मुस्लिम समाजाच्या वतीने जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- शहरातील जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेत करण्यात आलेले बेकायदेशीर नवीन बांधकामाचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे निवेदन ट्रस्टचे विश्‍वस्त व मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, विश्‍वस्त आरिफ खान, हाजी वाहिद कुरेशी, अन्सार सय्यद, शेख अब्दुल कादिर, बरकतअली शेख, मुजाहिद कुरेशी … Read more

ऊन, पाऊस व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-वाढते ऊन व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने शहरातील हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क वाटप उपक्रमाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. माळीवाडा बस स्थानक व जुनी महापालिका येथील रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या कष्टकरी बांधवास छत्री व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी … Read more

अहमदनगर हादरले ! चारित्र्याच्या संशयातून पोटाला दगड बांधून पत्नीची हत्या …

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना पारनेर मध्ये घडली आहे. महिलेच्या पोटाला दगड बांधून तीला तलावात टाकून देण्यात आले होते. नंदा पोपट जाधव असे मयत महिलेचे नाव असून आरोपी पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more

आमदार संग्राम जगताप यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी आमदार जगताप यांना सन्मानपत्र प्रदान केले. यावेळी संभाजी पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस गणेश बोरुडे, आढाव सर, दीपक खेडकर, प्रवीण शिंदे, अमोल येवले, श्रीकांत कुटे आदी उपस्थित होते. शरचंद्र आढाव म्हणाले … Read more

तहसीलदारांचा आदेश; व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारकच

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-ब्रेक दि चेनच्या माध्यमातून सरकारने करोना प्रतिबंधासाठी घातलेले निर्बंंध लॉकडाऊन इतकेच कडक झाले आहे. आता प्रत्येक व्यवसायीकाला स्वतःची करोना चाणची किंवा करोनाची लस घेतलेली असणे आवष्यक असून तसे न केल्यास सबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. करोना निर्बंधाच्या पार्श्‍वभुमिवर पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून दुकानांचे शटर होणार डाऊन

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राज्य शासनाने रविवारी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच जिल्ह्यासाठी काही आदेश जारी केले आहे. राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी सर्व दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल. … Read more

घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-नवरा बायको म्हंटले कि, भांड्याला भांडे लागणारच… व वाद होणारच हे नित्याचेच आहे. मात्र अशाच एका किरकोळ वादातून एक मोठी व धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. घरगुती कारणातून वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत लता संतोष पटोरकर असे मयत महिलेचे नाव आहे. तर … Read more

धक्कादायक ! या पोलीस ठाण्यातील सतरा आरोपींना करोना संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढला आहे. वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन देखील युद्धपातळीवर हालचाली करत आहे. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पारनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील सतरा आरोपींना करोना संसर्ग झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. पारनेर पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत … Read more

शहरातील विकासकामे ठरतायत अडथळ्याची कारणे; नगरसेविकेने दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-शहरात अनेक विकासकामांच्या नावाखाली ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. ज्याठिकाणी रस्ते चांगली आहेत त्या ठिकाणी जेसीबीने खड्डे खोदून त्या रस्त्यांची दुर्दशा करण्यात आली आहे. शहरातील विकासकामेच आता नागरिकांसाठी अडचणीचे करणे ठरू लागले आहे. यामुळे नगरकर वैतागले आहे. संशयाग्रस्त नागरिकांकडून तक्रारीचा पाढा आपल्या प्रभागातील नगरसेवकांपुढे वाढला जातो आहे. यातूनच शहरातील नगरसेविका … Read more

मुलगा दररोज दिवस-रात्र मटका खेळत होता, मी शेतजमीन विकून कर्ज भरले… लोकांच्या प्रपंचाशी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-माझ्या तरुण मुलाने मटका जुगाराच्या आहारी जाऊन लाखो रुपयांचे कर्ज करून ठेवले, अद्याप मुलाचे लग्न व्हायचे आहे पण कर्जापायी मुलगा आत्महत्येच्या विचारात होता म्हणून मी माझी स्वतःची शेतजमीन विकून हे मोठे कर्ज भरले मात्र लोकांच्या प्रपंचाशी खेळणारा हा मटका व्यवसाय बंद कधी होणार? असा त्रस्त सवाल जमीन विकलेल्या या पित्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कोरोनाचा प्रसाद !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र नेवासे तालुक्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आले आहे. रॅपिड अँन्टीजन तपासणीत तामसवाडी गावात १९ रुग्ण आढळल्याने या रुग्णांसह आणखी चार रुग्णांना टेम्पोत … Read more

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बळीराजा संतापला; महावितरण कार्यालयात केली निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-गेल्या काही महिन्यापासून जनमानसात महावितरण विभागाच्या कारभाराबाबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. अवाजवी वीजबिले, सक्तीची वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम यामुळे नागरिकांमधील संतापाची भावना उसळली आहे. आता याचा उद्रेक देखील होऊ लागला आहे. याचाच एक प्रत्यय कर्जत तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या … Read more

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-पत्रकारास फोन करून धमकी देणार्‍या भिवंडी (जि. ठाणे) पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेना अहमदनगरच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. भिवंडी, शांतीनगर (जि. ठाणे) पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी रवी पाखरे यांनी फोन करून ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांना अरेरावी करून धमकी दिली. … Read more

नगरकर पाण्याची वाट पाहताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम नियोजित वेळेत न झाल्यामुळे नगर शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले. मनपाने रविवारी ज्या भागाला पाणी देण्याचे त्या भागाला पाणी मिळाले नाही. त्यामुळे नगरकर पाण्याची वाट पाहात आहेत. मनपाने शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (३ एप्रिल) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन … Read more

अरे देवा ! संगमनेरात कोरोना रुग्ण ९ हजार पार !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-संगमनेरात रविवारी ९८ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ९ हजार पार करत ९०८१ झाली. शनिवारी १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ८३३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ५८६ बाधितांवर उपचार सुरु असून ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील बाधित संख्या २७२६ तर ग्रामीणची ६२५७ आहे. सर्वाधिक १९१९ बाधितांची मार्चमध्ये … Read more

खासदार व आमदारांनी रुग्णसेवेसाठी निधी द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-आजपर्यंतचा कोरोना आजाराचा आकडा पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली. आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न करूनही दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून खासदार आणि आमदारांनी रुग्णसेवेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा आत्मपरीक्षण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी अपघात एक ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कंटेनर व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी (ता. नगर) शिवारात रविवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास घडली. औरंगाबादकडून नगरकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला (एमएच ४० बीएल ७५) ओव्हरटेक करताना दुचाकी स्प्लेंडर (एमएच १६ सीआर २७८२) चा अपघात झाला. या … Read more

जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोविड नियंत्रणाचे दृष्टीने उपाययोजनांचे नियोजन, समन्वयन आणि अंमलबजावणी करणेसाठी तातडीने अधिकारी, कर्मचारी यांची गरज भासू शकते. तसेच कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध होणेकामी सर्वांनी मुख्यालयी उपस्थित रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी भोसले यांनी आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अधिकारी … Read more