आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा

राहुरी  : राहुरी मतदारसंघाच्या विकासाकरिता आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा, असे आवाहन अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ आदी भागात सौ. कर्डिले यांनी महिला व कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. सौ.कर्डिले म्हणाल्या, की गेल्या … Read more

हवेत असलेल्या पाचपुतेंना शेलारांनी घाम फोडला!

श्रीगोंदा – श्रीगोंदा मतदार संघात भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी  मोठी ओढाताण सुरू असल्याचे जिल्ह्याने पाहिले होते. या स्पधेत पाचपतेनी नागवडेंना मागे सोडत भाजपाचे तिकीट मिळवले होते.  उमेदवारी मिळवल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं.  कारण  लोकसभा निवडणुकीतही  या मतदार संघातून खा. डॉ. विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. डॉ. … Read more

विधानसभा निवडणुकीच्या वादातून राडा

कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या वादातून कर्जत तालुक्यात राडा झाला असून, यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास धांडेवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत कर्जत तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक खेडकर यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे बैठक झाली. बैठकीनंतर बाहेर … Read more

खरे निष्क्रिय कोण जनतेला ठाऊक आहे

तांदूळवाडी : राहुरी नगरपालीका निवडणुकीत राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी बोटक्लब, बाह्यवळण रस्ता, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्काय वॉक, चौक सुशोभीकरण, व्यापारी संकुल, घरकुल योजना, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्वच्छता व आरोग्य रुग्णालय, स्वागत कमान या विकास पर्वाची नवी सुरुवात करण्याची ग्वाही नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती. यातील किती कामे आतापर्यंत पूर्ण झाली … Read more

श्रीरामपूरच्या विकासासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे !

श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं

राहुरी : राहुरीकरांनी मला दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली. राजकारणात निवृत्त व्हावं लागतं परंतु कार्यकाळात झालेल काम जनतेच्या लक्षात राहतं. पदापेक्षा केलेलं काम अविस्मरणीय आहे. विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं, त्यांना संधीच सोनं करता आलं नाही, ते मी करून दाखवलं म्हणूनच माझा उगम झाला. महाराष्ट्रात प्रत्येकाला कुठेही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. मी बाहेरचा … Read more

शिवसेनेचा भाजपला धक्का! तब्बल ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजपा-शिवसेना युतीत झालेल्या मतभेदांचा कल्याण-उल्हासनगर पाठोपाठ नाशकातही भडका उडाला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना बळ देण्यासाठी सेनेचे ३६ नगरसेवक व दोन्ही महानगरप्रमुखांसह ३५० पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठीच आपला लढा असल्याचा … Read more

‘काँग्रेसने सावरकरांवर सतत अन्याय केला’

चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर … Read more

पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार ?- अजित पवार

कर्जत : सत्ताधाऱ्यांकडुन जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. परिसरातील रस्त्यांची खुपच दयनीय अवस्था आहे. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक बाजार भाव दिल्क.कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार. मुखमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडील कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग … Read more

उच्च न्यायालयात न्यायाधीशांची कमतरता

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांच्या आपल्या पूर्ण क्षमतेसह काम करत आहे; पण देशातील २५ उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या रिक्त पदांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याची बाब कायदा मंत्रालयाच्या एका आकडेवारीतून पुढे आली आहे. कायदा मंत्रालयाने गत १ तारखेला देशभरातील न्यायालयांच्या यथास्थितीची आकडेवारी जारी केली होती. तद्नुसार, देशातील २५ उच्च न्यायालयांत तब्बल ४२० न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. हा … Read more

राजनाथ सिंहांच्या ‘या’ विधानाचा पाककडून निषेध

इस्लामाबाद : ‘पाकने आपला मार्ग बदलला नाही तर त्याचे विघटन होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही’, या भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाचा पाकने मंगळवारी निषेध केला. ‘भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हरियाणातील एका प्रचारसभेत पाकविषयी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो’, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे. ‘राजनाथ यांचे प्रक्षोभक विधान भाजपची … Read more

माजी खासदार दिलीप गांधी -उपनेते अनिल राठोड यांचे अखेर मनोमिलन

नगर : जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली. गांधी, राठोड, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या बैठकीत मनमोकळी मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार दिलीप गांधी हे महायुतीचे उमेदवार … Read more

यंदा दोनदा दिवाळी साजरी होणार

चंदीगड : यंदा एक दिव्यांची आणि दुसरी कमळाची अशी दोनदा दिवाळी साजरी होणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी कलम ३७० आणि राफेलच्या मुद्यावरून काँग्रेसवरही सडकून टीका केली. मोदींनी हरयाणातील चरखी दादरी येथील भाजप उमेदवार कुस्तीपटू बबिता फोगाट हिच्यासाठी मंगळवारी प्रचार सभा घेतली. चीनचे राष्ट्रपती … Read more

मृत समजून दफन करण्यात आलेली एक नवजात बालिका जिवंत

बरेली : मृत समजून दफन करण्यात आलेली एक नवजात बालिका जिवंत सापडल्याची आश्चर्यकारक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात उजेडात आली आहे. या बालिकेवर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून, तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बरेलीच्या हितेशकुमार सिरोही नामक व्यक्तीला गत गुरुवारी कन्यारत्न प्राप्त झाले होते; पण दुर्दैवाने जन्मानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. … Read more

चहा प्यायल्याने १४ जण बेशुध्द

जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री चहा प्यायल्यानंतर काही महिलांसह १४ जण बेशुध्द पडले. या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अलवरचे मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश मीणा यांनी मंगळवारी दिली. बाबा मोहनदास यांच्या यात्रेत आलेल्या १५ भाविकांनी एका स्टॉलवर चहा पिला होता. त्यानंतर आपल्याला बेशुध्दी जाणवत असल्याचे … Read more

पाकविरोधातील निर्णायक लढ्याला सुरुवात

गुरुग्राम : काश्मीरमधून कलम ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले छुपे युद्ध आणि दहशतवादी कृत्यांचा समूळ नायनाट करण्याविरोधात निर्णायक लढाई सुरू केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आपल्या सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कायमची शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड अर्थात एनएसजीच्या ३५ व्या … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले – उद्धव ठाकरे

इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट … Read more

पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत

राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली. महाराष्ट्रातील किल्ल्यांत … Read more