भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलांवर ब्लेडने वार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-आरोपीकडून पतीला मारहाण होत असल्याचे पाहता पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे घडली आहे. याप्रकरणी पंकज दगडु खपके (वय ४३ धंदा मजुरी, रा. लाखरोड टाकळीमियॉ ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. खपके यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्य परिवहन मंडळाची बस पलटली,वाहतुक ठप्प !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-राहूरी येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने बसमधील १२ प्रवासी सुखरुप तर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे. श्रीरामपूर -अहमदनगर एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप महामार्गावर अपघात झाला आहे. बस मध्ये असलेले १२प्रवासी … Read more

टायर्सच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. एकीकडे कोरोनाचा संकटाशी मुकाबला करत असताना जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान नुकतेच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एक धाडसी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शेवगाव येथील नाथ टायर्स दुकानाच्या शटर्सच्या पट्टया तोडून 11 लाख 10 हजार किमंतीचे टायर्स व टायर्सच्या टयुब … Read more

आनंदऋषीजी हॉस्पिटलचा व्हायरल व्हिडीओ प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. यातच नगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलमधून खरेदी केलेले रेमडेसीवीर इंजेक्शन एक्सपायर झालेले असताना ते रूग्णांना दिले … Read more

केडगावातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या अटकेसाठी खासदार राऊतांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-केडगावातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर यांना अटक करावी तसेच विशेष सरकारी वकिल म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी नगर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. दरम्यान 2018 साली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावात दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. … Read more

गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-किरकोळ कारणातून अनेकदा मोठं मोठे गुन्हे, तसेच धक्कादायक घटना घडल्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. असाच एक किस्सा नगर जिल्ह्यात घडला आहे. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात … Read more

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एवढ्या लोकांना देण्यात आली लस

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. यातच देशात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांना … Read more

पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात घडली आहे. याबाबत दुपारी उशिरापर्यत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी राजू मुरलीधर काळोखे याने साहेबराव काते यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी आरोपी काळोखे आणि काते … Read more

???? निशब्द करणारा क्षण : घरे जळून भस्मसात, ​चिमुकल्या लेकराच्या सायकलीची पण राख…

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील ठाकर वस्तीवरील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यात मोटरसायकल, पैसे, धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. काल (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. ठाकर वस्ती येथील युवराज गांगड व अन्य तीन घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. या आगीत शेळ्या, मोटारसायकल, … Read more

नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात उद्या जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सध्या दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य रोग वाढतच असल्याने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या ( दि.४ रोजी,) सोनई मध्ये जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या महाभयंकर रोगाची साखळी तोडणे गरजेचे असून प्रशासन सह प्रत्यक्ष लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला एक लाखाचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९०९८ … Read more

भाविकांच्या गर्दी अभावी साई मंदिरातील लाडूचा प्रसाद बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता परराज्यातून येणाऱ्या साईभक्तांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन घेऊ साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्त भाविकांना प्रसाद रुपी देण्यात येणार लाडू प्रसाद वितरण गर्दीच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आले आहे. शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांना साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रसाद रूपी लाडू प्रसादाचे पाकीट विक्री माध्यमातून उपलब्ध करून देण्यात … Read more

वृध्द महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी तीन वर्षांनी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी डुग्या ऊर्फ सुनील रघुनाथ शिंदे (वय 29) गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील लाल टाकी येथील भारस्कर कॉलनीत माया वसंत शिरसाठ (वय 35) व शेजारील सारिका संतोष भारस्कर यांच्यामध्ये … Read more

रूग्णवाढीमुळे नगर तालुक्यातील या ठिकाणी सुरु होणार कोविड केअर सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसून येत आहे. नगर तालुक्यात करोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने तालुक्यातही कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत शुक्रवारी तहसीलदार उमेश पाटील यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली. … Read more

‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- टरबॅंक म्हणून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने गुंडाळली आहे. मागील एक वर्षापासून या योजनेला ब्रेक लागला आहे. याबाबतचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, ही योजना वाढीव अनुदानासह प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी पाथर्डी तालुक्­यातील … Read more

कोरोनाचा प्रकोप ! या देशात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या केसेसमुळे बांगलादेशमध्ये सोमवारपासून एक आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बांगलादेशने सोमवार, ५ एप्रिलपासून ७ दिवस दुसऱ्यांदा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान केवळ आपत्कालीन सेवांसाठी सूट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर बांगलादेशात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता लॉकडाऊन जाहीर … Read more

मोठी बातमी! पहिली ते आठवी परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत घडली आहे. अर्चना शनेश्वर नवले (वय वर्षे २७ ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई रंजना अरुण पालेकर राहणार साबळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more