पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप !

पारनेर :- पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याची खरमरीत टीका खासदार सुजय विखे यांनी बुधवारी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल … Read more

दोन गटात हाणामारी; १८ जणाविरूध्द गुन्हा दाखल

नगर – सावेडीत दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगड , विटाने हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी विरेन मधूकर भिंगारदिवे, आकाश शालूमन जाधव, मधूकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पदमा विलास भिंगारदिवे, कलावती … Read more

शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

नेवासा – तालुक्यातील लांडेवाडी येथील योगेश अण्णासाहेब दरंदले, वय २७ या शेतकऱ्याचा शेतात काम करताना सर्प दंशाने मृत्यू झाला. त्यांना सोनई, नगर येथे दवाखान्यात केले असता उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, चुलते, चुलती, आजी असा परिवार असून योगेश यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकार्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे ‘त्या’ वादावर खा.विखे यांचा चिमटा !

पारनेर- ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकारी यांना बुधवारी माझ्या तालुका दौऱ्यासंदर्भात निरोप दिले असताना ते या दौऱ्यात का सहभागी झाले नाही ते कळाले नाही. यामुळे एकतर त्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे किंवा त्यांचे पंचनामे राहिले असावेत, असा चिमटा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर दुसरीकडे सध्या राजकीय परिस्थिती पाहता यावर … Read more

नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघतात एकाचा मृत्यू

नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. विठ्ठल पांडुरंग कौसे (वय ३२, रा.कावलगाव, ता.पूर्णा, जि. परभणी) हे अपघातात मृत झाले, तर अनिल सखाराम पारसकर (निगडी, ता.मावळ, जि.पुणे) हे जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारसकर व कौसे हे स्वीप्ट कारमधून मंगळवारी नांदेड येथून पुण्याकडे … Read more

आमदार रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीमुळे छगन भुजबळ यांच्या स्वीय साहाय्यकास जेलची हवा !

जामखेड :- मतदारसंघात एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला होता मात्र आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विजयी मिरवणुकीत गालबोटही लागल्याचेही समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका बसलेल्या आईला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या लेकरास तुरुंगात जावे लागले आहे. रस्ता मोकळा करून देण्याचे सोडून पोलिसांनी रुग्णवाहिकाच अडविण्याचे … Read more

…असा चालायचा शिर्डीतील ‘तो’वेश्या व्यवसाय

शिर्डी :- शिर्डी येथील हॉटेल साईधाममध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहाजणांसह तीन महिलांवर रविवारी गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० वी शिक्षण घेतलेल्या परप्रांतीय १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला या छाप्यात पकडण्यात आले होते. आरोपींकडून कसून चौकशी केली असता शिर्डीतील ५ ते ६ हॉटेलमध्ये या … Read more

नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून माता- पित्यांनी ठोकली होती धूम, पुढे झाले…

नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून धूम ठोकणाऱ्या माता-पित्याविरुद्ध अखेर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, या दाम्पत्याचा पत्ता पूर्ण नसल्यामुळे आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.  मोहित भिकूलाल भंडारी (रा. रामकृष्ण शाळेजवळ, शिवाजीनगर, सिल्लोड) यांनी आपल्या पत्नीला १९ ऑक्टोबर रोजी सिडको … Read more

पिक विमा कंपन्यांना राजू शेट्टींनी भरला दम, म्हणाले…

सारोळा – परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या गेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने विनाअट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी  पीक विमा कंपन्यांनीही हात न आखडता १०० टक्के विम्याचा लाभ द्यावा अन्यथा धडा शिकवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.  सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे मंगळवारी (दि.५) … Read more

पिकांचे सरसकट पंचनामे करून महिनाभरातच मदत देणार – खा. डॉ. सुज़य विखे

राशीन : कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागास भेट देऊन खा. डॉ. सुज़य विखे यांनी पाहणी केली. या वेळी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना महिनाभरात मदत मिळवून देण्याचे आश्­वासन खा. विखे यांनी दिले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथून आज सकाळी खा. विखे यांच्या दौऱ्यास प्रारंभ … Read more

पूर्ववैमनस्यातून बिर्याणी हाऊस व त्यालगत असलेले घरही पेटवले

श्रीगोंदा : काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि.४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील बेलवंडी फाट्यावरील काळे मामा बिर्याणी हाऊस हे हॉटेल व त्यालगत असणारे घर पेटवून दिल्याची घटना घडली.  सदर घटनेबाबत रेखा संजय काळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्ता रामदास जाधव रा.(गव्हाणेवाडी) बेलवंडी फाटा, ज्ञानेश्वर शंकर … Read more

जिल्ह्याच्या भूजल पातळीत समाधानकारक वाढ,भूजल सर्वेक्षणचा अहवाल

अहमदनगर : जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ हजार ६०२ गावांना येत्या ३१ मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नाही.  या संदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील पंधराशे सत्तावीस निरीक्षण विहिरींच्या १५ ऑक्टॉबर दरम्यान नोंदी घेण्यात आल्या होत्या.  यासाठी प्रशिक्षित जलसुरक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता यासंदर्भातील भूजल सर्वेक्षणचा अहवाल प्राप्त … Read more

पीक पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करायचा नसतो

लातूर : येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जा. आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. उलट आत्महत्येने तुमचे घर पोरके होईल. शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत उभी आहे. असा दिलासा देतानाच तुमच्या आशीर्वादाने आमचे सरकार सत्तेवर आले तर कसल्याही अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजारांचे अनुदान देण्यात येईल,  अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. … Read more

माझं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

बीड : अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही हे मला ठाऊक आहे. मात्र, माझं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील परभणी फाट्यावर दिली.  दरम्यान, ठाकरे यांच्या प्रतीक्षेत दोन तास कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर ताटकळले होते. उद्धव ठाकरे हे परळी येथे पीक पाहणी करून माजलगावात दाखल झाले. सायंकाळी … Read more

चर्चेसाठी भाजपाचे दरवाजे २४ तास खुले – चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनेसोबत चर्चेसाठी भाजपाचे दरवाजे २४ तास उघडे आहेत. राज्यात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार येणार आहे.  संपूर्ण भाजपा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे … Read more

सत्तास्थापनेवर गडकरी दोन तासांत कोंडी फोडतील!

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असले तरी सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती यावरून दोन्ही पक्ष अडून बसले आहेत.  यातच,  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून शिवसेनेमध्ये दाखल झालेले शेतकरी संघटनेचे नेते किशोर तिवारी यांनी या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिले. या … Read more

पीएमसी खातेदाराला आता ५० हजार रुपये काढता येणार!

मुंबई :  पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून ५०,००० रुपये करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  आरबीआयने या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून … Read more

दारुड्या पतीकडून पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण

नगर – दारू पिऊन आलेल्या पतीने घरातील सर्व कपडे जाळून टाकले. कपडे का जाळले, याचा जाब विचारला असता त्याने पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण केली.  ही घटना जाधव पेट्रोल पंपाजवळील साईराम सोसायटीत घडली. पत्नीच्या फिर्यादीवरून दिगंबर दत्तात्रय सोनवणे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  सुवर्णा दिगंबर सोनवणे (३२) या भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. … Read more