संगमनेर मतदारसंघात परिवर्तन होणार

अहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे … Read more

बाळासाहेब थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहेत !

संगमनेर :- स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चागलेच झोडपून काढले आहे. नवले यांच्या प्रचारासभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. ‘ते’ थोरात तर आम्ही जोरात असे म्हणत त्यांनी संगमनेरसह संपूर्ण नगर जिल्हा भगवा करणारच असा विश्वास बोलून … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट शिर्डी विधानसभा मतदारसंघ

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून चंद्रभान घोगरे यांचा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघावर विखे कुटुंबीयाचंच वर्चस्व आहे. अगोदर बाळासाहेब विखे यांचे मावसभाऊ अण्णासाहेब म्हस्के आमदार होते. त्यांच्याकडं राज्याच्या जलसंधारण मंत्रिपदाची धुरा होती. 1995 पासून राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून निवडून जातात. त्यांना आतापर्यंत आव्हान दिलं गेलं; परंतु आव्हान देणारेच काळाच्या ओघात कुठं गडप झाले, … Read more

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

मुंबई : शिवसेनेची पुन्हा सत्ता येणारच आहे. तेव्हा शेतकऱ्याचा सातबारा संपूर्ण कोरा करण्यात येईल. गरीबांना १० रुपयांत जेवण देण्यात येईल. सुदृढ महाराष्ट्रासाठी १ रुपयात आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात येतील. ३०० युनिटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी ३० टक्के सूट, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. राममंदिरासाठी आवश्यकता भासल्यास कायदा … Read more

७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही ?

बीड : वंचित, ओबीसी बांधवांना मोदी सरकारच्या काळात संवैधानिक दर्जा मिळाला. त्यामुळे हा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. ७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला. संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या कल्याणाचा सतत विचार … Read more

केडगावचा विकास करून या भागातील दहशत कायमची संपवणार – किरण काळे

नगर : केडगावचा अजूनही विकास झालेला नाही. अनेक वर्षांपूर्वी केडगावचा नगरच्या हद्दीमध्ये समावेश झाला. परंतु योग्य नेतृत्वा अभावी आजही केडगाव मधील पाणी, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधा केडगावकरांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपण स्मार्ट केडगावची निर्मिती करणारा असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी केले आहे. केडगाव मधील प्रचाराचा शुभारंभ करत … Read more

एकाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा : तालुक्यातील देडगावला शेषराव पांडुरंग मोरे (वय ५८) यांचा खून करण्यात आला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संभाजी शिवाजी थोरात, लक्ष्मण एकनाथ ऐडके (दोघे रा. देडगाव, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत गणेश शेषराव … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट श्रीरामपूर मतदारसंघ

श्रीरामपूरची निवडणूक रंगतदार वळणावर एकेकाळी देशातील साखरेची बाजारपेठ अशी ओळख असलेलं श्रीरामपूर सध्या बकाल झालं आहे. उत्तर नगर जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून या शहराकडं पाहिलं जात होतं; परंतु आता शहराचं वैभव लयाला गेलं आहे. सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी संस्था लयाला गेल्यानं ही अवस्था झाली आहे. ज्येष्ठांच्या निवासाचं शहर म्हणून आता त्याची ओळख व्हायला लागली आहे. … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अहमदनगर शहर मतदारसंघ

युतीत बेकी, राष्ट्रवादीत दुही अहमदनगर  विधानसभा मतदारसंघात साठच्या दशकानंतर तीन दशकं कोणतीही व्यक्ती दुस-यांदा आमदार होत नव्हती; परंतु शिवसेनेच्या अनिल राठोड यांनी ही परंपरा मोडीत काढली. अहमदनगरची सामाजिक रचना, धार्मिक विभागणी लक्षात घेऊन बहुसंख्याकांच्या मनात अल्पसंख्याकांविषयी सातत्यानं दुहीची बीजं पेरून त्यावर आपली मतांची पोळी भाजून घेण्यात राठोड सातत्यानं यशस्वी होत गेले. त्याला कारण ही अन्य … Read more

अनिल राठोडांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची तोफ नगर मध्ये  धडाडणार!

अहमदनगर :- शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार व माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ अहमदनगर मध्ये आज (बुधवारी) संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची सभा नंदनवन लॉन्स येथे होणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नगर मध्ये तोफ धडाडणार असून उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणता संदेश देणार याकडे लक्ष लागले आहे. या सभेत ठाकरे काय बोलतात याची नगर वासियांना उत्सुकता … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट कर्जत-जामखेड मतदारसंघ

रोहित पवार-प्रा.शिंदे यांच्यातला सामना रंगणार लक्षवेधी लढत: कर्जत-जामखेड मतदारसंघ कर्जत-जामखेड मतदारसंघावर गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. त्याला कारणही इथली समाजरचना. नगर जिल्ह्यात पहिलं कमळ फुलविण्याचा मान याच मतदारसंघाकडं जातो. मतदारसंघ आरक्षित असतानाही इथं भारतीय जनता पक्षाचाच आमदार होता आणि मतदारसंघ खुला झाल्यानंतरही भाजपचंच वर्चस्व कायम राहिलं. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातून प्रा. राम … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अकोले मतदारसंघ

चार दशकांची विजयाची परंपरा पिचड राखणार का? लक्षवेधी लढत-अकोले राज्यातील सर्वांत उंच शिखर असलेलं कळसुबाई, भंडारदरा, हरिश्चंद्रगडासारखी पर्यटनस्थळं असलेला अकोले हा मतदारसंघ. राज्यात गेली चार दशकं एकाच कुटुंबाची सत्ता असलेली जे अपवादात्मक मतदारसंघ राज्यात आहेत, त्यात अकोल्याचा समावेश होतो. मधुकर पिचड यांनी ती किमया केली आहे. अगोदर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास … Read more

अकोलेत ‘श्रीगोंदा पॅटर्न’ राबविण्याची व्यूव्हरचना !

अकोले  – मला डॉक्‍टर सायबासनी शंभर रुपये द्यायचेत… असे म्हणत एका फाटक्‍या तुटक्‍या कपड्यात असणाऱ्या इसमाने आपली घड्या घातलेली नोट आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारनिधीसाठी दिले… आणि बघता बघता उपस्थित आघाडी प्रेमींनी आपला खिसा रिता केला… अवघ्या पाच मिनिटांत एक लाख रुपयांची मदत आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या पदरात पडली. आपला उमेदवार गरीब … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद

जामखेड  – भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. पहाटे पाच वाजल्यापासून शिंदे यांचा दिनक्रम सुरू होत असला, तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची कामे चालूच असतात. रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका, अशा सगळ्याच माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांशी … Read more

आ.कर्डिले यांच्या कडून खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल

राहुरी :- तालुक्यात आ. शिवाजी कर्डिले हे मी १२०० कोटींची कामे केल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे प्रलंबित असताना ते खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करत आहे. आ. कर्डिले सांगत असलेल्या कामांची जनतेने पाहणी केल्यास दूध का दूध होईल, असा विश्वास युवानेते नंदकुमार गागरे यांनी व्यक्त केला आहे. गागरे म्हणाले, जनतेने कोणत्या पक्षाला मतदान … Read more

काँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे !

संगमनेर :- आज प्रदेशाध्यक्ष कोठे दिसत नाही, असे विचारणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी साडेचार वर्षे, जर प्रामाणिकपणे काम केले असते, तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. लोकसभा निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळेंसाठी मी रात्रीचा दिवस केला. मात्र, तो गडी तिकडे गेला. सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत, अशी टीका … Read more

साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली ?

श्रीगोंदे :- कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची माहिती काढायची, कोर्टात याचिका दाखल करायची आणि स्वार्थासाठी आर्थिक तडजोड करुन नेतेगिरी करणाऱ्याला कायमचे घरी बसवा, असे आवाहन तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी मंगळवारी केले. काष्टी येथे भाजपचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विठ्ठलराव काकडे, सदाशिव पाचपुते, विजय भोईटे, बापूसाहेब हिरडे, काका रोडे, … Read more

राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन

पारनेर :- गेल्या पाच वर्षांत राज्याचा कारभार अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक, दलित, ओबीसी, तसेच आया-बहिणींच्या हितासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीस आम्ही विशेष महत्त्व दिले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील … Read more