राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रचार रथावरील चालकास मारहाण

नगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगर शहरात शिवसेना लोकशाही च्या मार्गाने प्रचार करत आहे.परंतु विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. शिवसेनेच्या प्रचारार्थ मुंबईवरून आलेल्या एलईडी रथाचे चालक व त्याच्या साथीदाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहरामध्ये असे कृत्य करत असून, नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून … Read more

आघाडीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारातून आदिक गायब

श्रीरामपूर: तालुक्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले असून कोण कोणाच्या बाजूने हेच कळेनासे झाले.  त्यात नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी आघाडीच्या बाजूने समर्थन करतील म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांचा प्रचार करतील असे चित्र दिसत असतांना उमेदवार लहू कानडे यांच्या एकही प्रचार सभेला व बैठकीला नगराध्यक्षा अनुराधा आदिक व … Read more

नगर मध्ये आरपीआय सेनेच्या अनिल राठोड यांच्या सोबत

नगर :  महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी … Read more

भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार

भिंगार : लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे भिंगार शहर मागे पडले आहे. येत्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी सांगितले.  पुढे बोलताना राठोड म्हणाले की शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भिंगारमध्ये अनेक कामे झाली. आपण आमदार असताना भिंगारच्या विकासासाठी स्मशानभूमीची संरक्षक भिंत, विविध भागात हँडपंप, हायमॅक्स, बाजारतळावर … Read more

कोल्हेंच्या विजयाची मशाल पुन्हा रिक्षावालेच पेटविणार

कोपरगाव : या पंचवार्षिकला पुन्हा एकदा आ. स्नेहलता कोल्हे यांना आपण निवडून देऊ. पुन्हा एकदा क्रांतीची मशाल आपल्या हाती येणार आहे. पुन्हा एकदा विजयाची क्रांती होणार असून, ही क्रांती गोरगरीब रिक्षावाले व सामान्य जनताच करू शकते, असा विश्वास रिक्षा संघटनेचे संस्थापक जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी शनिवारी (दि. १२) रिक्षा संघटना सदस्य व आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यातील … Read more

अखंड संगमनेर तालुक्याचा विकास करणार – ना. राधाकृष्ण विखे

संगमनेर : आजपर्यंत संगमनेर तालुक्याची विकासाची प्रक्रिया एका कुटुंबापुरती राबविली गेली. आपल्याला आता एका परिवाराचा नव्हे; तर अखंड तालुक्याचा विकास करायचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ वडगावपान, सुकेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत विखे पाटील यांनी राज्य सरकारने केलेल्या … Read more

दहा वर्षात विकासाचा खडासुद्धा टाकला नाही-आ. कोल्हे

कोपरगाव : पुणतांबा परिसराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला केंद्र व राज्य शासनाकडे हे प्रस्ताव मांडून त्यासाठी निधी मिळवावा लागेल. कारण पुणतांबा परिसरात यापूर्वी ज्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता होती त्यांनी विकासाचा साधा खडा सुद्धा टाकलेला नाही, असा आरोप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी पुणतांबा परिसरातील वाकडी व जळगाव येथे प्रचार सभेत माजी आमदार अशोक काळे यांच्यावर केला. … Read more

सेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग

कोपरगाव : उच्चशिक्षित शांत, सरळ, संयमी व वेळप्रसंगी जनतेच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्व आशुतोष काळे यांच्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठांपासून ते युवा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे. आशुतोष काळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी पुकारलेला ऐतिहासिक संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपल्या न्यायहक्कासाठी उपोषणाला बसावे लागते. ही दुर्दैवाची … Read more

हक्कासाठी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही : आशुतोष काळे

कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेला संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागते. मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी दिला. संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी … Read more

संग्राम जगताप नगरच्या विकासाचा चेहरा :खा. डॉ अमोल कोल्हे

नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले. नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप … Read more

माझ्या बोलण्याचा विपर्यास करून माझी बदनामी – डॉ. सुजय विखे

तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप … Read more

महायुतीचा धर्म पाळायलाच हवा : आ. कर्डिले

चिचोंडी पाटील : पाचपुते व माझे काही गैरसमज होते, पण आम्ही आता एकत्र आलो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पाचपुते व विजय औटी यांचेच काम करावे अन्यथा माझ्या घराचे दरवाज़े कार्यकर्त्यांना कायमचे बंद होतील, अशी तंबी आमदार शिवाज़ीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. बुऱ्हाणनगर येथे नगर , पारनेर व श्रीगोंदा, नगर मतदारसंघात येणाऱ्या नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत … Read more

अनेक संस्था तनपुरेंमुळे बंद पडल्या: खा. सुजय विखे

करंजी : राहुरी तालुक्यातील नावारुपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंमुळे बंद पडल्या,ते काय मतदारसंघाचा विकास करणार? असा सवाल करून राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार शिवाज़ीराव कर्डिलेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. आ. शिवाज़ीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आयोज़ित सभेत खा. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील … Read more

नीलेश लंके यांचा शेतकऱ्यांशी संवाद

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराचा तालुक्यात विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे. लंके यांच्या प्रचारार्थ आज पारनेर शहरातील आठवडे बाजारासाठी तालुक्यातील खेड्या -पाड्यांतील आलेले अनेक शेतकरी बांधव, ग्राहक व विक्रेते यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने … Read more

युती शासनामुळे दूध उत्पादक अडचणीत – ॲड. प्रताप ढाकणे

शेवगाव : युती शासनाने दुध संघ मोडीत काढल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होवून ते अडचणीत आल्याच आरोप ॲड. प्रताप ढाकणे यांनी दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यात केला. शेवगाव पाथर्डी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार ॲड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी जोहरापुर, खामगाव, हिंगनगाव, वडूले, वाघोली आदि गावात मतदारांशी संवाद साधला. शहरात दुध उत्पादक शेतकरी, प्रतिनिधी यांचा … Read more

डुप्लिकेट नको; ओरिजिनल भैया पाहिजे !!!

नगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियाचा वापर सर्वचर राजकीय पक्ष आणि नेते करताना दिसत आहेत . शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा प्रचार नगर शहर मतदारसंघात शिगेला पोचला आहे . त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले. शिवसेनेची जाहिरात करणारे हे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हे व्हिडीओ धुमाकूळ … Read more

नगर जिल्ह्यावर राधाकृष्ण विखेंचे गारुड !

नगर जिल्ह्यात पूर्वीपासून विखे यांची यंत्रणा गावोगाव होती; परंतु ती स्वतःच्या गटापुरतं पाहत होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील नेते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अडकले आहेत. स्वतःचा मतदारसंघ सोडून कुणालाही कुठं जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे; परंतु राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे मात्र शिर्डीत अडकून पडलेले नाहीत. त्यांना त्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री असल्यानं त्यांनी … Read more

‘त्या’ कार्यकर्त्यांमुळे आ.संग्राम जगताप अडचणीत !

अहमदनगर :- अवघ्या सात दिवसांवर विधानसभेची निवडणुक येऊन ठेपली असताना आक्रमक कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप अडचणीत आल्याचे दिसत आहे.  हुल्लड कार्यकर्ते, त्यामुळे पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांची वाढती नाराजी, हुल्लडबाजांच्या त्रासामुळे वैतागलेले काही नागरिक ही बाब आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.   कार्यकर्तेही व्यवस्थितरीत्या प्रचार करीत नसल्याने आ. संग्राम जगताप यांना निवडणूक … Read more