अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ वेळेत असेल जमावबंदी जाणून घ्या काय असेल सुरु आणि काय बंद ?

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला. जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा जमावबंदी आदेश लागू केला. … Read more

बरे झालेल्या कोरोना रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने हॉटेल नटराज येथे सुरु करण्यात आलेल्या गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी करण्यात आली. कोरोना रुग्णांचे आत्मबळ वाढविण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी न थांबता … Read more

काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाईना फिनिक्सने दिली नवदृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- एक वर्षापुर्वी काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाई धाडगे या आजीबाईंना फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली. निकामी झालेल्या डोळ्यास पुन्हा दृष्टी लाभल्याने आजीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. फिनिक्स सोशल फाऊंडेशनने नागरदेवळे (ता. नगर) येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. … Read more

ठाकरे सरकार क्रिमिनल, नवीन सरकार यावे : आंबेडकर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- सरकार एखाद्या अधिकाऱ्याला कलेक्शन करायला सांगतात, ही परिस्थिती आहे. गृहमंत्री यांना कुणी सांगितले, पार्टीने सांगितले का? हा विषय कॅबिनेटमध्ये झाला होता का ? याची चौकशी व्हायला पाहिजे. ते म्हणाले की, मागील पाच वर्षातही उद्धव ठाकरे हे सत्तेत होते, उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. उद्धव ठाकरे यांना कणा … Read more

अरणगावात आठ दिवस कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्याने दरदिवशी हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे कोरोनाचे वादळ जिल्ह्यावर हाहाकार माजवत आहे. यामुळे प्रशासन देखील कठोर निर्णय घेऊ लागले आहे. नगर तालुक्यातील अरणगाव येथ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने प्रशासनाच्यावतीने अरणगाव आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. येथील कोरोनाबाधित … Read more

22 गावांतून एकूण 51 करोना संक्रमित आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. नेवासा तालुक्यात करोना संक्रमण फैलावण्याचा वेग वाढला असून काल एका दिवसातील संक्रमणाने अर्धशतकाचा आकडा ओलांडला आहे. … Read more

श्रीरामपुरात २४ तासात ७९ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यात काल सलग दुसर्‍या दिवशीही ७९ रुग्ण सापडले आहे. तर ३७२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ९३ टक्के रुग्ण बरे झाल्याचे दिसून येत आहे. तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असून रविवारी ७९ रुग्णांची भर पडली आहे. श्रीरामपूर तालुका … Read more

राहुरी कारखाना खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून खासदार विखे संतापले

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- ‘महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत २५ साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, जोर्पंत मी जिवंत आहे, तोपर्यंत राहुरी कारखान्याच्या बाबतीत असे होऊ देणार नाही.’असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची 65 वी … Read more

कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर संपवले जीवन?

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसन्न चिंचवडे (21) असे मृताचे नाव आहे. काल (28 मार्च) रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या राहत्या घरात घडला. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात … Read more

मिठाईच्या दुकानात घुसलेल्या ट्रकने घेतला सात जणांचा जीव

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- एका मिठाईच्या दुकानात घुसलेल्या ट्रकने अनेक लोकांना धडक दिली.यात 7 जणांचा जागीच मृत्यू तर 12 पेक्षा जास्त जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही दुर्घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यात घडली. तेल्हाडामधून सर्व मृतदेह शरीफ सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघात आणि 7 जणांच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाने ट्रकला … Read more

‘या’ महिला मंत्र्यामुळे रोखला बालविवाह

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- महिला आणि बालविकास मंत्र्यालयाच्या हेल्पलाईन नंबर 1098वर एक फोन आला. या फोनवरून एका व्यक्तीने एका बालिकेचा गुजरातमध्ये नेऊन बालविवाह करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर महिला आणि बालविकास मंत्र्यालय अॅक्शन मोडमध्ये आले. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना ही माहिती कळताच त्यांनी थेट आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले. … Read more

आज नगर दौऱ्यावर येताहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (दि. 29 मार्च) नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली असल्याने पालकमंत्री येत आहेत. सोमवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर येथून खाजगी विमानाने ते शिर्डीला येणार आहेत. सकाळी 10:30 वाजता शिर्डी विमानतळ येथे त्यांचे आगमन … Read more

शहरात संचारबंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाची वाढती व्याप्ती पाहता प्रशासनाने अनेक कठोर नियमांची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यातच राज्य सरकारने देखील कोरोनाला अटकाव करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलली आहे. काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे संचारबंदीसह जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी … Read more

वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून विखेंची महसूलमंत्र्यांवर जोरदार टीका

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. यातून गावपुढारी तयार करण्याचे काम सर्व तालुक्यांत सुरू असून महसूलमंत्री वाळू माफियांवर काही बोलत नाही. वाळू वाहणाऱ्या तस्करांना पोसण्याचे काम सध्या सुरु आहे, असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण … Read more

मढी येथील होळीने पोलीस बंदोबस्तात घेतला पेट

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी रविवारी ५ वाजता पोलीस बंदोबस्तात पेटली. दत्त मंदिराजवळील होळी पेटविण्याची मूळ जागा बदलून गोपाळ समाजाच्या पारावर होळी घ्यावी, अशा काहींच्या अट्टाहासामुळे किरकोळ तणाव झाला होता. मात्र कान्होबा देवस्थान समिती, पोलीस, महसूल प्रशासन अशा तिहेरी समन्वयाने होळीने अखेर पेट घेतला … Read more

खेळाच्या वादातून आठ जणांकडून दोघांना बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया कारखान्याच्या क्रिकेट मैदानावर रविवारी क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठ जणांनी मिळून दोघा खेळाडूंना बेदम मारहाण केली. याप्रकरणी अतुल विनायकराव लोंढे यांच्या फिर्यादीवरून संजय सुभाष जाधव, अभिजित दीपक जाधव, मंजाहारी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव, नामदेव शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), संदीप सुरेश जाधव, विठ्ठल … Read more

राज्यात कोरोनाची रेकॉर्डब्रेक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्यातील गेल्या 24 तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे. कारण आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील … Read more

निमगाव वाघात अमली पदार्थांची होळी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी ग्रामपंचायत सदस्य तथा … Read more