जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : सालीमठ

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस पोलीस … Read more

बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल ; ‘हा’ असेल वाहतुकीचा मार्ग..

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त अ.नगर सायकलिंग क्लब व कल्पतरु ग्रुपच्या वतीने दि.५ जानेवारी रोजी नगर सायक्लोथॉन राईडचे आयोजन करण्यात येणार आहे.या कालावधीमध्ये वाहतुकीमुळे सायकलपटूंची गैरसोय होवु नये तसेच सायकलपटूंच्या सुरक्षिततेस धोका पोहोचू नये यासाठी सकाळी ६ ते दुपारी ११ वाजे पर्यंत बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत. दरेवाडी हरपाल … Read more

प्राजक्त तनपुरे यांचा ईव्हीएम पडताळणी अर्ज मागे

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएम मशीन संदर्भात शंका उपस्थित करीत त्याच्या पडताळणी करिता जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी मतदान केंद्रांची सूची स्वतंत्ररीत्या सादर करीत तपासणीचे अर्ज निवडणूक शाखेकडे केले होते. यापैकी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी सादर केलेला अर्ज लेखीपत्र देऊन मागे घेतला आहे. … Read more

नव्या रूपात साकारणार माळीवाडा बसस्थानक ; जुने झाले भुईसपाट !

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: पहिली एसटी बस नगरहून पुण्याकडे पहिल्यांदा जेथून धावली त्याच परिसरात ७० वर्षांपूर्वी ऐतिहासिक माळीवाडा बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली.सात दशकांचे उन्हाळे-पावसाळे झेललेले हे माळीवाडा बसस्थानक काळाच्या ओघात जीर्ण झाले.आता या ऐतिहासिक बसस्थानकाची नवनिर्मिती सुरु झाली असून त्यासाठी जुने बसस्थानक मागील आठवड्यातच भुईसपाट करण्यात आले आहे. नवनिर्मितीनंतर देखण्या स्वरूपात माळीवाडा बसस्थानक प्रवासी … Read more

कोपरगावच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळयात

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दि. 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे, (वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, … Read more

दिलीप सातपुते पुन्हा शिवसेनेत ; एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश, ठाकरेंचे शिवबंधन तोडले

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंदा येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ठाकरे सेनेत दाखल झालेल्या माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शिवबंधन तोडत आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलेले दिलीप सातपुते हे शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. नगर शहरातील राजकारणात सातपुते … Read more

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात … Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या एनयुएलएम अभियानातून महिला बचत गटांना ५३ लाखांचे कर्ज

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या ५३ लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, … Read more

शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण लवकरच

३ जानेवारी २०२५ शिर्डी: शिर्डी विमानतळावर उडाण योजनेअंतर्गत लवकरच नाईट लँडिंग विमानसेवा सुरू होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याची योजना आहे,अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली. गुरुवारी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मोहळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी … Read more

मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू : आ. कर्डिले

३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर भिंगार : येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्र मंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आ. शिवाजीराव कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार कर्डिले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला असून दोन … Read more

Ahilyanagar Crime : भाचीस नेण्यास आलेल्या मामाचा कान तोडला…

३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : भाचीला घरी नेण्यासाठी आलेल्या मामाला चौघांनी शिवीगाळ दमदाटी, मारहाण करुन त्यातील एकाने कानाला कडाडून चावा घेत कानाचा लचका तोडला.ही घटना केडगाव देवी मंदिर परिसरात मंगळवारी (दि.३१) रात्री ९.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय खंडके (पूर्ण नाव माहित नाही), गणेश बनारसे (रा. संदिप हॉटेल जवळ, केडगाव), भावड्या कोतकर व अन्य एकजण … Read more

Ahilyanagar Breaking : इन्स्टाग्रामवर चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ अपलोड; नगरमधील चौघांवर गुन्हा दाखल

३ जानेवारी २०२५ नगर : सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ, फोटो, मजकूर (चाइल्ड पोर्नोग्राफी) प्रकाशित केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यातील ४ जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या संशयितांची माहिती केंद्र सरकारकडून राज्य पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यातील ४ इंस्टाग्राम खाते धारकांवर … Read more

ऑनलाईन फायली दहा दिवसात निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेचे नियोजन !

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या, मंजुरीला विलंब होत असल्याने यात सुसूत्रता आणून कामकाजात गतिमानता आणण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. ऑनलाईन फाईल सबमिट करण्यापूर्वी त्या फायलींची ऑफलाईन पडताळणी केली जाईल. सर्व त्रुटी दूर करूनच ऑनलाईन फाईल सबमिट केली जाईल. यामध्यामातून ऑनलाईन फायली दहा दिवसात निकाली काढता येतील व नागरिकांना वेळेत व जलद गतीने … Read more

हेच का मनपा आयुक्तांचं फ्लेक्समुक्त शहराचं धोरण ? किरण काळे यांनी साधला निशाणा

अहिल्यानगर : नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेक्समुक्त करणार असल्याचं धोरण जाहीर केलं. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाईल असे सांगितलं. मात्र काही तास उलटले नाही तोच काँग्रेसने मनपाच्या गलथान कारभारावर सवाल उपस्थित केला आहे. प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या राजकीय अनधिकृत फ्लेक्स वरून हेच का मनपा आयुक्तांचं फ्लेक्समुक्त शहराचं धोरण ?, असा जाहीर … Read more

शिक्षण आणि वाचनाने माणूस प्रगल्भ होतो ‘टग्या-टिगीच्या करामती’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक मांगडे यांचे मत

अहिल्यानगर : शिक्षण आणि पुस्तकांचे वाचन यातूनच माणूस खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो. त्यासाठी प्रत्येक शाळेत आणि घरोघरी लहान मुलांना सहजपणे वाचता येतील अशा पद्धतीने पुस्तकांची उपलब्धता असावी असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब मांगडे यांनी व्यक्त केले. लेखक ‘टग्या-टिगीच्या करामती’ या बालकथा संग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. रुईखेल (ता. श्रीगोंदा) येथील शेळके वस्ती येथे आयोजित … Read more

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : आ. ओगले

२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ओगले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांना स्पर्श करीत त्यामध्ये दूध दरवाढ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, तसेच सोयाबीन व … Read more

पारनेर – अहिल्यानगरच्या पठारभागाला कुकडीचे पाणी द्या : झावरे

२ जानेवारी २०२५ टाकळी ढोकेश्वर : पारनेर अहिल्यानगर तालुक्यातील पठार भागास पाणी मिळाल्यास अनेक वर्षांचा असलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल, यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. झावरे यांनी नुकतीच ना. विखे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. … Read more

विवाहाचे निमंत्रण आता सोशल मीडियावर

२ जानेवारी २०२५ सुपा : हिंदू धर्मात विवाह हा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो.लग्न विधीवत व मुहुर्तावर व्हावा, यासाठी लोक प्रयत्नशील असतात. विवाह समारंभास नातेवाईकांनी हजेरी लावावी म्हणून त्यांना लग्नपत्रिकेच्या माध्यमातून आमंत्रित केले जाते. परंतु काळाचा महिमा अगाध आहे. त्याच्या पोटात जे गडप होते ते पुन्हा कधी बाहेर येतच नाही. मग त्या प्रथा, परंपरा असोत … Read more