पत्नीला मारणाऱ्या पतीची जमावाकडून हत्या

बांदा : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात पत्नीची हत्या केल्यानंतर सासरच्या मंडळीला जखमी करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघड झाली. गाझीपूर पोलीस ठाणे हद्दीतील फतेहपूर येथे पत्नीला भेटण्यासाठी छत्तीसगडहून निसार कुरैशी आला होता. बुधवारी त्याने किरकोळ वादानंतर कुऱ्हाडीने सपासप वार करत पत्नीची हत्या केली. यानंतर सासरच्या मंडळीला जखमी करून … Read more

उद्या शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवार, ४ नोव्हेंबरला दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच पुढच्या घडामोडींना वेग येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून २५ हजार कोटींची मदत … Read more

..तर शिवसेना सरकार स्थापन करेल

मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. हीच ती वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा … Read more

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असला तरी दोघांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा … Read more

आपच्या वतीने श्रीरामपुरात भव्य रास्ता रोको…

श्रीरामपूर- शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले अनेक जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले. काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या सर्व प्रकारास घटनेस … Read more

दरोड्याच्या तयारीतील चौघे गजाआड

राहुरी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करीत गजाआड केले आहे. एक जण पसार झाला आहे. ही कारवाई मुळा धरणाजवळ शुक्रवारी रात्री करण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरारी असलेला अट्टल आरोपी मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे … Read more

खासदार डॉ. सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

साकुरी : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्य कै. नारायण गाडेकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते आले होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येऊन सरकारकडून जलदगतीने भरपाई कशी … Read more

सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी

करंजी : राहुरी- नगर -पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे मला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, या सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करू, असे प्रतिपादन राहुरीचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील मतदारांचे आभार मानण्यासाठी आ. तनपुरे आले असता, चिचोंडी येथे ते बोलत होते. . आ. तनपुरे … Read more

आमदार रोहित पवारांकडून अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या परतीची पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, बाजरी,ज्वारी, कांदा, सोयाबीन, ऊस आदी पिके अतिरिक्त पावसाने वाया गेली आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने रानात तुडुंब पाणी साठले असल्याने अनेक पिके … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू- आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केवळ हालच झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण स्वत: उभे आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण व अडीअडचणी समजून घेण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आपल्या सुचनेवरून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ.पाचपुते बोलत होते. ते … Read more

जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव : घनश्याम शेलार

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याने या निवडणुकीत जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी तालुक्यातील जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी काल श्रीगोंद्यात पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणूक निकालानंतर शेलार पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी … Read more

अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नगर शहराच्या हद्दीतून … Read more

मोटारसायकलींचा अपघात; मुलीचा मृत्यू

अहमदनगर : दोन मोटारसायकलचा अपघात होवून यात प्रिती संतोष म्हस्के या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू तर भानुदास केशव खराडे हे जखमी झाले आहेत. ही घटना दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण गावच्या शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडला असून, याप्रकरणी महेश बबन कुलथे (रा.दुरगाव,ता.कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, भानुदास केशव खराडे हे … Read more

पोलिसास धक्काबुक्की

अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली. याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक … Read more

मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच बसवण्यात येणार

अहमदनगर : महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. … Read more

शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करणार?

मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा लोकशाही मानणाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही. राष्ट्रपती कोणाच्या खिशात नसतात, असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत … Read more

लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत फरार !

नवी दिल्ली : लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. फोटोग्राफरच्या प्रेमात पडलेली तरुणी माहेरी येण्याच्या निमित्ताने प्रियकराचा हात धरुन फरार झाली. दिल्लीतील गोकुलपुरी भागात हे प्रेमाचं त्रांगडं घडलं. लग्नाच्या महिनाभर आधी संबंधित तरुणीचं एका तरुणावर प्रेम जडलं. लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिला लग्न मोडण्याचा धीर होईना. अखेर लग्नानंतर … Read more

लग्नाची वरात काढण्यावरुन झाले वाद, भर लग्नात वधु आणि वर पक्षात हाणामारी !

हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय. कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात … Read more