अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू

मोर्शी : कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज रविवारी दुपारी शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेहेगाव-सावरखेड मार्गावर घडली. नाजूकराव उदयभान तायडे (५५) व शालिनी नाजूकराव तायडे (४५) रा.कठोरा बु. अशी मृतक पती-पत्नीचे नाव आहे. शालिनी यांच्या निंभी येथील रहिवासी बहीण आजारी आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी नाजूकराव व … Read more

प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यू

जळगाव : गर्भवती महिलेची शनिवारी प्रसूती होऊन नवजात बालिकेस जन्म दिला. त्यानंतर प्रकृती गंभीर होऊन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विवाहितेचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. योगिता किसन गाडे (२२) शिवाजीनगर हमालवाडा जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. गर्भवती विवाहितेस प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी उपचाराचे बिल घेत रूग्णालयात … Read more

शिवसेना बाजारमें बैठी है क्या?

मुंबई : शिवसेनेला १७० आमदारांचे पाठबळ असून ही संख्या १७५ वर देखील जाऊ शकते, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा विश्वास व्यक्त करताना सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्तास्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळाला आहे. मात्र … Read more

काहीही होवो, भाजप सरकार पुन्हांदा सत्तेत नकोच…

मुंबई : काहीही होवो, पण यावेळी राज्यात भाजपाचे सरकार नको आहे, अशी युवक, शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजात तीव्र भावना मला दिसत आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.  तसेच कधीकाळी आपल्यासोबत असलेला समाजातील वंचित घटक पुन्हा आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवे. यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत केले.. … Read more

शरद पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत अजितदादा म्हणतात…

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात नवे चित्र दिसू लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढती जवळीक ही राजकारणातील नवे समीकरण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांनी दिले.शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून रोज नवनवीन वक्तव्य केली जात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, … Read more

‘शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा आणि उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा’!

नाशिक : राज्याच्या सत्तासंपादनाच्या सारीपाटातील डाव-प्रतिडाव सुरू असतानाच शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदासह सोळा मंत्रिपदं घ्यावीत, असा अनाहूत सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.  केंद्रीय राज्यमंत्री आठवले व पालकमंत्री महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. सध्याची राजकीय परिस्थितीही आठवले यांनी आपल्या शैलीत काव्यबद्ध केले. ‘शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत … Read more

उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू – खा. डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात. त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू … Read more

नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर :- नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून शासकीय रुग्णालयांतही गर्दी वाढली आहे.  पाणी साचलेल्या ठिकाणी डासाच्या अळ्यांची निर्मिती जोमात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा … Read more

आ.मोनिका राजळे चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर !

अहमदनगर :- आमदार मोनिका राजळे यांनी रविवारी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. आ. राजळे यांचा लहान मुलगा कबीर यास डेंग्यू झाल्याने सध्या तो नगर येथे उपचार घेत आहे. त्या स्वतः सुध्दा आजारी असून सत्कार न घेता त्या चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर गेल्या. बाजरीच्या कणसाला आलेले मोड, शेतात … Read more

उद्धव ठाकरेंमुळे भाजपचं टेंशन वाढणार !

मुंबई :- धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या … Read more

सावधान! राज्यातील या भागात मेघगर्जनेसह पाऊस होणार ! अतिवृष्टीचा इशारा …

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ‘महा’ चक्रीवादळादरम्यान समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व … Read more

रोहित पवार म्हणतात तर संसार नीट कसा होणार?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.  सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी … Read more

वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली. आदिती … Read more

पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल !

अहमदनगर :- ‘परशुराम सेवा संघ लवकरच व्यापक रूप घेणार असल्याने भविष्यकाळ संघासाठी चांगला राहणार आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार असेल आणि पुढचा मुख्यमंत्री परशुराम सेवा संघाचा असेल,’ असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी येथे केले. परशुराम सेवा संघाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक नगरच्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क … Read more

कांद्याची सहा हजारांकडे झेप

अहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला. सततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी … Read more

नवीन सदस्य बनवण्यासाठी काँग्रेसचे नवे ‘ॲप’

नवी दिल्ली : देशात पाच कोटींपेक्षा अधिक नवीन सदस्य जोडण्याची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी काँग्रेसने एक विशेष ॲप तयार केले आहे. याअंतर्गत आपल्या नवीन सदस्याची विस्तृत माहिती संकलित के ली जाणार आहे. ही माहिती नवीन सदस्याचा वर्ग आणि व्यवसायाच्या आधारे तयार केली जाणार आहे. काँग्रेस सदस्यता अभियानाशी निगडित सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या या ॲपचे नाव … Read more

जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो

मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती. त्यामुळे शरद पवारांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांना कोपरखळी मारली आहे. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो, असे गडकरी म्हणाले. नुकत्याच संपन्न झालेल्या … Read more

दिल्लीतील प्रदूषणाचे केजरीवालांकडून राजकारण

नवी दिल्ली : दिल्ली व एनआरसीमधील वाढत्या प्रदूषणाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप करत, केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी आप सरकारला लक्ष्य केले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब व हरियाणाच्या मुख्यमंर्त्यांना पत्र लिहिण्याचे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना केल्यानंतर जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आरोप-प्रत्यारोपात गुंतणे ही अत्यंत दुर्दैवी बाब … Read more