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी . रस्त्यांच्या कामासाठीही निधी देण्याची मागणी … Read more

शेतात कांदा सडलेच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

नेवासा – तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी अनिल नारायण शेळके, वय – ४२ यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार दि . ५ रोजी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, कर्जबाजारीपणा आणि पावसाने शेतातच कांदा सडून गेल्याच्या विवंचनेतून शेळके यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. अनिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.  नेवासा … Read more

स्वत:च्याच गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून तरुणाची आत्महत्या

नगर – स्वत: च्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळा कापून  तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पारनेर तालुक्यातील पळवे बु. हॉटेल जयराम येथे घडली.   हॉटेल जयराम येथील हॉटेलच्या खोलीत खोलीचा दरवाजा आतून बंद करुन देवचंद सुमेर रमोला वय ३० वर्ष, रा. उत्तरकाशी उत्तराखंड, हल्ली रा. हॉटेल जयराम या तरुणाने स्वत: च्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळा कापून  कापून … Read more

गांजाचा ओव्हर डोस घेतल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणतांबा – राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे राहणाऱ्या गणेश नावाच्या ३० वर्ष वयाच्या तरुणास रहात्या घरातून औषधोपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत आणले.  त्याने गांजा जास्त प्रमाणात घेतल्याने गणेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ओषधउपचार सुरू असताना गणेशचा मृत्यू झाला. प्रवरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरीलप्रकरणी राहाता पोलिसांत खबर दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सफो पवार हे … Read more

अस्मानीनंतर सुल्तानी संकट, संतप्त बळीराजाने कांद्याचे लिलाव बंद पाडले!

नगर –  नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू होते. सोमवारी कांद्याचे भाव साडेचार हजार रुपये क्विंटलपर्यंत गेल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला.  मात्र, गुरुवारी  सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याचे भाव अचानक १० ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत कांद्याचे लिलाव बंद पाडले. आक्रमक झालेले शेतकरी थेट … Read more