दहावी-बारावीचे विद्यार्थी म्हणतात, आरोग्याशी खेळू नका, परीक्षा ऑनलाइनच घ्या

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-मार्चमध्ये जवळजवळ दहा हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोना झाला आहे. या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळू नये. परीक्षा ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी ऑनलाइनच परीक्षा घ्या या मागणीसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी आंदोलन केले. शिक्षणमंत्र्यांनी या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा अन्यथा … Read more

‘ह्या’ गावात आढळले १० बाधित,गावात पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असन, गुरुवारी (दि.१) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्पमध्ये गावातील ९ व वाळुंज येथील १ असे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गावात अजूनही मोठया संख्येने बाधित रुग्ण असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. गावात पाच दिवसांचा जनता कफ्र्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी … Read more

दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकनाच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राजस्थान पोलिसांच्या मदतीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक मानल्या जाणाऱ्या दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याच्या मुसक्या आवळल्या. त्याला राजस्थानातून अटक करण्यात आली. दानिशविरोधात एनसीबी कडे २ तर डोंगरी पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. तो मुंबई येथील डोंगरी परिसरात ड्रग्सची फॅक्टरी चालवत होता. एनसीपी ने दिलेल्या … Read more

पारनेरचे माजी आमदार विजय औटी म्हणाले ‘ह्या’ गोष्टीचे मला समाधान !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली पंधरा वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तालुक्­याच्या विकासाच्या अनेक संकल्पना आपण मांडून पूर्णही केल्या. शिवसेनेने घालून दिलेल्या संस्कारांवर पक्षाचे पदाधिकारी मिळालेल्या संधीचे सोने करीत पदाचा सद्पयोग करीत आहेत, याचे आपणास समाधान असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले. तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी विधानसभेचे … Read more

किरण खेर यांना ब्लड कॅन्सरचे निदान !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी आणि चंदीगडमधून खासदार असलेल्या किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. मुुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. स्वत: अनुपम यांनी याची माहिती दिली. अनुपम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत लिहिले की, अफवा पसरू नयेत म्हणून मी ही बातमी शेअर करत आहे. मी आणि … Read more

शरद पवार यांच्याबद्दल विकृत पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणासंदर्भात हीन दर्जाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या संबंधितांवर मुंबई सायबर क्राइमने गुरुवारी गुन्हा नोंद केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तशी तक्रार केली होती. शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया झाली. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. पवार यांच्या आजारपणाबाबत … Read more

शॉर्ट सर्किटमुळे एक एकर ऊस जळाला !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी पोपट लक्ष्मण खपके यांचा अंमळनेर शिवारातील गट नंबर ९६/१/२ मधील एक एकर ऊस जळून खाक झाला. खपके यांच्या उसाच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊस जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भर दुपारी धुराचे प्रचंड लोट दिसू लागल्याने परीसरातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव … Read more

भाजप नेत्याच्या घरावर हल्ला; बुरख्याच्या आडून घरात घुसले…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या नौगाममधील भाजपचे नेते अन्वर खान यांच्या घरावर गुरूवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेत तेथे तैनात जवान शहीद झाला. अन्वर बारामुल्लाचे सरचिटणीस आहेत आणि कुपवाडाचे प्रभारी देखील आहेत. काश्मीर रेंजचे आयजीपी विजय कुमार म्हणाले, लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. दोघांची ओळख पटवण्यात आली आहे. दोघेही श्रीनगर येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक एकाच दिवसात तब्बल 1800 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३३५ इतकी … Read more

मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याने डोक्यात दगड घालून प्रेयसीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून प्रियकराने खून केल्याची घटना पुण्यातील भाटघर धरण परिसरात उघडकीस आली. तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. मनिषा गेडाम (२९,रा.अमरावती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सागर गुंडवर (३०,रा.अमरावती) याला अटक करण्यात आली आहे. मनीषा व सागर … Read more

शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण पेटले

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हा शिवाजी चौकातच झाला पाहिजे. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी पुतळ्याची जागा बदलण्याची कोणतेही कारस्थान केले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीने गुरुवारी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन … Read more

श्रीगोंद्याच्या तहसीलदारांच्या कामाची पद्धत चुकीची , शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले – घनश्याम शेलार

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- श्रीगोंद्याचे तहसीलदार बेजबाबदारपणे वागत आहेत. सामान्यांची कामे करण्यात त्यांना रस नाही. तहसीलदारांच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेले २ कोटी १८ लाख ८१हजार रुपयांचे अनुदान परत गेले.त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. तहसीलदारांच्या या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी … Read more

नेवासे तालुका मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांना राज्यात अग्रेसर बनवायचा आहे !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ४४ लाख रुपये किंमतीच्या विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण उदयन गडाख यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. उदयन गडाख म्हणाले, बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये रस्ता कामाचा अनुशेष होता. तो अनुशेष मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली भरून काढला जाणार आहे. गटातील मोठी … Read more

टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- मागील वर्षी मार्चमध्ये कोरोना संकट आले. लॉकडाऊन लागले. परिणाम जाणवले नाही, मात्र सर्वांना त्याची झळ बसली. सर्वाधिक फटका शेतकरी आणि मजुरांना बसला. रोजगार फक्त शेती पुरक व्यवसायतुन मोठ्या प्रमाणात मिळतो. २०२० मध्ये हे व्यवसाय प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले. जनजीवन सुरळीत होत असतानाच कोरोनामुळे तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा … Read more

कारखाना स्वतःच्या मालकीचा असल्या प्रमणे घुले बंधू वागत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- २०१९-२० च्या अहवाला नुसार लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याला ९२३ कोटी रुपये कर्ज देणे आहे. म्हणजे प्रत्येक सभासदावर ६ लाखांचा बोजा असताना शेतकऱ्यांना फसवण्याचा निर्णय कारखाना संचालक मंडळ घेत आहे. २०२१-२२ मध्ये हे देणे ११०० कोटी पर्यत जाण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण सभेत ऊस भावासंदर्भात घोषणा होईल … Read more

राहूरी तालुक्यातील ‘हे’ गाव लॉकडाउन , गावानेच घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  राहुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता केंदळ खुर्द गावाने स्वयंस्फूर्तीने गाव लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विणकारन घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरपंच मच्छिद्र आढाव यांनी दिली आहे. राहुरी तालुक्यामधे कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत. त्यामुळे आता प्रशासनाने देखील कडक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वे खाली सापडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव( अशोक नगर)येथे वेड्या पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा रेल्वे कटिंग होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर मयत इसमाचे अंदाजे वय ४oते ४५ असून त्याच्या अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट व त्यावर चौकटी रंगाच्या रेघा व राखाडी रंगाचे अंगात पॅन्ट परिधान केल्याची आढळून आली आहे. पॅंटीच्या खिशामध्ये एक … Read more

आम्ही बोलायला लागलो तर ‘त्यांना’ कुठून कुठून कळा येतील बघा’

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा … Read more