मतदान कक्षात सेल्फी काढणे आले अंगलट

नाशिक : शहर आणि जिल्ह्यातील उत्साही मतदारांना मतदान कक्षात सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले असून, सात सेल्फी बहाद्दरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  नागरिकांनी सेल्फीचा मोह टाळावा तसेच मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेले असून, सेल्फी काढण्याचा मोह हा एक गुन्हा ठरला आहे. संबंधितांविरोधात रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत … Read more

EVM गडबडीबद्दल कबुली देणाऱ्या भाजप उमेदवाराबद्दल राहूल गांधी म्हणाले…

नवी दिल्ली : ‘मतदान यंत्रातील गडबडीची जाहीर कबुली देणारे भाजप उमेदवार बख्शीशसिंह विर्क हे सत्ताधारी पक्षातील एकमेव इमानदार व्यक्ती आहेत,’ असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपला हाणला आहे.भाजपचे हरयाणातील उमेदवार बख्शीशसिंह विर्क यांनी रविवारी ‘विधानसभा निवडणुकीत कुणालाही मत दिले तरी ते भाजपलाच मिळणार’ असल्याचा वादग्रस्त दावा केला होता. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात … Read more

राज्यातील पहिल्या मतदान केंद्रावर झालं फक्त ३२८ पैकी 1 चं मतदान

नंदूरबार : राज्यातील प्रथम क्रमांकाच्या अक्कलकुवा मतदारसंघातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र असलेल्या मणिबेली या केंद्रावर केवळ एकच मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ३२८ पैकी ३२७ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.  अक्कलकुवा-अक्राणी हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघ आहे. तर याच मतदार संघात मणिबेली हे प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. अतिदुर्गम भागात असलेले हे मतदान केंद्र … Read more

चंद्रकांत पाटलांच्या त्या ऑफवर मनसेचे किशोर शिंदे म्हणाले…

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिली.  अर्थात त्यांची ही ऑफर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली. या ‘ऑफर’ प्रकरणाची कोथरूड व शहरात सध्या जोरदार चर्चा झाली.  कोथरूड विधानसभेचे भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनीही मयूर कॉलनीमधील … Read more

ईव्हीएम मशीनसमोरच मतदाराने सोडला जीव

पिंपरी : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही ते मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रात दाखल झाले. मात्र ईव्हीएम मशीनसमोरच त्यांचा मृत्यू झाला.  अब्दुल रहीम नूरमोहम्मद शेख (६०, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. शेख हे पूर्वी भोसरीत राहत होते. ते दोन वर्षांपूर्वी बारामतीमध्ये राहण्यास गेले होते.  तसेच चार महिन्यांपूर्वी त्यांना घशाचा … Read more

भुजबळ कुटुंबीयांनी मतदानाकडे पाठ का फिरवली?

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यादीत नाव नसल्याची तक्रार करणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांनी आता विधानसभा निवडणुकीत मात्र मतदानाकडे पाठ फिरवली. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ येवला व नांदगाव मतदारसंघातच अडकून पडल्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदारयादीतील विधानसभेसाठी मात्र मतदान केले नाही!सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ कुटुंबीय नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान केंद्रावर … Read more

इतिहासात प्रथमच पाकिस्तानने बंद केली भारताची टपालसेवा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानातील तणाव वाढतच चालला आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाकिस्तानने दोन्ही देशांच्या दरम्यान सुरू असलेली टपाल सेवा बंद केली आहे.  मागील दीड महिन्यापासून भारतातून येणारी पत्र घेणे बंद केले आहे. यामुळे दोन्ही देशांत सुरू असलेली ही टपाल सेवा आता खंडित झाली आहे.  भारतीय डाक विभागाच्या उपमहासंचालक अजय … Read more

घरी बसून मतदानाची सोय हवी – नाना पाटेकर

विविध मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी निवडणूक व राजकारणी मंडळी यांच्यावर देखील आपले रोखठोक मत व्यक्त केले. दिवसेंदिवस मतदानाचा घसरणारा टक्का ही चांगली बाब नाही.  सरकारने मतदान जनजागृतीसाठी सर्व उपक्रम राबवले आहेत. मात्र घरी बसूनदेखील मतदान करण्याची सोय उपलब्ध व्हावी, असे ते म्हणाले. दादर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क … Read more

ईव्हीएम हॅकिंग, मोबाइल जॅमरची मागणी फेटाळली

मुंबई – काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम हॅकिंग करता येऊ नये यासाठी स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर लावण्याची मागणी केली आहे. मात्र ईव्हीएम यंत्रे फूलप्रूफ असल्याचे सिद्ध झाले आहे. या यंत्रांना बाह्य संपर्क यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकत नाही.  त्यामुळे मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी सोमवारी … Read more

कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय होणार ६० वर्षे

नवी दिल्ली –  केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित नियमांत बदल करणार असून निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० केले जाण्याची शक्यता आहे.  ईपीएफओच्या नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या दुसऱ्या बैठकीत यावर विचार होऊ शकतो. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होईल. नियमात हा बदल करण्यासाठी ईपीएफ कायदा-१९५२ मध्ये दुरुस्ती करण्याची तयारी सुरू असून निवृत्तीच्या … Read more

जामखेडला मतदानाचा टक्का वाढला

जामखेड – जामखेड शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्याने सर्वांना मतदान करता आले. त्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. सकाळी मतदान करण्यासाठी येणाऱ्यांत महिलांची संख्या जास्त होती. नवमतदार प्रथमच आपला हक्क बजावत असल्याने त्यांच्यात उत्साह दिसत होता. दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बांधखडक येथील घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. कर्जत-जामखेड … Read more

राहुरीत दोघांचा गळफास, तर एकाचा अपघाती मृत्यू

राहुरी शहर –  राहुरी तालुक्यात सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. घोरपडवाडी येथे हाॅटेल आयाममागे सुदाम चंद्रभान बर्डे (वय १९) या तरुणाचा निलगिरीच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून घेतलेला मृतदेह आढळला.  राहुरी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या घटनेत सोनगाव येथील अनापवाडी येथील सचिन यशवंत अनाप (वय २६) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या … Read more

शहरात उशिरापर्यंत लागल्या होत्या रांगा

नगर –  मताधिकार बजावण्यासाठी नगरकर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. पावसाने अचानक हजेरी लावली, तरी मतदारांमध्ये चांगला उत्साह पहायला मिळाला.  सायंकाळी पाचपर्यंत जिल्हाभरातील मतदानाचा टक्का ६२ पर्यंत पोहोचला होता, तर नगर शहरातील मतदानाचा टक्का ५२ वर होता. जिल्हाभरातील प्रतिसादाच्या तुलनेत नगर शहरात कमी प्रतिसाद मिळत असल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून … Read more

जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

अहमदनगर – पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात … Read more

पालकमंत्री राम शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा

जामखेड – पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत.  यामुळे चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात हाणामारीच्या … Read more

मतदारांना पैशाचे आमिष, तिघांवर गुन्हा दाखल

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत देण्यासाठी मतदारांना पैशाचे आमिष दाखवून ते देण्याच्या उद्देशाने स्वत: जवळ १ लाख ५२ हजार ३०० रूपये बाळगल्याप्रकरणी तिघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिल रामकृष्णा भोसले (रा.सरकोली), सोमनाथ चंद्रकांत घाडगे (रा. अन्नपूर्णानगर), दीपक त्रिंबक येळे (रा. येळे वस्ती, पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे … Read more

चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या

नाशिक:चारित्र्याचा संशय व लग्नात मानपान दिला नाही या कारणावरून त्रस्त झालेल्या एका विवाहितेने शेततळ्यात आत्महत्या केल्याची घटना शिंदे पळसे भागात घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोपट पुंडलिक सोनवणे (३५, रा. इंदिरानगर, पाथर्डी गाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांची भाची दीपालीचा विवाह सन २०१८ मध्ये नाशिक – … Read more

धक्कादायक! दोन चिमुकल्यांचा गळा घोटून दाम्पत्याची आत्महत्या

बेळगाव : गोकाक तालुक्यातील होसूर गावात शनिवारी रात्री पोटच्या दोन मुलांचा गळा घोटून दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. भीमाप्पा सिद्धप्पा चुनप्पगोळ (वय ३०), मंजुळा चुनप्पगोळ (२५), प्रदीप (८) आणि मोहन (६) अशी मृतांची नावे आहेत.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे नेमके कारण कोणते … Read more