प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर शाळा उघडल्या; दुसऱ्या दिवशी 14 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहेत. त्यानुसार राज्यातील तब्बल 5 हजार 947 शाळाची घंटा वाजली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी 151 शाळांमध्ये 14 हजार 778 विद्यार्थी यांची उपस्थिती नोंदवली गेली. करोनामुळे … Read more

बंदी असतानाही भरविली बैलगाडी शर्यत; आता होणार गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- कोरोना नियमाचा फज्जा उडवत पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले.याबाबतची माहिती मिळताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या घटनास्थळी दाखल झाल्या व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता पारनेर तालुक्यातील२२ गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शिरापूर … Read more

….म्हणून ‘त्या’ विवाहितेने घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय ! 

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   पाण्याचा प्लॅन्ट टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आनण्यासाठी नेहमी होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासु सासर्‍यांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जामखेडमध्ये घडली आहे. अमरीन शेख असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. तर मौज्जम अल्ताफ शेख (पती), … Read more

‘त्या’ बांधकाम व्यावसायीकाच्या मालमत्ता लिलावास स्थगिती?

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायीकाच्या मालमता लिलावास महसूल व वन विभागाने स्थगिती दिली आहे. लिलावासाठी ठेवलेली मालमत्ता संबंधिताने यापुर्वीच विक्री केली असून, या व्यवहाराची महसुलकडे नोंदच नसल्याचे समोर आले आहे. पाथर्डी शहरातील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांना  २०१६ साली अवैध गौण खनिज प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी ३७ लाख रुपयांचा दंड केला … Read more

कर्तव्यात कसूर केल्याने या पोलीस निरीक्षक निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक रोहिदास अशोक माळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यानी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येत असल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना … Read more

तर कारखानदार शेतकर्‍यांना जादा ऊसाचा दर सहज देऊ शकतात

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   उसाचे उत्पादन वाढले तर परिणामी साखरेचे उत्पादन वाढते. त्यामुळे साखर कारखान्यावर शिल्लक साखरेचा व्याजाचा बोजा दिवसेंदिवस वाढतो. यामुळे साखर कारखाने अडचणीत येण्याची भिती आहे. अशी स्थिती वेळोवेळी साखर कारखान्यांवर येवु शकते. इथेनॉल निर्मिती आणि त्याचे उत्पादन वाढविणे हा यावर उपाय आहे, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. गेल्या दोन … Read more

धक्कादायक ! फिल्ममेकिंगच्या नावाखाली ‘हा’ दिग्गज निर्माता चालवत होता सेक्स रॅकेट

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  एका प्रोडक्शन कंपनीच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या हॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्याला अटक करण्यात आली आहे. निर्माता डिल्लन जॉर्डनला कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नाडिओ काउंटीमधून अटक करण्यात आली आहे. डेडलाइनने दिलेल्या अहवालात त्याच्याविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यानुसार असे म्हटले जाते की हॉलिवूड चित्रपट निर्मात्याने 2010 ते मे 2017 पर्यंत अमेरिकेत राहणाऱ्या आणि … Read more

जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रिय होऊ लागला

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  जिल्ह्यात काही भागात करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील रुग्ण संख्या आढळून आलेल्या गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करुन लक्षणे आढळणार्‍या रुग्णांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे असे प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. … Read more

कोरोना इफेक्ट ; परिस्थिती इतकी ढासळली कि स्वतःचे अवयव विकायला काढले

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  कोरोना काळात जगातील कोट्यावधी लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. काही लोकांकडे काम नव्हते, तर अशी अनेक लोक होती ज्यांच्या बचत या कालावधीत संपल्या. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बहुतेक गजबजलेले असणारे रस्ते रिकामे झाल्यामुळे ‘स्ट्रीट सिंगर’ रोनाल्डसमोरही मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्कूटरवर गाणे … Read more

चोरटे सक्रिय ! जॉगिंग पार्क येथून एक दुचाकी लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- गुन्हेगारीमध्ये सातत्याने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत असलेला नगर जिल्हा गुन्हेगारीचे विक्रम तोडत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र अपेक्षित गुन्ह्याची उकल होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात … Read more

येणारे 3 वर्षे ‘ह्या’ 4 राशीच्या लोकांसाठी असतील लकी ; शनिदेवांच्या साडेसातीपासून मिळेल मुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  शनिदेवास न्यायाची देवता म्हटले जाते, जे लोकांना त्यांच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांनुसार फळ देतात. वैदिक ज्योतिषातही शनि या ग्रहाला खूप महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की शनि अडीच वर्षे एक राशीत राहतो. सर्व ग्रहांमध्ये त्याची गती सर्वात मंद आहे. त्याच वेळी, शनीची दशा साडेसात वर्षे असते. येत्या … Read more

पोलिसांना टीप दिल्याचा राग आल्याने दोघांना बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे पाच जणांनी मिळून दोघा जणांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाला टिप देऊन छापा टाकायला लावला असल्याच्या कारणावरून हि मारहाण झाल्याचं समजते आहे. याबाबत अंकित गोद आसावा (रा. सोनगाव ता. राहुरी) याने राहुरी पोलिसांत … Read more

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू! वडील आणि भाऊ जखमी 

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- पहाटे शौचासाठी घराबाहेर जात असताना घराबाहेर पडलेल्या विजेच्या तारेवर पाय पडल्याने युवकाच्या ओरडण्याने वडील व मोठा भाऊ यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना जबर धक्का बसून ते दोघ जखमी झाले. एकाचा मृत्यू झाला. ही घटना जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे पहाटे घडली. योगेश बळीराम जायभाय असे त्या … Read more

‘त्या’माजी नगराध्यक्षांचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जगन्नाथ गवजी चव्हाण यांचे अपघाती निधन झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून गावात जात असताना देवळाली प्रवरा- श्रीरामपूर रोड येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाले. … Read more

हे काय भलतंच; त्यांनी केला चक्क बिबट्यावर हल्ला! तो’ झाडावर चढला अन्यथा..?

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- नुसते त्याचे नाव जरी ऐकले तरी भल्या भल्याची भीतीने गाळण उडते. मोठ मोठ्या प्राण्यांची सहज शिकार करणाऱ्या बिबट्यावर चक्क रानडुकरांनी हल्ला केला. यावेळी बिबट्या नारळाच्या झाडावर चढला अन्यथा त्याचीच शिकार झाली असती. ही घटना राहाता तालुक्यातील राजुरी येथे घडली. या बाबतची माहिती अशी की राहाता तालुक्यातील राजुरी येथे … Read more

अर्बन बँक फसवणूक: ‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन नामंजूर आता ‘या’ गुन्ह्यात वर्ग करणार

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- नगर अर्बन बँकेच्या २२ कोटी ९० लाख रूपये कर्ज फसवणूक प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ.भास्कर सिनारे व डॉ.रवींद्र कवडे यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत. दरम्यान शहर सहकारी बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात या तीन डॉक्टरांचा … Read more

आ. निलेश लंकेे यांच्या लोकप्रियतेमुळे खा. सुजय विखे धास्तावले !

अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :-आमदार नीलेश लंके पुढील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार असतील, या शक्यतेने खासदार डॉ. सुजय विखे धास्तावले आहेत. त्यामुळेच ते आ. लंके व कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बिनबुडाची टिका करत असल्याचे सांगत आ. नीलेश लंके समर्थक दादा शिंदे व कारभारी पोटघन मेजर यांनी … Read more

कांदा मार्केटमध्ये कांद्याची 65 हजार गोण्या आवक,प्रतिक्विंटल भाव मिळाला..

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची जवळपास 65 हजार गोण्या (64 हजार 901) गोण्या आवक झाली होती. भाव जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत निघाला. कांद्याच्या एक नंबरच्या मालाला 1700 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला … Read more