अहमदनगर ब्रेकिंग : मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे . शंकरराव गडाख यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे कि माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने … Read more

निर्बंध पाळा, कठोर लॉकडाऊन टाळा – महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. आठवड्याच्या शेवट्या दोन दिवसात लोकं मोठ्याप्रमाणावर बाहेर येत असतात, एकत्र येतात, काही कार्यक्रम देखील मोठ्याप्रमाणावर असतात याचा परिणामा संसर्ग वाढण्यावर होत असतो. त्यामुळे हे आठवड्याचे शेवटचे … Read more

मोदींचा मोठा निर्णय कोरोनावर नियंत्रणासाठी करणार असे काही !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचसूत्री अर्थात 5 कलमी कार्यक्रम आखला आहे. पंतप्रधानांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण मोहीम गांभीर्याने आणि कटिबद्धतेने राबविल्यास कोरोनाचा प्रसार रोखता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी 6 ते 14 … Read more

कोरोनाविरोधात प्रशासनाने एकत्रीत काम करावे !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अकोले तालुका अतिशय दुर्गम असून येथे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महसूल, पोलीस, नगरपंचायत व आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. अकोले तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अकोले पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस … Read more

सोनईत जनता कफ्र्यूनिमित्त १०० टक्के बंद

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सोनईचा रविवारचा आठवडे बाजार आणि स्थानिक कोरोना दक्षता कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार रविवारचा जनता कफ्र्यू यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. जनता कफ्र्यूनिमित्त सर्व दुकाने सकाळपासून बंद होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला सोनईचा जुन्या दुचाकी मोटरसायकलचा बाजारही बंद होता. या जनता कफ्र्यूमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप वगळण्यात आलेले होते. जिल्ह्यात … Read more

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी श्रीरामपूरात बंद यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात बसवावा, या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीच्या वतीने काल श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात बसवावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून विविध पक्ष व संघटना करत … Read more

एका दिवसात रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- कोरोनाची लाट आल्यानंतर राज्यात प्रथमच एका दिवसात रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला. रविवारी ५७,०७४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २७,५०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३० लाख १० हजार ५९७ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २२२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची एकूण … Read more

त्या नुकसानीसाठी राज्य सरकार मदतीची भूमिका का घेत नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- राज्य सरकार विकेंड लॉकडाऊनसह काही निर्बंध लागू करत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार ? त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत का जाहीर करत नाही, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष. चंद्रकांत पाटील यांनी केला. राज्य सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलत … Read more

सर्वात महत्वाची बातमी राज्यात सलून,प्रार्थना स्थळे हॉटेल आणि बार बंद !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टाळेबंदी की कठोर निर्बंध यावर बरेच दिवस खल सुरू होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली होती. रविवारी दुपारी झालेल्या तातडीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सलून बंद राज्यात लागू केलेल्या नव्या … Read more

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी स्वखर्चातून टाकली पिण्याची पाईपलाईन

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-प्रभाग 8 मधील गांधीनगर या भागातील फारूख पठाण घर ते नवनाथ जगधने घरांपर्यंत पिण्याची पाईपलाईन निष्कृष्ट दर्जाची झाल्याने यातुन दुषित पाणीपुरवठा होत होता. ही पाईपलाईन नवीन टाकण्यासाठी महिलांनी प्रभाग 7 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्याकडे मागणी केली असता संबंधित पाईपलाईनची पाहणी करून वाकळे यांनी पुर्वीची निकृष्ट झालेली पाईपलाईन काढुन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा विस्फोट !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यात शनिवार (दि. ३ एप्रिल) रोजी विक्रमी १७१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये १७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी संगमनेरच्या शहरी भागात ५०, संगमनेर खुर्द येथे २, उंबरी- बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, निमगावजाळी येथे १०, चिचंपूर येथे २, पानोडी येथे … Read more

दवाखान्याची जास्त बिले आकारली तर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांकडून कुणी जास्त बिले वसूल करत असेल, तर नातेवाईकांनी तक्रार करावी, असे दवाखाने व लॅब्जवर गुन्हे दाखल करू, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे. राहाता तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल शिर्डीत स्वत: फिरून शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅबमध्ये … Read more

शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या त्या व्यापाऱ्यास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या व्यापारी मुथा प्रकारणातील दोघांना जेरबंद केले. मुख्य आरोपीचा भाऊ गणेश रामलाल मुथा व त्याची पत्नी आशा गणेश मुथा यांना पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून एक चारचाकी, एक दुचाकी व ५० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, भामाठाण … Read more

पोलिस ठाण्यातच फिर्यादीवर ब्लेडने वार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यातच चक्क फिर्यादीवर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्याच्या विरुद्ध फिर्याद दिली जाणार होती त्यानेच ब्लेडने वार केल्याने एकच खळबळ उडून गेली. विशेष म्हणजे ही घटना तोफखाना पोलिस ठाण्यातच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी राजू मुरलीधर काळुंखे (रा. … Read more

कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करू : ना. तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांनीच स्वत:सह आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज असून, तिसगाव येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीईकीटसह कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही प्राजक्त मंत्री तनपुरे यांनी दिली. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत … Read more

नगर तालुका दूध संघात कोट्यवधींचा गैरव्यवहार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुका दुध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय 54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

शिर्डीतील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-शिर्डी नगरपंचायतने मोठ्या प्रमाणात वाढविलेली घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे व इतर कर माफ करावे, यासाठी सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट म्हणजे शिर्डीतील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिर्डीतील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. नगरपंचायतला … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निंबळकमध्ये दहा दिवस लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा वेगाने फैलाव होता आहे. दिवसाला हजारांच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहता निंबळक येथील ग्राम सुरक्षा समितीने 14 तारखेपर्यत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. निंबळक (ता.नगर) भागात करोना रुग्णाची संख्या दिवसोदिवस वाढत आहेत. गावाला लागून एमआयडीसी असल्याने कामावर जाणाच्या … Read more