पैशांसाठी विवाहितेचा छळ

नगर  – पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पती, सासू-सासरे यांच्यासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अभिजित ऊर्फ इनोक अरविंद मोरे, सासू जॅकलिन अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल, सासरा अरविंद गंगाधर मोरे ऊर्फ मॅन्यूअल दीर अनिमेश अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल व मार्गारेट गांगुड, नणंद सुषमा … Read more

बापानेच केले पोटच्या मुलीशी अश्लिल चाळे

नगर – पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीशी बापानेच अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काटवन खंडोबा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.  पीडित मुलगी व तिचा बाप दोघेच घरी असताना तो अश्लिल चाळे करत असे. हा जाच वाढत चालल्याने मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

स्वतःचा रस्ताही त्यांना दुरुस्त करता आला नाही… ते मतदारसंघाचा काय विकास करणार ?

श्रीरामपूर :- तालुक्याचे प्रश्न सोडवायला आमदार भाऊसाहेब कांबळेच हवेत, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणताच कांबळे याना स्वतःच्या घरचा रस्ताही दुरूस्त करता आला नाही, अशी टीका अनिल कांबळे यांनी केली.  श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार भाऊसाहेब कांबळे हवेत, असे आवाहन मुरकुटे यांनी करताच स्वतःच्या घराकडे जाणारा गोंधवणी रस्तादेखील त्यांना गेल्या … Read more

आमदारांबाबत पोस्टवरून तरुणावर तलवारीने हल्ला !

नेवासे :- सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या विरोधी गटातील युवकावर तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री सोनईजवळील शिंगवे तुकाई येथे घडली. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सोमवारी सायंकाळपर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती. ओंकार अरुण होंडे (४०, शिंगवे तुकाई) हा पांढरीपूल एमआयडीसीत नोकरीस आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त … Read more

श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेतीवर अवलंबून- मुरकुटे

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार !

अहमदनगर :- शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा आहे. महापाैर वाकळे यांनी प्रदेशकडे बोट दाखवत सध्या बाहेर प्रचार सुरू असल्याचे सांगत बोलावल्यास शहरातही सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले.  महापालिकेत राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपचे वाकळे हे … Read more

श्रीरामपुरात भाऊसाहेब कांबळे यांचे पारडे जड!

श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने लहू कानडे यांना उमेदवारी दिल्याने तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक उमेदवार … Read more

महिला तलाठीच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव संगमनेर येथील गिरीश अशोक अभंग याने कोपरगाव येथे तलाठी असलेल्या पत्नीच्या बंगल्यावर १३ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची पत्नी सोनाली भीमराव विधाते (माहेरचे नाव) हिच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  पत्नीच्या अनैतिक संबंधातून गिरीशने आत्महत्या केल्याची फिर्याद महेंद्र अशोक अभंग यांनी दिली. गिरीशचे सोनालीबरोबर … Read more

कर्जत-जामखेडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू – अजित पवार

जामखेड – जामखेड येत्या पाच वर्षांत जामखेड व कर्जतचा चेहरामोहरा बदलून टाकू. पाणी, रोजगार व इतर प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी खर्डा येथील रोहित पवार यांच्या सभेत रविवारी रात्री सांगितले.  विरोधक १८ वर्षांपूर्वीचं पत्र दाखवतात, पण २००१ नंतर आमच्याच काळात गोदावरी प्रकल्प सुरू झाला, कृष्णा सीना स्थिरीकरण योजना राबवून पाणी दिलं गेलं … Read more

एमआयडीसी अडवणाऱ्याला जाब विचारा : नीलेश लंके

पारनेर :- घोसपुरी एमआयडीसी अडवणाऱ्याला जाब विचारा : नीलेश लंके नगर तालुका | एमआयडीसी झाली, तर या भागातील गोरगरिबांची मुले नोकरी, धंद्याला लागतील, मग आपल्यामागे फिरायला कोणी राहणार नाहीत. म्हणून गरिबाला गरीब ठेवण्याच्या घातक हेतूने कार्यसम्राट समजणाऱ्या आमदारांनी नगर तालुक्यातील घोसपुरी एमआयडीसीला खोडा घातला. अशा आमदाराला आता तरुणांनी जाब विचारला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार … Read more

कामगारांनी दिला वाकळे यांना कष्टाच्या पैश्यातून निवडणुक निधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुका म्हंटले की अमाप खर्च. हा खर्च पेळविण्यासाठी नगर शहर विधानसभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्यासाठी एमआयडीसी मधील कामगारांनी आपल्या कष्टाचे 10 हजार रुपये निवडणुक निधी म्हणून दिला. सर्वसामान्य नागरिक व कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे वाकळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एमआयडीसीतील क्लासिक व्हिल कामगार संघटना, सिटू … Read more

स्टार प्रचारक कन्हैया कुमार गुरुवारी नगरमध्ये

अहमदनगर – शहर विधानसभा मतदार संघतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीचे  उमेदवार भैरवनाथ तुकाराम वाकळे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.17 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचे (जेएनयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष तथा भाकपचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य कन्हैया कुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही … Read more

अ.नगर शहर-जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ मयूर पाटोळे यांच्या गळ्यात

अहमदनगर युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पद हे लोकसभा निवडणुकी पासूनच रिक्त होते खासदार डॉ. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशा नंतर युवक काँग्रेसच्या जिल्हा निरिक्षकानी संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली होती.  यापूर्वी अहमदनगर युवक काँग्रेसच्या शहरजिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक निखिल वारे हे होते जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याने त्यांचेही पद बरखास्त झाले , त्यानंतर आता महाराष्ट्र … Read more

शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

नगर :- शहर मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून तसे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस अधीक्षकांना देण्यात आले, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथावर हल्ला केला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून घोषित करावा, … Read more

काँग्रेसचे लहू कानडे यांच्यावर मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नाराज !

श्रीरामपूर : लहू कानडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने शहरातील आंबेडकरी चळवळ तसेच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी याबाबत आमदार सुधीर तांबे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच स्थानिक उमेदवार नसल्यामुळे व त्यांचा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क नसल्याने काँग्रेस पक्षाला श्रीरामपूरची निवडणूक जड जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. भाऊसाहेब कांबळे यांचे शिक्षण जरी … Read more

श्रीरामपूरच्या विकासासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे!

श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

सर्वसामान्य जनता हीच शिवसेनेची ताकद : अंबादास पंधाडे

अहमदनगर भगवा या मराठी मातीचा इतिहास आहे. तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा आहे. सवर्सामान्य मावळे ही शिवाजी महाराजांची ताकद होती. शिवसेनेची ताकद ही सर्वसामान्य जनताच आहे. येत्या निवडणुकीत 75 टक्के मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ … Read more

मोदी आणि अमित शहा झोपेतही माझे नाव घेत असतील…

कोपरगाव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून माझ्या नावाचा निष्कारण घोष चालू आहे. झोपेतसुद्धा ते माझेच नाव घेत असतील, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील सभेत बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पवार आले होते. हा तरुण या भागाच्या विकासासाठी झटत आहे. अशा तरुणांची … Read more