भारत पेट्रोलियम हिस्सेदारी रिलायन्स इंडस्ट्रीजला विकणार ?

नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम यामधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत मोदी सरकार असून ती खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पाहणी संस्थेच्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनही यासाठी बोली लावण्यास तयार आहे.निर्गुंतवणुकीच्या बाबतीत सरकारच्या बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के अशी पूर्ण हिस्सेदारी विकण्याची शिफारस … Read more

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल

सोलापूर : आचारसंहिता कालावधीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उद्घाटनाची कोनशिला न झाकता उघडी ठेवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राचार्य विजय काकडे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याप्रकरणी फिरते भरारी पथकाचे प्रमुख धनंजय पवार यांनी फिर्याद दिली आहे. शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निवडणूक आयोगाचे फिरते भरारी … Read more

मुलाने ‘ह्या’ कारणामुळे दवाखान्यातच बापाचा केला गळा दाबून खून

कोल्हापूर : वृद्ध वडिलांच्या जांघेत गाठ उठल्याने ते सतत आजारी पडतात. दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु त्या अयशस्वी ठरल्या. उपचाराचा खर्च पेलवत नव्हता.  वडिलांना होणाऱ्या असह्य वेदना पाहून हतबल झालेल्या मुलाने धाडसी निर्णय घेत चुलत्याच्या मदतीने वडील नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडित्रे, ता. करवीर) यांचा सीपीआर रुग्णालयातच गळा दाबून खून केला. मे … Read more

माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी एकास अटक

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी बंदूक परवाना असलेल्या एका व्यक्तीला रविवारी पोलिसांनी अटक केली. झिंझाना पोलीस ठाणे हद्दीतील अबदान गावातील हाफिज अहमद नावाच्या व्यक्तीने शनिवारी एका माकडाची गोळी झाडून हत्या केली. संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी … Read more

हत्याकांडाच्या तपासाला तब्बल १७ वर्षांनंतर यश,१४ वर्षांत कुटुंबातील ६ जणांची सायनाइड देऊन हत्या!

कोझिकोड : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका कुटुंबातील ६ जणांच्या गूढ हत्याकांडाच्या पोलीस तपासाला तब्बल १७ वर्षांनंतर यश आले. एका महिलेने १४ वर्षांच्या कालावधीत अतिशय शांत डोक्याने घरातील ६ सदस्यांचा सायनाइड देऊन काटा काढला होता. एखाद्या रहस्यमयी चित्रपटातील कथानक वाटेल, असा या गूढ प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.. … Read more

विरोधी पक्षांचे राजकीय दिवाळे निघाले !

नवी दिल्ली : ‘विरोधी पक्षांचे राजकीय दिवाळे निघाले आहे. त्यांच्याकडे नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत’, अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी विरोधकांची, सरकार राजकीय सूड उगवत असल्याची टीका फेटाळून लावली. केंद्र सरकारविरोधी पक्षांच्या नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर … Read more

अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच निकाल येईल !

गोरखपूर : अयोध्येतील वादग्रस्त भूखंडासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या नियमित सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिराच्या मुद्यावर लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचे सूचक विधान केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शनिवारी गोरखपूरस्थित चंपादेवी पार्कमध्ये मोरारी बापू यांच्या रामकथा वाचनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात होणार ‘इतक्या’ सभा

नवी दिल्ली : विजयादशमीच्या मुहूर्तानंतर महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात १० व हरयाणात ५ प्रचारसभा घेऊन प्रामुख्याने कलम ३७०, पारदर्शक प्रशासन, एनआरसी आदी राष्ट्रीय मुद्यांवर जोर देणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह हेसुद्धा या राज्यांत मोदींहून दुप्पट सभा घेऊन भाजपची सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहेत. … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटेंना धक्का, गडाख-घुलेंचे झाले मनोमिलन !

नेवासा :- राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी गडाख व घुले यांचे मनोमिलन होईल का? या राजकीय शंकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज सकाळी क्रांतिकारीचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी भेंडा येथे त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली . मागील निवडणुकीतील … Read more

‘हे’ आहेत नगर जिल्ह्यातील कोट्याधीश उमेदवार

नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या दिग्गज उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांकडे आहे. रोहित यांच्याकडे तब्बल ५४ कोटी ७८ लाखाची तर त्याखालोखाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे २४ कोटी ७८ लाखाची संपत्ती आहे.  भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक १७ कोटी ४० लाखांची सपत्ती आहे. गुरुवारी जिल्ह्यातील … Read more

नागवडे करणार पाचपूतेंचे काम; कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात एकमकांचे परंपरागत राजकीय विरोध असलेल्या नागवडे व पाचपुते ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर श्रीगोंदाकरांना कधी नव्हे ते आता एकत्र दिसणार आहे. खा. डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्ता सहविचार मेळाव्यात सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचे अधिकृत … Read more

राज्यात दोन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे ;- येत्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या अनेक भागांत तसेच कोकणात व गोव्यात ७ आणि ८ ऑक्टोबर या दोन दिवसांत पाऊस पडेल. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार यंदा थंडीचे आगमन लवकर … Read more

घुले बंधूंच्या रणनीतीमुळे निवडणूक बनली अटीतटीची!

शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून वापरला गेलेला कास्ट पॉलिटिक्‍सचा फॉर्म्यूला राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही गवसल्याने विधानसभा निवडणूकीत रंगत वाढली आहे. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक घुले बंधूंच्या रणनितीमुळे अटीतटीची बनली आहे. भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ऍड. प्रताप ढाकणे यांना निवडणूक रिंगणात उतरून घुले बंधूंनी 1999 साली स्वर्गीय मारुतराव घुले यांनी वापरलेल्या … Read more

शहराचे आरोग्य धोक्यात, रुग्णालये हाऊसफुल्ल

नगर :- शहरात डासांचा उपद्रव व डेंग्यूसदृश आजाराचा ज्वर वाढला आहे. शहरातील आरोग्य धोक्यात असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली जाते, परंतु डासांचे निर्मूलन करण्यात मनपाला अपयश आले आहे. सभागृह नेते स्वप्नील शिंदे यांच्या परिवारातील दोन सदस्य डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल आहेत. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था असेल, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला … Read more

कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटतय – बच्चू कडू

यवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली. कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत … Read more

उदयनराजे भोसले हे अनाजी पंतांसारख्याच प्रवृत्तीला बळी गेले – धनंजय मुंडे

मुंबई :“छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती होती. आताही तशी प्रवृत्ती या समाजात आहे. याच प्रवृत्तीला उदयनराजे भोसले बळी पडले आणि यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला,” असं मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. “जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय … Read more

निवडणूकीदरम्यान ४ दिवसांसाठी दारुविक्री बंद

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस … Read more

म्हणून मी पक्षांतर केले… उदयनराजे भोसले

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे. त्यासोबतच त्यांची पक्षांतर करण्याची भूमिकाही लोकांना पटवून द्यावी लागणार आहे. ‘काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे … Read more