अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८२९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ८१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२०० … Read more

सर्व शासकीय, खासगी केंद्रावर ‘या’ दिवशीही दिली जाणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. देशात पुन्हा एकदा काेरोना बळावू लागला आहे. महाराष्ट्रासह … Read more

थोरात म्हणतात, घोडचुका कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?”

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?” असं ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र … Read more

भाजपला सत्तेची स्वप्नं पडताहेत, पण महाविकास आघाडी भक्कम…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीच्या वृत्तात तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही. भाजपला केवळ सत्तेची स्वप्नं पडत आहेत. पण महाविकास आघाडी … Read more

धोनी पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोरोना कालावधीमधील लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद ठेवण्यात आले होते. त्यातच, पुढील सामन्यांसदर्भात निश्चिती नसल्याने धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, धोनीसारख्या महान क्रिकेटपटूने अशी ट्विटरवरुन निवृत्ती जाहीर करणे चाहत्यांना आवडले नाही. त्यामुळे, धोनीच्या निवृत्तीसाठी बीसीसीआयने एक सामना घ्यावा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली होती. अखेर, बीसीसीआयने … Read more

“मी गांधी दूत” अभियानाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते लॉन्चिंग

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, संघटनेच्या वतीने लोकांची केलेली कामे, सरकारच्या माध्यमातून लोकांचे मार्गी लावण्यात आलेले प्रश्न आदी बाबींची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने “मी गांधी दूत” अभियानाचे लॉन्चिंग शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊकाळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरात ३०० सोशल मीडिया वॉरियर्सची … Read more

एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकदंत कॉलनी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवुन परिसर स्वच्छ करुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. कॉलनीत सर्वत्र भगवे पताके व झेंडे लावण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली व … Read more

उड्डाण पूलास स्व.दिलीप गांधी यांचे नांव देण्यासाठी आत्मदहन आंदोलन लेखी आश्‍वासनाने मागे

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याच्या मागणीसाठी नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी शिवजयंती दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. उड्डाणपुलास सदर नाव देण्यासाठीचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना कळविले असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंबेडकर यांनी 31 मार्चचे आत्मदहन … Read more

चुक सुधारण्याच्या नादात पिल्ले परिवारावर कोरोनाचा ‘ठपका’ शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा निषेध !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-  काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आणि गटबाजी न करता समाजकार्य अखेरपर्यंत करणारे भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष स्व.आर.आर.पिल्ले किरण काळे यांच्या गटबाजीच्या कृतीत सामिल नव्हते म्हणून त्यांच्या निधनाकडे दुर्लक्ष केले आणि आता सावरण्याच्या प्रयत्नात खोटे दु:ख व्यक्त करतांना पिल्ले परिवारात कोणी कोरोना बाधित असल्याची बदनामी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे करत असल्याच्या कृतीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकी व टॅंकरचा अपघात, एक जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर इंधन खाली करण्यासाठी आलेल्या टँकरने पेट्रोल भरुन घरी चालेल्या दुचाकी चालकास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. हा अपघात दुपारी 1 वाजता डाँ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपाच्या आवारात घडला.याबाबत माहिती अशी की, राहुरी कारखाना … Read more

जागा बळकावणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शहरातील वसंत टेकडी, संदेशनगर येथील मागासवर्गीय कुटुंबाची जागा दडपशाहीने बळकाविणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस उपअधिक्षक प्रांजली सोनवणे व आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष राहुल लखन, शहर सचिव … Read more

महाराष्ट्रासाठी ‘इतक्या’ लसींचा पुरवठा, साडेतीन हजार केंद्रांवरील यंत्रणा सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- देशभरात गुरुवारपासून (१ एप्रिल) 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी महाराष्ट्राला 26 लाख 77 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. हे लसीकरण राज्यातील साडेतीन हजार केंद्रांवर करण्यात येणार आहे. राज्याला प्रत्येकवेळी लसींचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे त्याचे संपूर्ण राज्यात वाटप करताना मोठी कसरत करावी लागते. … Read more

उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी तहसिलदारांच्या विरोधात श्रीगोंदा प्रांतापुढे अपील दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाने जमीन हस्तांतरणाला स्थगिती दिली असताना सुध्दा श्रीगोंदा तहसिलदाराने जमीन इतर व्यक्तींच्या नावावर करुन उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप तक्रारदार जिजाबा रखमाजी वागस्कर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी तहसिलदारांच्या विरोधात श्रीगोंदा प्रांतापुढे अपील दाखल केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. … Read more

प्लॅस्टीक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई; 40 हजारांचा दंड केला वसूल

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोपरगाव शहरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना शहरात एका ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा असल्याचे नगरपालिका प्रशासनास कळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ४० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करून व्यापार्‍यावर कारवाई केली. दरम्यान या कारवाई 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील … Read more

राहाता ! 24 तासांत 219 जणांना करोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या महिन्यापासून राहाता तालुक्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणायला सरकारी यंत्रणेला अपयश आले असून मोठे प्रयत्न करूनही रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. काल बुधवारी 219 हा वर्षभरात विक्रमी रुग्णांचा आकडा समोर आला आहे. यामध्ये शिर्डी, राहाता, लोणी, साकुरी व पाथरे ही सर्वाधिक रुग्णसंख्या असलेली गावे आहेत. तालुक्यातील … Read more

नेवाश्यात कोरोनाच्या हाफ सेंच्युरी ; बाधितांच्या संख्या साडेतीन हजार पार

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नेवासा तालुक्यात गेल्या 24 तासात 25 गावातून तब्बल 52 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात अली आहे. यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 530 झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 28 दिवसांत अवघे 25 संक्रमित आढळले होते. फेब्रुवारी अखेर एकूण संक्रमितांची संख्या 2953 होती. मार्च अखेरपर्यंत त्यात 577 बाधितांची भर पडल्याने आतापर्यंतची … Read more

हलगर्जीपणा भोवला; श्रीरामपूर तालुक्याने शंभरी ओलांडली

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश कहर झाला आहे. यातच आता राहाता तालुक्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होताना दिसून येत आहे. यातच तालुक्याने गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची शंभरी ओलांडली आहे. तालुक्यात बुधवारी उच्चांकी ११६ रुग्ण सापडले आहेत तर काल दिवसभरात ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान तालुक्यात … Read more

उसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृत बछडा

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढला आहे, तसेच अनेक ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच काल एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नेवासा तालुक्यात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा बुद्रुकचे शेतकरी विक्रम पवार यांच्या उसाच्या शेतात … Read more