फसवणूक झालेला युवक न्यायासाठी अण्णा हजारे यांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-बांधकाम व्यावसायिक असलेल्या युवकाची फसवणुक झाली असता, न्याय मिळण्याच्या भावनेने संभाजीराजे भोसले या युवकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद ते राळेगण सिध्दी न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा काढली आहे. सदर युवक नगर शहरात दाखल झाला असता माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपल्या झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली. भोसले बोलताना म्हणाले की, … Read more

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडले याप्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना अरणगाव येथे ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली … Read more

महापालिकेचा ७०६ कोटींचा अर्थसंकल्प महासभेपुढे सादर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या ६८५ कोटीच्या अंदाजपत्रकात २१ कोटी ६५ लाखांच्या वाढीव तरतुदींची शिफारस करत एकूण ७०६ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी मंगळवारी (दि.३०) दुपारी महासभेपुढे सादर केले. महापौर वाकळे यांनी अंदाजपत्रकाच्या अभ्यासासाठी नगरसेवकांना वेळ मिळावा म्हणून सभा तहकूब केली असून सभेचे नियमीत कामकाज आज … Read more

दोन गटांत तुंबळ हाणामारी : तीन जणांवर कुऱ्हाडीने वार

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटाकडून सर्रासपणे कुऱ्हाड व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आलाय. ही घटना दि. २७ मार्च रोजी घडली. दोन्ही गटातील तीन जणांवर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कविता अनिल बोरूडे … Read more

वाहनाच्या धडकेत हरीण ठार

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार झाले. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कासारे शिवारात पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राण्यांची भटकंती सुरु असते. मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एक हरीण रस्त्यावर आले असता त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात अपघातात हरिणाचा एक … Read more

शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळाला !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शॉर्टसर्कीट होऊन चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शहरागतच्या सेंटमेरी परिसरात काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. निंबाळे शिवारात सेंटमेरी चर्चच्या मालकीची शेतजमिन आहे. तोडणीस आलेला ऊस काल पेटला. या आगीत सुमारे चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. दिवसभर वारा मोठ्या प्रमाणात होता. त्यात आग लाल्याने काही क्षणात … Read more

झोपडीतल्या अभ्यासाचं चीज; पशु वैद्यकीय अभ्यासक्रमात महाविद्यालतून प्रथम क्रमांक !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊननंतर सिधुदुर्ग जिल्ह्यातल्या दारिस्ते या आपल्या गावी आलेली आणि ऑनलाईन शिक्षणासाठी डोंगरावरच्या झोपडीतून अभ्यासाचे धडे गिरवणारी स्वप्नाली सुतार पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून ११९ विद्यार्थ्यांमधून कॉलेजमध्ये ८.६ ग्रेड मिळवत प्रथम आली. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे स्वप्नाली गावी आली खरी, पण गावात इंटरनेट नेटवर्क मिळत नसल्याने तिला ऑनलाईन लेक्चर्स चुकू लागली. … Read more

मोक्कातील फरार असलेला ‘फक्कड’ अखेर जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग या तरुणाच्या खूनप्रकरणातील तसेच मोक्का लावलेल्या गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सुनील फक्कड अडसरे (वय २६ रा. शेडाळा, ता. आष्टी जि. बीड) याला सुपा या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ओंकार भालसिंग याचा विश्वजीत कासार व त्याच्या टोळीने खून … Read more

नितेश राणेंचा आरोप, सचिन वाझेंचे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-सचिन वाझे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते, असा धक्कादायक आरोप भाजप नितेश राणे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तावाहिनीशी बोलताना राणे यांनी ठाकरे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे. राणे … Read more

अरे बापरे: तहसील कार्यालयात हाणामारी! कर्मचा-यांचे  कार्यालयाला टाळे ठोकून कामबंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वैयक्तिक कारणावरून शेवगाव तहसील कार्यालयात एकमेकांशी वाद करुन गोंधळ घालणा-या व शासकीय कामकाजात अडथळा आणणा-या दोन गटातील आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार विकास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव या पिता पुत्रासह इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा … Read more

‘नगर तालुक्यात कोवीड सेंटरची संख्या वाढवा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यात कोरोनाने कहर सुरू केला असुन दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे . तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोवीड सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले . बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे , उपसभापती संतोष म्हस्के , माजी सभापती हरिभाऊ कर्डिले , माजी उपसभापती … Read more

‘ही’ अट पूर्ण केल्यास मिळणार ४५ वर्षे वयाच्या नागरिकांना लस

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारपासून (१ एप्रिल) देशातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आता ४५ वर्षांपुढील नागरिकांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे १ जानेवारी २०२१ ला ४५ वर्षे व्हायला हवे. तसेच १ जानेवारी, १९७७ आधी या नागरिकाचा जन्म झालेला असायला हवा. … Read more

गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना गप्प का बसलात?

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना केली. तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, असे खडे बोल सुनावले. सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच तक्रार किंवा एफआयआरशिवाय कशी करता? असा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात आज १३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६७१४ इतकी झाली … Read more

कोरोना नियम पायदळी तुडवणाऱ्या ‘या’ खासदारांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-औरंगाबादेत कोरोना नियम पायदळी तुडवणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊनचा निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. इम्तियाज जलील यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली होती. पण या मिरवणुकीत कोणीही तोंडावर … Read more

सराफ दुकानात चोरी करण्यासाठी विमानाने आले होते चोरटे

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-ठाणे येथील वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानातून तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख या आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, ही बाबही चौकशीत … Read more

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; जामखेडला उपजिल्हा रुग्णालयाची मंजूरी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जामखेड ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा पुरविण्यात अपूरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील जनता व लोकप्रतिनिधीच्या मागणी नुसार पाठपुरावा करत आ. रोहित पवार यांनी विशेष बाब म्हणून जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यश मिळविले आहे. आता हे रुग्णालय ३० खाटांनरून १०० खाटांचे होणार असून येथे जिल्हा रूग्णालयात देणात येणाऱ्या … Read more

कोरोनाचा प्रकोप पाहता आरोग्यमंत्री म्हणाले… ‘मानसिक तयारी ठेवा’

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राज्यात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडून सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यावेळी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी एक सूचक विधान केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले कि, नियम पाळा लॉकडाऊन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा … Read more