डॉ.राहुल खंडेलवाल यांना इन्स्टीट्युट ऑफ स्कॉलर,बँगलोरचा “रिसर्च एक्सलन्स अँवार्ड२०२० प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आयएमएसच्या व्यवस्थापन विभागातील डॉ.राहुल खंडेलवाल यांना इन्स्टीट्युट ऑफ स्कॉलर,बँगलोरचा रिसर्च एक्सलन्स अँवार्ड २०२० मिळाला. आयआयएम शिलॉंग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केलेल्या “ रिसायकलिंग ऑफ वेस्ट आटोमोटिव्ह लुब्रीकेटींग आँईल “या शोध निबंधास संशोधनातील सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आला. या बद्दल संस्थेचे संचालक डॉ. एम.बी.मेहता यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. … Read more

पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आई, वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जीत चार पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री करणार्‍या चुलते व इतर नातेवाईक असलेल्या राजकोटवाला परिवारातील सहा सदस्यांवर जिल्हा न्यायालयाच्या आदेशान्वये कोतवाली पोलीस स्टेशनला रविवारी (दि.28 मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अक्सा अन्वर राजकोटवाला (वय 22 वर्षे, रा. अहमदनगर) या मुलीच्या फिर्यादीवरुन हबीब इस्माईल राजकोटवाला, रेहान … Read more

कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी ताटकळत ठेवल्याप्रकरणी साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी बारा तास ताटकळत ठेऊन त्याची अवहेलना करुन, नातेवाईकांना पैश्यासाठी मानसिक त्रास देत धमकाविल्याप्रकरणी शहरातील साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन दिले. तसेच सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी … Read more

पेट्रोलियम कंपन्यांकडून दिलासा, पेट्रोल डिझेलचे दर झाले कमी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली. 30 मार्च 2021 रोजी पेट्रोलच्या किंमतीत 22 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 23 पैसे कपात करण्याची … Read more

राज्यात २४ तासांत ‘इतके’ जण कोरोनाने दगावले

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात १०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के इतका आहे. राज्यात एकाच दिवशी २०,८५४ कोरोबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले तसेच आतापर्यंत एकूण २३,५३,३०७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण हे … Read more

केंद्र सरकार म्हणते, घरोघरी जाऊन लसीकरण नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक वृद्ध, काही अंथरुणावर खिळलेले, काही दिव्यांग आहेत. ते लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत. यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले होते. अशा नागरिकांना घरी जाऊन लस देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, केंद्राने असे कोणतेही धोरण नाही, असे सांगितले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. … Read more

संगमनेर तालुक्याची वाटचाल लॉकडाऊनकडे

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. यातच संगमनेर तालुक्याची दिवसेंदिवस वाढणारी करोनाची संख्या लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात ६५६ रुग्ण सध्या उपचार घेत असून १०५ रुग्णांना … Read more

भाड्याने घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणारा भामटा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालवण्यासाठी घेतले जात. ती वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपयांच्या १६ आलिशान कार जप्त करण्याची ही महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते (वय 26 रा. भोयरे … Read more

विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाची दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा चौफुलीवर पोलीस प्रशासन व चांदेकसारे ग्रामपंचायतीने विना … Read more

शेतातील झोपडी पेटविली; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नेवासा तालुक्यात एका शेतातील झोपडीला कोणी अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी संगीता शरद गवांदे (वय वारातील शेतीमध्ये फेरफटका मारणेकरीता गेलो असता तेथे शेतात असलेली झोपडी पुर्णपणे जळुन राख झालेली होती. सदर … Read more

नेवासा तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू घोषित

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील करोना रूग्ण वाढत असल्याने जनता कर्फ्युचा घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात करोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे अखेर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक श्री चांगदेव मोटे व शिंगणापूर पोलिस स्टेशनचे पी.आय.बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात … Read more

जाणून घ्या राज्यातील आजची कोरोनाची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान, कालपेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. मात्र रविवार असल्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याची शक्यता व्यक्त केली … Read more

अरुण जगताप यांनी लस घेवून केले करोना मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचालित गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद रूग्णालयात महापालिकेच्या सहकार्याने सिरामच्या मोफत कोविड १९ च्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी स्वतः लस घेवून केले. आ. अरुण जगताप म्हणाले, संपूर्ण जगात धुमाकूळ घालणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व नागरिकांसाठी शासनाने कोविड प्रतिबंधक … Read more

नगरसेविकेच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रात्री उशिरा उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्न अवघ्या २१ वर्षांचा होता. करुणा शेखर चिंचवडे असे मयत प्रसन्नच्या आईचे नाव असून त्या भाजपाच्या नगरसेविका आहेत. चिंचवडमधील राहत्या घरात प्रसन्नने वडिलांच्या परवानाधारक … Read more

खासदार डॉ. विखे यांचा विरोधकांवर आरोप…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-सहकारी तत्त्वावर चालवला जाणारा राहुरी कारखाना बंद पाडून त्याचे खासगीकरण करण्याचा डाव विरोधकांचा असून त्यासाठी येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधक निवडणूक लढवणार आहेतच; परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांचा हा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे अभिवचन डॉ. तनपुरे कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. … Read more

देशातील ‘ह्या’ 8 राज्यांमध्ये 84.5 टक्के रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या 8 राज्यात दैनंदिन रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद होत आहे. नव्या रुग्णांपैकी 84.5 टक्के रुग्ण या आठ राज्यात आहेत. गेल्या 24 तासात 68,020 नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 40,414 नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकमध्ये 3,082 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा महिनाभर बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने आज मार्च महिन्यात सर्वाधिक बाधितांचा विक्रम नोंदविला. मागील 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील … Read more

लॉकडाऊन अंतिम पर्याय नाही ; खुद्द सत्ताधाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला असलेला विरोध दर्शविला आहे. याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता.आता राष्ट्रवादीनेही विरोध दर्शववल्याने मुख्यमंत्र्यांची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब … Read more