ब्रेकिंग न्यूज ! दारुड्या बापाने केला मुलाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे दारुचे व्यसन असलेल्या बापाने आपल्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी ताराबाई हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस स्‍टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की आखेगाव येथील गोरख किसन करपे या जन्मदात्या बापानेच सोमनाथ गोरख करपे ( वय -१८ ) … Read more

नेवासा तालुक्यातील या गावात लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच दिसून येत आहे. यातच राहता तालुक्यात कठोर नियम करण्यात आले असतानाच आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यातच करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेवून नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीने पाच दिवसांचे लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु … Read more

मोटार चोरासह विकत घेणाऱ्यालाही पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शेतकरी वैभव तनपुरे यांच्या विहीरीवरील २० हॉर्सपॉवरची मोटार काही दिवसांपुर्वी चोरीस गेली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असता समजले कि, त्यानं खात्रीशीर माहिती समजली कि, हा गुन्हा कांतिलाल दत्तात्रय जत्ती, (वय २० वर्षे, रा. वडगाव तनपुरा ता. कर्जत) … Read more

मोठी बातमी ! इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला संगमनेर कोर्टानं रद्द केला

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-लिंग भेदभाव करणारे वक्तव्य केल्यावरून वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचे अपील … Read more

भारतात 24 तासात 53,480 नवे कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या 24 तासात भारतात 53,480 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 354 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 41, 280 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 1,21,49,335 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,52,566 झाली आहे. एकूण 1,14,34,301 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,62,468 आहे. आतापर्यंत देशात 6,30,54,353 नागरिकांचे लसीकरण … Read more

कत्तलसाठी घेऊन जाणाऱ्या 38 गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- कत्तलीसाठी आणलेल्या 38 गायींची पोलिसांनी सुटका केली. नगर तालुका पोलिसांनी वाळकीत ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तोसिफ शेख (रा. वाळकी) याला अटक केलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तौसिफ़ शेख हा कत्तलीसाठी गाई घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस … Read more

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत धमकावणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- प्रेमसंबंध असलेल्या दोघांमध्ये वाद झाला व संबंधित व्यक्तीकडून पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाणीची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून सचिन ज्ञानदेव काळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर … Read more

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- कृषिपंपाची वीजजोड तोडणी त्वरित थांबवावी तसेच पाथर्डी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील डांगेवाडी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे, सांगवी, या गावांतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे व शिष्टमंडळाने तहसीलदार श्याम वाडकर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निदर्शने !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- मौजे नांदगाव (ता.नगर) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असणार्‍या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अतिक्रमणे नियमीत करुन घरकुल बांधण्यास परवानगी मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कैलास पटारे, नाथसाहेब सरक, श्याम उमाप, विलास वाघमारे आदी … Read more

फसवणुक झालेल्या युवकाची न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा नगरमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- बांधकाम व्यावसायिक असलेल्या युवकाची फसवणुक झाली असता, न्याय मिळण्याच्या भावनेने संभाजीराजे भोसले या युवकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद ते राळेगण सिध्दी न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा काढली आहे. सदर युवक नगर शहरात दाखल झाला असता माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपल्या झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली. संभाजीराजे भोसले बोलताना … Read more

केडगाव पोलीस स्टेशन मंजुरीसाठी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरातांकडे किरण काळेंची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- केडगावची लोकसंख्या मागील अनेक वर्षांमध्ये वाढली आहे. चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा घटना वारंवार घडत असतात. तसेच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य होत असतात. केडगावच्या नागरिकांना पोलीस प्रशासनाची पुरेशी आणि तत्पर सेवा मिळण्याच्या दृष्टीने केडगावसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजुरीसाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष … Read more

प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजना राबविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-  तुकाराम बीजेचे चौचित्यसाधून पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजना राबविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. पर्यावरण … Read more

हिवरेबाजारला उमंग फाउंडेशनच्या कार्यालयाचे शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- हिवरेबाजार (ता. नगर) येथे उमंग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे शुभारंभ गावचे सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसन्न पोपटराव पवार, बाळासाहेब ठाणगे, रहनाज सय्यद, बेबीताई चव्हाण, निर्मला बोरकर, पद्माबाई लोणारे, जनाबाई गिर्‍हे, मुमताज सय्यद, मिनीनाथ लोणारे, कुमार लोणारे, उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, … Read more

माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर विरोधी संचालक व सभासदांची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील संस्थेच्या सेवानिवृत्त व नाममात्र सभासदांना मूळ सभासदत्व देण्यासाठीच्या पोटनियम दुरुस्तीचा विषय रद्द करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना दिले. तसेच सभासद हिताच्या विविध मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रोकड-मोबाईलसह 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी राहुल जनार्धन लाड (वय 28) रा. नेवासा फाटा, रशीद मुस्तफा शेख (वय 30), गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 25), दत्तात्रय गोरख साळवे (वय 24), आकाश अनिल गायकवाड (वय … Read more

परीक्षांबाबत निर्णय नसल्याने राज्यातील ‘हे’ विद्यार्थी चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-मार्च अखेर आला तरी अद्याप शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीची घोषणा किंवा त्यासंदर्भातील नियोजन शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाही. शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीआधी पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या यंदाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णयही गुलदस्त्यातच आहे. इतर अनेक राज्यांतील प्रशासनानी यंदा विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारवर पुढील वर्गात प्रवेश द्यायचा निर्णय घेतला. मात्र, … Read more

त्या विधानावरून बाळासाहेब थोरातही नाराज

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी नुकतेच यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना द्यावे, अशा आशयाचे विधान केले होते. यावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत राजकारणी आणि संपादक यांच्यात गल्लत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत … Read more

अखेर पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले पण किती ? वाचा इथे क्लिक करून

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुस‍ऱ्या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती कमी झाल्यामुळे मंगळवारी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या. मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोल २२ … Read more